' मानवजातीला काळिमा फासणारा रशियाचा भयंकर प्रयोग नेमका काय होता? जाणून घ्या! – InMarathi

मानवजातीला काळिमा फासणारा रशियाचा भयंकर प्रयोग नेमका काय होता? जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

विज्ञानाची जिज्ञासा असणे काही चुकीची गोष्ट नव्हे.मानव जातीच्या विकासासाठी अनेक मैलाचे दगड विज्ञानाच्याच मदतीने पार केले गेले आहेत.

अनेक भयानक शस्त्रक्रिया, औषधाचे प्रयोग, मिलिटरी इक्विपमेंटचे ट्रायल्स हे अखेरीस जीवित मानवा वरच केले जातात आणि त्यानुसार ते बाजारात इतरांसाठी उपलब्ध केले जातात.

एवढंच कशाला, आता जी कोरोनाची साथ पसरली त्यात अनेकांनी कोरोनाच्या लसीच्या ट्रायलसाठी स्वतःहुन त्या प्रयोगात सामील झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण आज एक सेफ लस घेत आहोत.

 

covid vaccine inmarathi

 

अशी कैक उदाहरण देता येतील. पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एक चांगली तर एक वाईट. विज्ञानाचा जेवढा चांगल्या साठी वापर होतो तेवढाच वाईटसाठी सुद्धा होत आहे.

तर अशाच एका प्रयोगात रशियाने म्हणजेच तत्कालीन सोवियत युनियनने अमानवी कृत्याची परिसीमा गाठली होती. काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा.

दुसऱ्या महायुद्ध काळातल्या नकोशा घटना म्हणजे, ज्यूंच्या कत्तली, जर्मनीचे विभाजन, पर्ल हार्बरवर हल्ला आणि हिरोशिमा-नागासाकीवर अणुहल्ला सारख्या घटना अधोरेखित होतील.

हे ही वाचा काँग्रेस काळात एका रॉकेट सायंटिस्टला “देशभक्तीची किंमत” चुकवावी लागली होती..

पण याही पेक्षा भयानक घटना २००९ साली उजेडात आली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तत्कालीन सोव्हिएत रशियाकडून एक विचित्र प्रयोग राबवला गेला ज्याला ‘रशियन स्लिप एक्सपरिमेन्ट’ म्हणून ओळखले जाते.

 

russian sleep experiment inmarathi

 

१९४० मध्ये सोव्हिएत संघाने युद्धात पकडल्या गेलेल्या कैद्यांपैकी पाच कैद्यांवर हा प्रयोग केला. महिना भर चालणाऱ्या या प्रयोगाच्या आधीच त्या कैद्यांना मारून टाकावे लागले होते.

याच ‘रशियन स्लिप एक्सपरिमेन्ट’ बद्दल आज आपण बघणार आहोत.

२००९ साली ‘क्रिपीपास्ता विकी’ नामक वेबसाईटने या घटनेचा उलगडा केला होता ज्याने साऱ्या जगाला हलवून सोडलं. काय होतं हे स्लीपिंग एक्सपरिमेन्ट?

१९४० मध्ये केल्या गेलेल्या या प्रयोगात सोव्हिएत युनियनने युद्ध कैद्यांना वापरायचे ठरवले.

त्याप्रमाणे त्यांनी ५ युद्ध कैद्यांना निवडले, त्यांना हे सांगून राजी केलं गेलं, की हा प्रयोग त्यांनी ३० दिवसात यशस्वीपणे पूर्ण केला तर त्यांना परत त्यांच्या मायदेशी सोडून देण्यात येईल.

 

prisoners inmarathi

 

तर, या प्रयोगा दरम्यान त्या पाचही जणांना एका खोलीत बंद केले जाणार होते. त्या खोलीत खाण्या-पिण्या पासून सगळ्या सुख सुविधा होत्या. अट फक्त एकच होती,की त्यांना बसता आणि झोपता येणार नाही आणि तशी तरतूदसुद्धा करून ठेवली गेली होती.

कैद्यांना झोप येऊ नये म्हणून एका विशिष्ट गॅसचा पुरवठा ऑक्सिजन सोबत त्या खोलीत एका विशेष प्रमाणात केला गेला होता.

हा गॅस अजून काही नाही तर एक उत्तेजक केमिकल होतं, जे कैद्यांना जाग ठेवण्यास मदत करत असे. पहिल्या चार दिवसात कैद्यांमध्ये कोणताच बदल झालेला दिसला नाही.

पण पाचव्या दिवसापासून याचे परिणाम दिसून यायला लागले. सगळे कैदी अचानक बैचेन होऊ लागले. एवढं की नवव्या दिवशी एका कैद्याची ओरडून ओरडून गळ्याची व्होकल कॉर्डचं फुटली.

एकूणच कैद्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याने प्रथमदर्शनी दिसून यायला लागले. हळूहळू शास्त्रज्ञांनी त्या गॅसच प्रमाण वाढवायला सुरवात केली.

 

mental prisoners inmarathi

 

काही दिवस त्या खोलीतून विचित्र ओरडण्याचा आणि बडबडण्याचा आवाज येऊ लागला आणि अचानक एक दिवस बंद झाला.

परंतु खोलीत सोडल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रवाहामुळे ते जिवंत असल्याचे दिसून येत होते. असे अनेक दिवस सुरू होते.काहीच हालचाल आणि आवाज न दिसून आल्याने शास्त्रज्ञांनी त्या खोलीत जायचे ठरवले.

परंतु, त्यांनी जसं कैद्यांना आम्ही आत येत आहोत असे कळवले, तसे कैदी एका विचित्र पद्धतीने ओरडून त्यांना आत न येण्यास सांगू लागले आणि त्यांना आता स्वतंत्र नाही व्हायचं आहे असे सांगू लागले.

कैद्यांच्या अवस्थेचा विचार करता शास्त्रज्ञांनी त्या खोलीत जायचे ठरवले आणि जसं त्यांनी खोलीत प्रवेश केला तशी त्यांच्या पायाखालील जमीन सरकली.

हे ही वाचा – रशियाचे हे ४ हेरगिरी कारनामे ज्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला जेरीस आणलं

त्यांना जे जेवण-खाण ठेवलं होतं त्याला त्यांनी हात सुद्धा लावला नव्हता. जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता.अंगाचे लचके तोडून मांस पडले होते आणि त्यांपैकीच एक जण ते मांस खात होते.

 

sleep experiment inmarathi

 

सदरची भयावह परिस्थिती लक्षात येता त्या कैद्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यास खोलीच्या बाहेर काढले गेले.जसे ते खोलीच्या बाहेर आले तसे त्यांचे ओरडणे सुरू झाले.

ऑपरेशनसाठी त्यांना मोरफिनचे ८ इंजेक्शन दिले गेले तरी त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम नाही झाला. याच उपचारादरम्यान पाच पैकी तीन कैद्यांचा मृत्यू झाला.

कैद्यांची झालेली दशा बघता शास्त्रज्ञांनी हा प्रयोग थांबवण्याचे सुचवले, पण सैन्याच्या कमांडरने याला सपशेल नकार दिला. पुढे त्या दोन कैद्यांसोबत दोन रिसर्चरसुद्धा त्या खोलीत ठेवले गेले.

पण कैद्यांची विचित्र वागणूक आणि परिस्थिती बघता त्या रिसर्चर्सनी त्या दोघा कैद्यांना गोळ्या घालून ठार केले आणि प्रयोगाला फुल्ल स्टॉप लावला.

या प्रयोगाचा खुलासा कसा झाला?

२००९ साली क्रिपीपास्ता विकी नामक वेबसाईटवर याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आणि त्यात हे प्रकरण तत्कालीन सोव्हिएत रशिया कडून दाबले गेल्याचा आरोप केला गेला.

 

soviet russia inmarthi

 

रशियन प्रवक्त्याकडे याबाबत विचारले असता त्यांनी सपशेल नकार दिला. तसेच वेबसाईटकडे कोणताही पुरावा नसल्याने या घटनेवर प्रश्नचिन्ह लागले. या आर्टिकलच्या सत्यतेवर शंका घेण्याची मुख्यत्वे २ कारणं आहेत.

एक म्हणजे, त्या आर्टिकल मध्ये लिहिलं गेलं की, ऑपरेशन दरम्यान त्या दोन कैद्यांच्या हृदयात हवा गेली होती आणि हृदयात हवा गेली म्हणजे हार्ट अटॅकला आमंत्रण असतं हे कोणीही सांगेल.

हृदयात हवा गेल्यानंतरसुद्धा ते कैदी जगु कसे शकले? आणि दुसरं, जगात असलं कोणतंच उत्तेजित केमिकल नाही आहे जे कोणा मानुष्याच्या मानसिक आणि शारीरिक व्यवहारावर एवढा परिणाम करू शकेल.

 

russia kgb inmarathi

 

तर, ठोस पुरावा नसल्या कारणाने ही घटना लेखकाची कल्पना असल्याचे मानून दुर्लक्षित केले गेले. पण,जगात आजही असे अनेक जण आहेत जे केजीबी आणि सोव्हिएत रशियाच्या या कारवाया ओळखून आहेत आणि ही घटना झाली असल्याच्या शक्यतेला सहमती दर्शवतात.

===

हे ही वाचा जेंव्हा जपानच्या वासनांध सैन्याने चीनच्या ८० हजार स्त्रीयांच्या आब्रूवर हात घातला

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?