' रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट 'मातोश्री'वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज पुन्हा एकदा ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून त्यांची तब्बल ११.३५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे, NSEL घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती ईडीने दिली आहे.

मध्यंतरी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनाभवनासमोर हाणामारी झाली आणि त्यानंतर बड्या नेत्यांनी सुद्धा शाब्दिक युद्ध पुकारून हा विषय अधिक मोठा केला. आपसूकच २०१९ पासून नेहमीच चर्चेत असलेल्या शिवसेना-भाजपच्या नात्यावर पून्हा नव्याने चर्चा सुरु झाली.

‘भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊच शकणार नाहीत’ पासून ‘सगळे वाद बाजूला सारून या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यायलाच हवं’, अशा दोन्ही टोकांच्या भूमिका सामान्य लोकांच्या चर्चेत मांडल्या गेल्याचं आजूबाजूला पाहायला मिळतंय.

पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि ठाण्यातील आमदार असलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र हाच  चर्चेचा विषय झाला होता.

 

uddhav thackrey inmarathi

 

महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे, काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे, आणि केंद्रीय संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा केवळ शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे लागला आहे, असे मुद्दे या पत्रात मांडले गेले आहेत.

प्रताप सरनाईक यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करणंच श्रेयस्कर असल्याचं या पत्रात उद्धव ठाकरे यांना म्हटलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण थेट मातोश्रीवर असं वजन असणारा हा शिवसेनेचा नेता नक्की आहे तरी कोण? काय आहे त्यांचा इतिहास? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जेव्हा बाळासाहेबांना ‘थेट मातोश्रीवर’ जाऊन भेटतात…

===

रिअल इस्टेट ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी

शिवसेनेत प्रवेश करण्याआधी प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाग होते. १९८० च्या दशकाअखेरीस रिअल इस्टेटच्या व्यवसायात उतरलेल्या प्रताप सरनाईक यांनी जवळपास दशकभरानंतर म्हणजे १९९७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सलग दोनवेळा ते नगरसेवक म्हणून निवडून गेले.

जन्मभूमी वर्धा असलेल्या प्रताप सरनाईक यांची राजकीय कर्मभूमी म्हणून ठाण्याचं नाव सर्वप्रथम घ्यावं लागेल.

 

pratap sarnaik inmarathi

 

राष्ट्र्रवादीसोबत त्यांचा प्रवास २००८ पर्यंत सुरु राहिला आणि मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजकारणातील त्यांच्या वेगवान वाटचालीला आणखी बळ मिळालं. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले.

आज शिवसेनेच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी लिहिलेलं पत्र हे त्यांच्या राजकारणातील वजनाचं एक प्रतीक म्हणावं लागेल.

वडिलांनी केलं आहे आचार्य अत्रेंसह काम

प्रताप सरनाईक यांचे वडील बाबुराव सरनाईक हे लेखक होते. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि आजही अनेकांचे आदर्श असणारे उत्तम लेखक प्रल्हाद केशव अत्रे, म्हणजेच आचार्य अत्रे यांच्यासह त्यांनी कामदेखील केलं आहे.

 

acharya atre inmarathi

 

बाबुराव सरनाईक हे बाबूजी या टोपणनावाने प्रसिद्ध होते. काही दर्जेदार पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलं आहे. आचार्य अत्रे यांचे सहकारी असलेले बाबुराव मोठं प्रस्थ होतं हे वेगळं सांगायला नको.

===

हे ही वाचा – भाषण सुरू असताना ‘अजान’ सुरू होताच बाळासाहेब म्हणाले…

===

रिक्षाचालक ते करोडोंचा मालक

आज प्रताप सरनाईक यांची संपत्ती करोडोंच्या घरात पोचली आहे. आमदारकीचा अर्ज भरताना वेळोवेळी त्यांनी या संपत्तीची माहिती दिलेली आहे. मात्र आज करोडो रुपयांचा मालक असणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी एकेकाळी रोजीरोटीसाठी रिक्षा सुद्धा चालवली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या आठवणी जागवल्या होत्या. रिक्षाचालकाच्या सीटवर स्थानाप्पन होऊन तो फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. सामान्य परिस्थितीतून वर आलेले असल्यामुळे, त्यांची नाळ सर्वसामान्य नागरिकांशी जोडली गेली आहे, असं नक्कीच म्हणता येईल.

 

pratap sarnaik auto driver inmarathi

 

१९८४ ते १९८९ या काळात रिक्षाचालकाचा व्यवसाय करून त्यांनी स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला आणि प्रवाशांची सेवा सुद्धा केली. एकीकडे रिक्षाचालक म्हणून काम करणाऱ्या सरनाईक यांनी नंतर अंडा भुर्जीची गाडी सुद्धा टाकली होती. स्वतःच्या आणि इतरांच्या पोटाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

कुटुंब रंगलंय राजकारणात

डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेजात असल्यापासूनच प्रताप सरनाईक यांना राजकारणाची आवड होती. पुढे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे ते निकटवर्ती होते. अशा या राजकारणात मुरलेल्या माणसाचं कुटुंब राजकारणात रंगलं नसतं तरच नवल.

सरनाईक यांच्या पत्नी प्रतिषा सरनाईक या नगरसेविका आहेत. त्यांचा एक मुलगा विहंग सरनाईक हादेखील नगरसेवक असून युवासेनेच्या सचिवपदी कार्यरत आहे. दुसरा मुलगा विहंग हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. याच मुलाच्या नावाने, म्हणजेच विहंग ग्रुप ऑफ कंपनीज या नावाने ते रिअल इस्टेटच्या व्यवसायातही सक्रिय आहेत.

 

pratap sarnaik family inmarathi

 

राजकारणातील बडी असामी

राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकटवर्ती जितेंद्र आव्हाड यांच्याशी सरनाईक यांची खास मैत्री होती. त्यांची अजित पवार यांच्याशी असणारी मैत्री सुद्धा सर्वश्रुत आहे. या मित्रासाठी त्यांनी थेट हिरेजडित मोबाईलची खास भेट दिली होती, हेदेखील अनेकांना ठाऊक आहे.

सिद्धिविनायक मंदिरात दान करण्यात आलेला हा मोबाईल प्रताप सरनाईक यांनी लिलावात खरेदी केला आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना भेट दिला होता.

 

pratap sarnaik inmarathi

 

राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांचे खास असणारे प्रताप सरनाईक यांचं राजकारणातील वजन पक्ष बदलूनसुद्धा कायम राहिलेलं आहे. मूळचे वर्ध्याचे असूनही, ठाण्यात ते स्वतःचं चांगलं वजन राखून आहेत. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे अशा मोठ्या नेत्यांसह त्यांची चांगली मैत्री आहे.

===

हे ही वाचा – राज ठाकरेंच्या वेगवान राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागण्याची ५ कारणे जाणून घ्या!

===

त्यांच्या चढत्या राजकीय आलेखाचा फायदा त्यांना शिवसेनेतील मोठ्या स्थानासाठी सुद्धा झाला आहे. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांचेही ते निकटवर्ती झाले असून, पर्यायने मातोश्रीवरही त्यांचा रुबाब आहे.

 

pratap sarnaik and uddhav thackarey inmarathi

 

कधीकाळी वर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं आणि अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास हा नक्कीच प्रेरणादायक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?