' अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अविश्वसनीय कहाणी!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अविश्वसनीय कहाणी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतीय संस्कृतीप्रमाणे जगातील अनेक संस्कृतींमध्ये पुनर्जन्माची संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसून येते. पुनर्जन्म म्हणजे क्रम-चक्राचा नियम मानला जातो. म्हणजे काय, तर तुम्ही पूर्व जन्मात जी काही चांगले वाईट काम करता त्यांची फळे तुम्हाला त्या जन्मात मिळत नाहीत. त्यामुळे तुमचा पुनर्जन्म होतो आणि त्या जन्मात तुम्हाला तुमच्या पूर्वजन्माच्या कर्माप्रमाणे शुभ-अशुभ फळे मिळतात अशी ही एकंदर संकल्पना!

rebirth-marathipizza
blog.thearyasamaj.org

सध्याच्या आधुनिक जमान्यात मात्र ही संकल्पना फार पोकळ संबोधली जाते. त्यामुळे समर्थनापेक्षा या संकल्पनेचा विरोध करणारा गट अधिक आहे. असो पुनर्जन्म होतो की नाही तो भाग वेगळा, त्यात आपण न पडता आपण थेट आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू.

तुम्हाला अमेरिकेचे महान राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्याबद्दल ठावूक असेलच. त्यांचा संघर्षमय प्रवास आजही प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरतो. अश्या या महान व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू मात्र दुर्दैवीरित्या झाला. १५ एप्रिल १८६५ रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. १९५० साली भारतीय संत श्री परमहंस योगानंद यांनी आपल्या एका भाषणामध्ये अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची कहाणी सांगितली होती आणि मुख्य गोष्ट म्हणजे श्री परमहंस योगानंद यांच्या या वक्तव्यामधील सत्यता अनेक लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्या संदर्भात आश्चर्यकारक सत्य गोष्टी आढळून आल्या.

abraham-lincon-marathipizza
britannica.com

संत श्री परमहंस योगानंद यांच्या म्हणण्यानुसार,

अब्राहम लिंकन आपल्या पूर्वजन्मामध्ये हिमालयात वास्तव्य करणारे योगी होते. ज्यांचे ध्येय होते जाती आणि वंशभेद समाजातून हद्दपार करणे. परंतु हे ध्येय पूर्ण करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून आपले हेच अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी अब्राहम लिंकन यांच्या रूपामध्ये त्यांचा पुनर्जन्म झाला.

अब्राहम लिंकन यांच्या रुपात त्यांनी अनेक महान कार्ये केली आणि आपले पूर्वजन्मीचे आपले ध्येयकार्य सुरु ठेवले. पण या जन्मात देखील आकस्मिक मृत्यू मुळे त्यांचे ध्येय अपूर्ण राहिले. पुन्हा एकदा अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी चार्ल्स लिंडबर्ग यांच्या रुपामध्ये जन्म घेतला.

चार्ल्स लिंडबर्ग हे प्रसिद्ध अमेरिकन वैमानिक, संशोधक, लेखक, शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी, पर्यावरणवादी आणि समाजसेवी होते. जेव्हा चार्ल्स लिंडबर्ग हे ५ वर्षांचे होते तेव्हा अचानक रातोरात ते प्रसिद्ध झाले, लोक त्यांना ओळखू लागले. कारण ते पहिले असे व्यक्ती ठरले होते ज्यांनी अमेरिका ते पॅरीस असा नॉनस्टॉप विमान चालवण्याचा विक्रम केला होता. तब्बल ५८०० किमी चा हा प्रवास त्यांनी ३३ तास आणि ३० मिनिटांत पूर्ण केला. या भीम पराक्रमामुळे ते जगाच्या नजरेत आले. या अतुल्य कामगिरीसाठी त्यांना अमेरिकन सैन्यातर्फे Medal of Honor या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं. एकीकडे अब्राहम लिंकन यांनी आपल्या पूर्वजन्मामध्ये जे काही कष्ट घेतले, त्यांची फळे त्यांना त्या जन्मात चाखायला मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी चार्ल्स लिंडबर्ग यांच्या रुपात जन्म घेतला आणि त्यांच्या सर्व पूर्वजन्माच्या कार्याची फळे त्यांना मिळाली. त्यांना संपूर्ण जगणे अक्षरश डोक्यावर घेतले होते.

abraham-lincon-marathipizza01
(अब्राहम लिंकन आणि चार्ल्स लिंडबर्ग) rockymountainastrologer.com

संत श्री परमहंस योगानंद यांच्या या पुनर्जन्माच्या वक्तव्याने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.

parmhansa-yogananad-marathipizza
(संत श्री परमहंस योगानंद ) om-guru.com

अगोदर सांगितल्याप्रमाणे आजवर या वक्तव्याची सत्यता अनेकांनी पडताळली आणि त्यांना अब्राहम लिंकन आणि चार्ल्स लिंडबर्ग यांच्या जीवनात अनेक समान गोष्टी आढळून आल्या. आम्ही तुम्हाला खाली एक व्हिडियो लिंक देत आहोत. या व्हिडियोमध्ये अब्राहम लिंकन आणि चार्ल्स लिंडबर्ग यांच्या जीवनातील समानता आणि त्यांच्या पुनर्जन्मामागील सत्याचा आढावा घेण्यात आला आहे.

परमहंस योगानंद आणि अब्राहम लिंकन यांचा पुनर्जन्म

पुनर्जन्मासारख्या गोष्टीवर विश्वास बसणे अवघड परंतु अश्या काही प्रकरणांमुळे कधीही न उलगडणारे प्रश्न मात्र उद्भवतात आणी बैचेन करू सोडतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?