' “ब्राह्मणवाद मुळासकट उखडून काढला पाहिजे” – NRI अभिनेत्याच्या विधानामागील सत्य! – InMarathi

“ब्राह्मणवाद मुळासकट उखडून काढला पाहिजे” – NRI अभिनेत्याच्या विधानामागील सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका मुलाखतीत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक सुजय डहाके याने एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं, आठवतंय का? आम्ही आठवण करून देतो.

त्याच्या त्या मुलाखतीतील म्हणण्यानुसार “मराठी मनोरंजनसृष्टीत केवळ एका ठराविक जातीच्या लोकांनाच (म्हणजेच ब्राम्हण कलाकारांना) प्राधान्य दिलं जातं, मराठी चित्रपट असो किंवा सिरियल सगळीकडेच या लोकांची कंपूशाही आपल्याला बघायला मिळते!”

सुजय यांच्या ह्या स्टेटमेंटनंतर मराठी इंडस्ट्रीत प्रचंड खळबळ माजली, सगळीकडूनच सुजयवर टीका व्हायला लागली, कित्येक मराठी कलाकारांनी सुजयच्या टीकेचं समर्थन केलं तर काहींनी सडकून टीका केली.

 

sujay dahake inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा साजूक तूपाच्या धोतरात गुंतलेल्या चित्रपटसृष्टीत गावरान झुणका भाकरीचा धुडगूस!

काहीशी अशीच मध्यंतरी चर्चा सोशल मीडियावर होत होती, कन्नड अभिनेता चेतन कुमार याने त्याच्या सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हीडियो शेयर केला आणि त्यात ब्रम्हणवाद आपल्याला मुळासकट उखडून काढायला हवा अशी टीका केली.

यावरून त्याच्यावर एका बाजूने टीका होतिये तर एका बाजूने लोकं त्यांच्या या व्यक्तव्याला समर्थन देत आहेत, जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

कोण आहे चेतन कुमार?

चेतन कुमार यांना चेतन अहिंसा या नावानेदेखील ओळखलं जातं, कन्नड चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या या कलाकाराने ब्राम्हणवादाच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर मागास वर्गाकडून त्यांना बराच पाठिंबा मिळाला, पण चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी यावर व्यक्त व्हायचं टाळलं.

त्यांनी केलेल्या भडक वक्तव्यामुळे ब्राम्हण डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष आणि इतर काही संस्थांनी चेतन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, चेतन हा एक “ओव्हरसीझ नागरिक” असल्याकारणाने त्याला पुन्हा अमेरिकेत धाडावे अशी मागणी होताना दिसत आहे.

 

chetan kumar inmarathi

 

अमेरिकेत जन्म आणि शिक्षण घेतलेले ३७ वर्षीय चेतन यांनी २००७ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. २०१३ सालचा त्यांच्या ‘मायना’ या सिनेमाचं कौतुक झालं. महेश बाबू यांनी दिग्दर्शित केलेल्या एका सिनेमात चेतन यांनी काम केलं पण बॉक्स ऑफिसवर तो सिनेमा सपशेल आपटलाच.

सामाजिक जाण असलेले चेतन हे सामाजिक कार्यातसुद्धा तितकेच मग्न होते, चेतन यांचा चेहरा अजूनही तितका लोकप्रिय नाही, ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जास्त ओळखले जातात असं पटकथालेखक मंजुनाथ रेड्डी उर्फ मंसोरे यांनी स्पष्ट केलं होतं.

नेमकं काय वादग्रस्त विधान केलं आहे?

चेतन यांनी सोशल मीडियावर एक व्हीडियो शेयर केला ज्यात त्यांनी म्हंटलं होतं की – “ब्राम्हणवादाने फक्त आणि फक्त बसवेश्वर आणि बुद्ध यांचे विचार संपवण्याचे काम केले!”

यानंतर त्यांनी एक ट्विट करत एक पाऊल पुढे जाऊन म्हणाले की ” स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचा स्वीकार ब्राम्हणवाद कधीच करत नाही, सगळेच जण समान पद्धतीने जन्म घेतात त्यामुळे फक्त ब्राह्मण सर्वोच्च आहेत बाकीचे अस्पृश्य आहेत असं म्हणणं योग्य नव्हे, आपण मुळासकट हा ब्राम्हणवाद उखडून काढला पाहिजे.”

 

chetan ahimnsa inmarathi

 

चेतन यांच्या या वक्तव्याला आणखीन एक कन्नड अभिनेते उपेंद्र यांनी पुष्टी दिली, त्यांच्याही मते या सगळ्या प्रॉब्लेमच्या मागे ब्राम्हणवाद हाच कारणीभूत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

या दोन्ही अभिनेत्यांच्या या स्टेटमेंटमुळे सध्या बरीच चर्चा सोशलमीडियावर चांगलंच वातावरण तापलं होतं.

तर आमची टीका ब्राम्हणांवर नसून ब्राम्हणवादावर आहे असंही स्पष्टीकरण चेतन यांनी नंतर दिलं, चेतन हे एक ओव्हरसीज सिटीजन असल्या कारणाने ते अशा कोणत्याही चळवळीत भाग घेऊ शकत नाही असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं होतं.

आणि त्यामुळेच त्यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली गेली! यानंतर तातडीने चेतन यांना समन धडण्यात आले आणि Basavanagudi police station इथे त्यांची तब्बल ३ तास कसून चौकशी करण्यात आली.

चौकशी पूर्ण न झाल्याने ऑफिसर्सनी याविषयी काही सांगण्यास नकार दिला, चेतन यांचा जवाब नोंदवला गेला असून तिथून बाहेर पडताच चेतन यांनी एक ट्विट करत याबद्दलची खदखद व्यक्त केली.

 

chetan inmarathi

 

आपण सत्याच्या बाजूने बोलतोय त्यामुळेच आपल्यावर हे दडपशाही लादली जात आहे असा आरोप त्यांनी या ट्विटमधून केला आहे.

हे ही वाचा ख्रिस्ती धर्मात गेलेल्या ब्राम्हण कुटुंबातील मुलगी, अशी बनली पाकिस्तानी पंतप्रधानाची पत्नी

कन्नड चित्रपटसृष्टीचे मौन :

कन्नड चित्रपटसृष्टी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणं टाळते आणि या अशाच परिस्थितीत चेतन यांनी मागासवर्गीय आणि आदिवासी यांच्यासाठी उभं राहणं हे कितपत योग्य की अयोग्य यावर कोणताही कन्नड कलाकाराने भाष्य करायचे टाळले.

पटकथा लेखक मंसोरे आणि कन्नड अभिनेत्री श्रुती हरिहरन यांनी मात्र चेतन यांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा दर्शवला.

मंसोरे यांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांच्या इंडस्ट्रीत कोणाला भांडणात रस घ्यायला आवडत नाही, मग ती metoo movement असो किंवा आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांचे प्रश्न!

श्रुती हरीहरन या अभिनेत्रीने तर पैसा प्रसिद्धीसाठी हे सगळं करणाऱ्यांपैकी चेतन नाहीत असं सांगून त्यांची एक वेगळीच बाजू लोकांसमोर मांडली.

 

sruthi hariharn inmarathi

 

या दोघांच्याही मते चेतन यांनी ब्राम्हण लोकांवर टीका केलेली नसून ब्राम्हणवादाने चित्रपटसृष्टीत कशी पाळंमुळं रोवली यावर टीका केली.

हा वाद आणखीन कोणतं वळण घेणार आहे ते ठाऊक नाही, पण एकंदरच कलाविश्वातल्या लोकांमध्ये असलेली ही अढी घातक आहे हे नक्की. याआधी सुजय डहाकेने या विषयाला वाचा फोडली तर नंतर कन्नड कलाकारांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला.

जात, पात, धर्म, रंग असा भेदभाव न करता समाजाला प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कलाक्षेत्रात इतकी कटुता नेमकी का यावी? हे सगळं खरंच आहे की यामागेही कोणतं षडयंत्र आहे? हे येणारा काळच ठरवेल!

===

हे ही वाचा वर्णभेदासारख्या गंभीर विषयावर ताशेरे ओढणारा हा सिनेमा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?