' या माणसाचे विचार आहेत नंबर एक, मात्र व्हिडिओ आहे "फेक", नक्की बघा.

या माणसाचे विचार आहेत नंबर एक, मात्र व्हिडिओ आहे “फेक”, नक्की बघा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

 

वरील व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यात व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती, स्वतःला लखनौमधील आयपीएस ऑफिसर म्हणून सांगत होती. व्हिडिओमध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे अनेकांना पटले होते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कसे राजकरणाकडे वळतात या विषयवार त्या व्यक्तीने सखोलपणे आपली मत मांडली आहेत.

कोण आहे व्हिडिओ मधील व्यक्ती?

नितीश राजपूत असे त्या व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव आहे.  विश्वास न्युज यांनी या व्हिडिओमधील व्यक्तीचा तपास केला, तेव्हा असे लक्षात आले की, ती व्यक्ती आयपीएस अधिकारी नसून एक बिजनेसमन आहे तसेच सोशल मीडियावर विपणन करणारी व्यक्ती आहे.

 

nitish inmarathi

हे ही वाचा – जॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…

व्हिडिओमध्ये नितीश राजपूत या नावाने वॉटरमार्क होता त्यावरून या व्यक्तीची संपूर्ण कुंडली काढली गेली. नितीश राजपूत या नावाने या व्यक्तीचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स चेक केले गेले. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला.

नितीश हा एका दिल्ली येथील राहणारा असून आयटी सेक्टरमध्ये त्याचा व्यवसाय आहे तसेच तो सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आणि प्रचलित आहे. बिलमोरा या फेसबुक पेजने हा व्हिडिओ व्हायरल केला होता.

व्हिडिओमध्ये नक्की काय म्हणाला आहे?

व्हिडिओमध्ये तो असं म्हणतो की १९९९ मध्ये ADR ने दिल्ली कोर्टानमध्ये राजकारणातील गुन्हेगारांबद्दलचे  पेटिशन टाकले होते, जे कोर्टाने स्वीकारले सुद्धा होते. परंतु या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले, देशाच्या एखाद्या समस्येसाठी हे पक्ष एकत्र येणार नाहीत. मात्र अशा गोष्टींसाठी ते एकत्र येतात.

 

supreme court inmarathi

 

आपल्या कायद्यानुसार जो पर्यंत एखाद्या व्यक्तीवर झालेले आरोप सिद्ध होत नाहीत, तो पर्यंत ती व्यक्ती निर्दोष असते. एखाद्या व्यक्तीवर जर केस चालू असेल तर त्या  व्यक्तीला सरकारो नोकरी मिळत नाही. राजकारणात जाण्यासाठीहे नियम लागू पडत नाही.

तो पुढे असेही म्हणाला की ,ADR च्या अहवालानुसार एखादे गुन्हेगारीशी संबंधित असलेली व्यक्ती निवडणूक जिंकायची शक्यता जास्त असते.

नेटकऱ्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत?

नेटकरी कायमच ज्या गोष्टी लोकांच्या हितासाठीच्या असतात त्याबद्दल नेहमी सकारात्मक प्रतिक्रिया देत असतात. राजकरण हा विषय तसा रोजचाच विषय असतो चर्चेचा, मात्र सगळ्यांना त्यातील मागची बाजू माहित नसते. त्यामुळे या व्हिडिओवर लोकांनी चांगल्या प्रतिकिया दिल्या आहेत.

 

tweet 3 inmarathi

 

नेटकर्यांना एखादा व्हिडिओ आवडल्यास तसेच  त्यांना आवडणाऱ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी ते कमेंट मध्ये तो विषय टाकतात. त्यामुळे व्हिडिओ टाकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा नवनवे विषय मिळतात.

 

tweet 4 inmarathi

हे ही वाचा – ‘‘कृपया राजकारण करू नये’… : राज्यसरकारची लाचारी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न!

व्हिडिओमध्ये मांडलेली मत ज्यांना पटतात ते लगेचच कमेंटमध्ये सांगून मोकळे होतात.

आज एकूणच देशाचं राजकरण ढवळलं गेलं आहे. कोरोना नावाचा आजरा थैमान घालत असताना सुद्धा  राजकारणी मात्र निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. आपल्या राज्यात जे सरकार आहे त्यांच्या कारभाराचे रोज नवे उदाहरण दिसून येते.

या व्हिडिओ मधील मुलगा जे सांगतो आहे ते आज अनेकांना पटेल, त्यामुळे ज्यांनी हा बघतील नसेल त्यांनी हा पूर्णपणे बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?