' चहावाल्याने पंतप्रधानांकडे अशी "विचित्र" मागणी का बरं केली? जाणून घ्या...

चहावाल्याने पंतप्रधानांकडे अशी “विचित्र” मागणी का बरं केली? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या वर्षी साधारण याच सुमारास देशव्यापी लॉकडाऊनमधून सूट मिळायला सुरुवात झाली होती. २-३ महिने संपूर्णपणे ठप्प असलेलं जीवनमान पुन्हा रुळावर येण्याची शक्यता निर्माण होऊ लागली होती. कोरोनाची वाढती आकडेवारी, हा विषय काहीसा बाजूला होऊन इतर विषय चर्चेत येऊ लागले होते.

अगदी त्याकाळापासूनच, वाढत असलेल्या एका गोष्टीबद्दल अनेकांना आकर्षण होतं, आणि ती आकर्षक गोष्ट म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पांढरीशुभ्र दाढी!

 

narednra modi inmarathi

 

कोरोनाचे आकडे घटू लागले, पण मोदी साहेबांची दाढी मात्र घटण्याचं नाव घेईना. मग पुढे बंगालच्या आणि इतर ४ राज्यांच्या निवडणुका होणार होत्या. त्यावेळी मोदीजींचं, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणावर दर्शन घडू लागलं आणि या दाढीविषयीची चर्चा सुद्धा तिच्या लांबीसारखीच वाढत गेली.

===

हे ही वाचा – आर्थिक-सामाजिक विषमता दूर करण्याचा मोदी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न…!

===

बंगाल निवडणुकांचा मुद्दा चर्चेचा भाग बनला आणि मग या दाढीला, काहींनी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली. पश्चिम बंगालमधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखा दिसण्यासाठी मोदींनी ही दाढी राखली आहे, अशाही चर्चा घडू लागल्या.

भाजपच्या काही विरोधी पक्षांनी सुद्धा काही काळ हा मुद्दा सोशल मीडियावर उचलून धरण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथांसारखं दिसून कधी रवींद्रनाथ होता येत नाही, अशी टीकाही घडून आलेली दिसली. निवडणुका संपल्या आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

 

rabindranath tagore inmarathi

 

चर्चा तर थांबल्या; कोरोनाची दुसरी लाट आली, तीदेखील ओसरू लागली, पण पंतप्रधान मोदी यांची दाढी काही कमी झाली नाही. बारामतीतील एका चहावाल्याला हीच गोष्ट खटकली असावी. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी साहेबांना दाढी करण्याची विंनती करणारं पत्र पाठवलं.

पत्र आणि मनीऑर्डर

बारामतीमध्ये अनिल मोरे नावाचे गृहस्थ राहतात. उदरनिर्वाहाकरिता चहाची टपरी चालवतात. शरद पवार यांच्या बारामतीमधील चहावाल्याने नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवलं, ज्यात त्यांनी दाढी करावी अशी विनंती करण्यात आली आहे. एवढंच नाही, तर आपल्या बचतीमधून मोरे यांनी १०० रुपयांची एक मनीऑर्डर सुद्धा यासोबत पाठवली आहे.

 

anil more tea vendor baramati inmarathi

 

मोदी यांनी वाढवलेल्या दाढीबद्दल या चहावाल्याला काय समस्या असेल, असा विचार करत असाल तर जरा थांबा. मोदींना हे असं पत्र आणि मनीऑर्डर पाठवणं आणि त्यांचं लक्ष वेधून घेणं, हा यामागचा उद्देश होता. हा कुठलाही पब्लिसिटी स्टंट नसून, या चहावाल्याने आपल्या काही मागण्या या पत्राद्वारे पंतप्रधानांपर्यंत पोचवल्या आहेत.

===

हे ही वाचा – गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांनी पत्रांमार्फत नरेंद्र मोदींवर आरोप केले होते

===

पत्रास कारण की…

हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यामागे मोरे यांचा कुठलाही चुकीचा किंवा प्रसिद्धीचा हेतू नाही. पंतप्रधानपद आणि त्याजागी विराजमान असलेल्या व्यक्तीविषयी त्यांना आदर असल्याचं ते म्हणतात. पण एखाद्या सामान्य व्यक्तीच्या मागणीकडे लक्ष वेधलं जावं म्हणून हा पत्रप्रपंच आणि मनीऑर्डर पाठवण्याचा प्रकार केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेकांचे रोजगार आणि जीवनमान यामुळे विस्कळीत झालं आहे. आयुष्य ठप्प झालेल्या, अडचणीत असलेल्या अशा लोकांसाठी सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावेत अशी मोरे यांची मागणी आहे.

 

narendra modi inmarathi

 

सरकारच्या मदतीशिवाय जीवनमान पुन्हा सुरळीत होऊ शकत नाही, आणि यासाठी आधी काही वेगळं करण्याची आवश्यकता नसल्याचं ते म्हणतात. सरकारने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली, तर हे सगळे प्रश्न सुटतील असं त्यांचं म्हणणं आहे.

याच सगळ्यासाठी रीतसर मागणी आणि विनंतीवजा पत्र त्यांनी मोदींना पाठवलं आहे.

एखाद्या सामान्य व्यक्तीच्या विनंतीपत्राला न्याय मिळण्यासाठी आणि ते लोकांच्या नजरेत यावं लागतं. याचसाठी दाढी करण्याची विनंती आणि मनीऑर्डर सोबत जोडली असल्याचं मोरे यांनी नंतर स्पष्ट केलं.

पंतप्रधानपद हे देशातील सर्वोच्च पद असून, त्या पदाचा किंवा नरेंद्र मोदी यांचा कुठलाही अपमान करण्याचा मोरे यांचा हेतू नाही. लॉकडाऊनमुळे ज्यांचं आयुष्य उध्वस्त होऊ पाहतंय, अशा ५ लाख कुटुंबांना त्यांच्याकडून आधार मिळावा, एवढीच माफक अपेक्षा त्यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढणाऱ्या दाढीप्रमाणेच देशातील रोजगार आणि लसीकरणाचा वेगही वाढावा अशी अपेक्षा अनिल मोरे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. 

 

vaccination drive in india

===

हे ही वाचा – मोदी लसीकरणाबद्दल मौन का पाळून आहेत? वाचा या उत्तरात लपलेलं आंतरराष्ट्रीय षडयंत्र!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?