' जोडीदाराची निवड करतांना फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्वाचं… १० टिप्स! – InMarathi

जोडीदाराची निवड करतांना फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्वाचं… १० टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो, डोळ्यांची भाषा बोलून झाली, की प्रेमाची गाडी पुढच्या स्टेशनकडे धावू लागते. ते स्टेशन आहे एकमेकांना भेटण्याचे. त्यातली हुरहूर, वाट पाहणे हे सगळेच हवेहवेसे वाटते. पहिल्या भेटीच्या नुसत्या कल्पनेने मनात फुलपाखरे उडायला लागतात. एक मजेशीर फीलिंग असते ती.

कोणाला तरी सांगावे आणि त्याचवेळी कोणाला काही कळू नये असे काहीतरी वाटत असते. आवडणार्‍या व्यक्तीला भेटावेसे वाटते.. नशीब असेल तर ही भेट होण्याचा योग लवकर येतो देखील. पण मित्रांनो पहिलं प्रेम आणि पहिली भेट या खूपच टेम्प्टिंग गोष्टी असतात ना? एकाच वेळी हव्याहव्याशा आणि त्याचवेळी गोंधळून टाकणाऱ्या अशा या गोष्टी असतात.

 

indian couple coffee shop InMarathi

 

अनेक कथा कादंबर्‍या चित्रपट यांमध्ये या पहिल्या भेटीचे वर्णन पाहून वाचून तुम्हाला देखील आपली पहिली भेट अशीच स्वप्नवत असावी असे वाटत असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तिला किंवा त्याला भेटताना मनात अनेक प्रश्न येतात..कसा असेल तो /ती? तिला /त्याला काय आवडत असेल? पहिल्या वेळी भेटताना मी काय गिफ्ट देवू? गिफ्ट देवू की नाही? एक न दोन हजार गोष्टी. तुम्ही समोरच्याशी कसे वागता, बोलता यावर तुमची पहिली भेट अवलंबून असते.

ही भेटच तुमच्या प्रेमाची सुरवात असते. पण मित्रांनो first impression is a last impression हे ही तुम्हाला माहितीच आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहे काही चटपट्या टिप्स ज्यामुळे तुमची पहिली भेट किंवा डेट तुमच्यासाठी golden memory ठरेल.

 

coule gift InMarathi

 

तुम्ही जेव्हा तिला किंवा त्याला पहिल्यांदा भेटणार असाल तेव्हा जर आमच्या या टिप्स लक्षात ठेवल्यात आणि फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही तिला किंवा त्याला इम्प्रेस करू शकाल.

आता तुम्ही म्हणाल पहिल्यांदा भेटताना आधीच किती टेंशन असते पण खरच मित्रांनो या टिप्स फॉलो केल्यात तर तुमची ही पहिली डेट नक्कीच मस्त माहौल बनवणारी ठरेल. तेव्हा चला पाहूया काय आहेत या टिप्स आणि हो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंटबॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. टेक अ लुक..

 

१. भेटीचे ठिकाण :

तुम्ही जिथे भेटणार आहात ते ठिकाण जास्त गर्दी असलेले किंवा noisy नसावे. एखादे छानसे restaurant, एखादे शांत गार्डन, लेक साइड अशी कोणतीही जागा तुम्ही भेटीसाठी निवडू शकता. ही जागा अशी असावी की भेटताना तुम्हा दोघांनाही comfortable वाटेल.

जिथे भेटल्यावर तुम्ही मोकळेपणाने एकमेकांशी बोलू शकाल. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तिला पहिल्यांदाच भेटत असता, तेव्हा ही भेट अविस्मरणीय होण्यासाठी भेटीची जागा उत्साहवर्धक असावी.

 

Couple cuddling IM

 

२. ड्रेसिंग :

तुम्ही जी ड्रेसिंग स्टाइल निवडणार आहात ती खूप भडक रंगाची अजिबात नसावी. तुमचा पोशाख तुमची निवड आणि तुमची अभिरुची दाखवतो. शक्यतो डिसेंट रंगांचे आणि फॅशनचे कपडे तुम्ही निवडा. यातून तुमचे व्यक्तित्व खुलून येईल.

 

couple dresing InMarathi

३. स्पेस द्या :

भेटल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट ही की तिच्या किंवा त्याच्या आवडींनिवडी आधी जाणून घ्या. त्यानुसार मेन्यू ऑर्डर करा. यामुळे तो किंवा ती रीलॅक्स होतील. शक्यतो सतत स्वत:बद्दल न बोलता तिला किंवा त्याला बोलू द्या.

त्यांच्या आवडींनिवडी, त्यांचे इंटेरेस्ट जाणून घ्या. पण त्यात अजिबात औपचारिकता येवू देवू नका. तुम्ही त्यांचे बोलणे समजून घेताय हे त्यांच्यापर्यन्त पोचू दे.

 

mazi-tuzi-reshimgath InMarathi

४. नजरेची भाषा :

नजरेची भाषा अशावेळी मदतीला धावून येते. तुम्ही तिच्या किंवा त्याच्या नजरेला नजर देवून बोला बिनधास्त. तिला किंवा त्याला ही ते आवडेलच.

नजर चुकवणे, सारखेच दुसरीकडे बघणे, वर आकाशाकडे बघणे अशा गोष्टी अजिबात करू नका. यामुळे तुमचे इम्प्रेशन खराब होवू शकते. बर्‍याच गोष्टी तुम्ही नजरेच्या भाषेतून बोलू शकता ज्या तुम्ही पहिल्या भेटीत बोलू शकत नाही.

 

mrunal dusanis and shashank ketkar Inmarathi

५. आत्मविश्वास :

तिच्या किंवा त्याच्याशी पूर्ण आत्मविश्वासाने बोला. बोलताना खूप भरभर किंवा एकदम हळू आवाजात बोलू नका. सध्याचे ट्रेंडिंग विषय, जसे की सिनेमा, खेळ, फॅशन यांवर बोला पण राजकारण, मनी मॅटर हे विषय चुकूनही काढू नका.

तुम्ही जर तिच्याशी किंवा त्याच्याशी आणि आत्मविश्वासाने आणि प्रेमाने बोललात तर नक्कीच ती किंवा तो तुमच्याशी तेवढ्याच मोकळेपणाने बोलेल आणि तुमची पहिली भेट यशस्वी होईल.

 

Swwapnil-Joshi-Mukta-Barve-Inmarathi

६. भेटवस्तू :

पहिल्या भेटीमधला हा कळीचा मुद्दा. काहीतरी महागडी भेट देण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव भेट द्या. उदाहरणार्थ एखादे छानसे ग्रीटिंग, फुले , चॉकलेटस, बुक्स , एखादी गाण्यांची सीडी .

या छोट्याश्या भेटीमुळे समोरच्याचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. पहिल्या वेळी भेटताना तुम्ही काहीच भेटवस्तू दिली नाही तर ते प्रेमाच्या नात्यात रुसवा आणू शकते. तेव्हा भेटताना भेट नक्कीच द्या. आयटी वर्क्स ए लॉट.

 

gift InMarathi

७. कीप मोबाइल अवे :

आता तुम्ही म्हणाल की वरचे सगळे मुद्दे मान्य पण मोबाइल पण बाजूला ठेवायचा म्हणजे काय? तर मित्रांनो पहिली भेट ही तुमच्या प्रेमाची पहिली पायरी असते.

अशावेळी जर तिच्या किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या सेलफोन कडे जास्त लक्ष देताय असे तुमच्याबद्दल मत झाले तर?.. म्हणून तुम्ही तुमचा सगळा वेळ आणि सगळे लक्ष तिच्याकडे किंवा त्याच्याकडे देताय हे त्यांना समजू दे. यासाठी मोबाइल ल दूरच ठेवा.

.phone keep away Inmarathi

 

८. टाइम मॅनेजमेंट / वेळ द्या :

छोटीशी पण महत्वाची गोष्ट वेळेचे नियोजन. भेटायला जाताना अगदी वेळेवर किंवा वेळेच्या आधीच जा. कोणीतरी आपला अमूल्य वेळ आपल्यासाठी खर्च करणार असते म्हणून ती वेळ जपा.

couple waiting Inmarathi

 

९. जाणून घ्या :

भेटीदरम्यान तिचे / त्याचे फ्युचर प्लान्स जाणून घ्या. एकमेकांच्या स्वप्ने, इच्छा यांबद्दल भरपूर बोला आणि बोलू द्या. मित्रांनो , संवाद त्यातही मनमोकळा संवाद कधीही नाते पुढे नेणारा असतो.

दोघेही पहिल्यांदाच भेटत असल्याने तयार होणार्‍या औक्वर्ड परिस्थितीला तुमच्याकडील जोक्स, चुटकुले, क्रिस्पि गोसिप्स यांनी हलकेफुलके बनवा. हे मोकळेपण तुम्हाला पुढच्या भेटीकडे घेवून जाईल.

 

Lovely couple Inmarathi

१०. व्यक्त व्हा :

लास्ट बट नॉट लिस्ट, तुम्हाला तिच्या किंवा त्याच्या विषयी वाटणारी ओढ त्यांच्यापर्यंत पोचू द्या. तुमच्या प्रत्येक कृतीतून तुम्ही त्यांना दिलेला आदर, तुमचे त्यांच्याविषयीचे प्रेम त्यांना कालू द्या.

तुमच्यातील संवादादरम्यान त्यांना तुमच्या भावना बोलून दाखवा. तुमचे व्यक्त होणे ते ही त्यांना आवडेल असे असेल तर मित्रांनो ही पहिली भेट तुम्ही नक्कीच जिंकलेली असेल आणि सोबतच तिचे किंवा त्याचे मन ही!

 

couple inmarathi

 

मित्रांनो ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुमची पहिली भेट यशस्वी करण्याचे मोठे काम करतील. मग वाट कशाची पहाताय? या टिप्स फॉलो करा आणि जिंका तिचे किंवा त्याचे मन. लेखबद्दल तुमचे मत अवश्य कॉमेंट करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?