' भायखळा, विलेपार्ले, कुर्ला ही असली स्टेशनची नावं नेमकी आली कुठून? – InMarathi

भायखळा, विलेपार्ले, कुर्ला ही असली स्टेशनची नावं नेमकी आली कुठून?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबई म्हणलं की लोकल हे समीकरण आहे आणि लोकल म्हणलं की रेल्वेस्थानकांची चिरपरिचित नावं आठवतात. मुंबईबाहेरील लोकांना ही विचित्र नावं ऐकायला गंमतीशिर वाटत असलि तरिही या प्रत्येक नावामागे एक गोष्ट आहे. सेंट्रल लाईनवरील रेल्वेस्थानकांच्या नावांचा हा इतिहास-

मुंबईची लाईफलाइन अर्थात लोकल मुंबापुरीतून मुख्यत्वे दोन मार्गांवरून धावतेही आणि मुंबईला विभागतेही. तुमचा रहाण्याचा स्तर तुम्ही कोणत्या “लाईनवर रहाता यावर जोखला जातो. अलिकडे कोविड काळात रेल्वेच्या इतिहासात प्रथमच ही लोकल इतका दीर्घकाळ शांत होती. अन्यथा तिच्या जन्मापासून ती अविरत लाखो करोडो प्रवासी अंगाखांद्यावर घेत प्रवास करते आहे.

 

mumbai thane local inmarathi

 

मुंबईत यायचं तर लोकलचा प्रवास करता येणं, ही लोकल संस्कृती अंगात मुरवून घेणं अपरिहार्य आहे. याचं कारण, मुंबई आणि उपनगरांना जोडणारी ही लोकल प्रवासासाठी सर्वात स्वस्त आणि जलद असा पर्याय आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे अशा दोन मार्गांवरून ही लाईफ़लाईन धावते. महिलांसाठीचा डबा असो की या डब्यांमधून गायली जाणारी भजनं असोत की पत्त्यांचे रंगणारे डाव असोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लोकल आणि तिचे नियमीत प्रवासी हे एक वेगळं जग आहे आणि मुंबईबाहेरील लोकांना तिचं नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. तसेच ही रेल्वे ज्या स्थानकांवरून जाते त्यांची नावंही मुंबईबाहेर कुतुहलाचा विषय असतात. मुंबईत रहाणार्‍या आणि लोकलनं नियमीत प्रवास करणार्‍यांनाही या नावांमागचा इतिहास कदाचित माहित नसेल. आज जाणून घेऊया ही नावं कशी पडली किंवा वापरात आली.

१ – सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-

सर्वात आधी या स्थानकाचं नाव बोरीबंदर असं होतं. नंतर राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाचा सुवर्णमहोत्सव चालू असताना तिच्या सन्मानार्थ याचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस अर्थात व्हिटी असं करण्यात आलं.

त्यानंतर १९९६ साली पुन्हा एकदा या स्थानकाचं नामांतर होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलं. या स्थानकाला मुंबईची शान मानलं जातं.

 

cst station inmarathi

हे ही वाचा – चेन स्नॅचिंग असो वा ट्रेन रोमियो, या देवदुताशिवाय स्त्रियांना लोकलप्रवास सुरक्षित झालाच नसता!

स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना म्हणून या वास्तूकडे पाहिलं जातं. अत्यंत भव्य आणि प्रशस्त असं हे रेल्वेस्थानक आहे. रात्री याठिकाणी जो रंगीत लायटिंगचा झोत फेकला जातो त्यात तर हे स्थानक आणखिनच सुंदर दिसतं.

 

२ – चर्चगेट-

सेंट्रल लाईनवर जसं सीएसटी हे महत्वाचम स्थानक आहे तसं वेस्टर्न लाईनवर चर्चगेट आहे. फ्लोरा फाऊंटनजवळ सेंट थॉमस कॅथड्रल नावाचं एक चर्च होतं. या चर्चवरून या स्थानकाचं नाव चर्चगेट असं ठेवण्यात आलं.

churchgate inmarathi

 

३ – करी रोड-

सी. करी यांच्या नावावरून या स्थानकाचं नाव करी रोड ठेवण्यात आलं. १८६५ ते १८७५ या कालखंडात त्यांनी जीआयपी, बीबीसीआय या रेल्वेकंपन्यांच्या देखभालीचं काम सांभाळलं. त्यांच्या नावावरून हे रेल्वेस्थानक करी रोड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

 

kari road inmarathi

 

४ – भायखळा-

या नावाबाबत दोन कथा सांगितल्या जातात. एक म्हणजे भाय नावाची व्यक्ती आणि इथला उथळ भाग खळं नावानं ओळखला जात असे. भाय खळा असं नाव यावरून पडलं असावं.

दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की याठिकाणी धान्याची कोठारं अर्थात खळी मोठ्या प्रमाणात होती आणि यांचा मालक भाय नावाची व्यक्ती होती त्यावरून या भागाला भायखळा हे नाव पडलं. ब्रिटिशांनी १८५८ मधे याठिकाणि रेल्वेस्थानक उभारल्यावर त्याला भायखळा हेच नाव दिलं.

 

byculla inmarathi

 

५ – दादर-

दादरचं महत्व म्हणजे मध्य आणि पश्चिम रेल्वेचा दुवा असणारं हे एकमेव स्थानक आहे. दादरचं नाव दादर कसं पडलं याची गोष्ट अशी सांगितली जाते की, माहिम आणि परळ यांना जोडणारा पूल बांधण्यात आला. मराठीत दादर म्हणजे पायर्‍या. या पुलाच्या पायर्‍यांवरून दादर नाव पडल्याचं सांगितलं जातं.

 

dadar inmarathi

 

पूर्वी या परिसरालाही माहिम म्हणूनच ओळखलं जात असे. मुंबई ज्या सात बेटांची बनली आहे त्यापैकी एक म्हणजे माहिम बेट. पोर्तुगीज राजवटीत या बंदराला फ़ार महत्व होतं. १५९६ साली या ठिकाणी पोर्तुगीजांनी नोस्सा सेन्होरा दे सॅव्हॅको हे चर्च बांधलं. आज हे चर्च पोर्तुगीज चर्च म्हणून प्रसिध्द आहे.

६ – घाटकोपर-

या परिसरातील लहान टेकड्यांमुळे याला घाटकोपर हे नाव पडलं. मराठीत घाट म्हणजे डोंगर आणि घाट के उपरचा अपभ्रंश होऊन घाटकोपर हे नाव पडलं. पुढे याठिकाणी रेल्वेस्थानक झाल्यानंतर हेच नाव त्याला देण्यात आलं. आज घाटकोपरहून मेट्रोही जाते. लोकल बदलून इथून मेट्रोने अंधेरीला जाणं सोयीचं झालं आहे.

 

ghatkopar inmarathi

 

७ – ग्रॅण्ट रोड-

हा परिसर पूर्वी अत्यंत ओसाड होता. इथे पक्क्या सडका बांधून हा भाग गिरगावला जोडण्यात आला आणि हे काम मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅण्ट यांनी केलं. त्यांच्या नावावरून त्यांच्या सन्मानार्थ या परिसराला ग्रॅण्ट रोड हे नाव देण्यात आलं आणि रेल्वेस्थानकाचं नावही हेच ठेवण्यात आलं.

 

grant road inmarathi

 

८ – विलेपार्ले-

ऐकली तर गंमत वाटेल. पण मुळात पार्ले नावच अस्तित्वात नाही. विले पावडे या पोर्तुगीज शब्दाचा अपभ्रंश होत पावडेचं पार्ले झालं. याठिकाणी जी वसाहत होती तिला विले पावडे म्हणलं जायचं. विले म्हणजे वसाहत आणि पावडे म्हणजे झोपडी. इथल्या वसाहतींना विले पावडे या कारणासाठीच म्हणलं जात असे. आज हा परिसर उच्चभ्रू आणि रहाण्यासाठी प्रतिष्ठीत, महागडा म्हणून परिचित आहे.

 

villeparle inmarathi

 

९ – सायन/ शिव-

मराठीत शिव म्हणून ओळखलं जाणारं हे गाव पूर्वी मुंबई आणि साल्सेत्ते बेटांची शिव अर्थात सीमा म्हणून ओळखलं जात असे आणि यावरूनच याचं नाव शिव पडलं. नंतर ही बेटं जोडल्यानंतरही हेच नाव कायम राहिलं. १५४३ साली पोर्तुगीजांनी या बेटावर कब्जा मिळवल्यानंतर सियओ या इस्त्राएलच्या पर्वतावरून या ठिकाणाला सायन हे नाव दिलं.

 

sion inmarathi

 

१० – कुर्ला-

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणार्‍या खेकड्याच्या एका प्रकारावरून- कुर्ल्यावरून या पर्सराला कुर्ला हे नाव पडलं.

 

Kurla_railway_station inmarathi

हे ही वाचा – कोणीतरी रागाने शिव्या दिल्या आहेत अशी वाटणारी रेल्वे स्थानकांची नावे.. जाणून घ्या…

गेले कित्येक वर्ष अनेक प्रवासी या स्टेशनवरून जात होते. कितीही गर्दी असो पाऊस असो या सगळ्याची पर्वा न करता प्रवासी ट्रेन मधून जात होते. मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाने सुरु असलेल्या या रुटीनमध्ये खंड पाडला. लोकल सेवा सगळ्यांनसाठी जेव्हा सुरु होईल तेव्हा खऱ्या अर्थाने लोक पुन्हा एकदा नव्याने या स्टेशनवरून जातील.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?