' उत्तर कोरियावर आलंय उपासमारीचे मोठ्ठे संकट… प्रमुख कारणे जाणून घ्या! – InMarathi

उत्तर कोरियावर आलंय उपासमारीचे मोठ्ठे संकट… प्रमुख कारणे जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उत्तर कोरिया या देशाचं नाव कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तर या देशाचा सर्वात क्रूर हुकूमशहा किम जोंग ऊन आणि त्याचे अजब कायदे, उत्तर कोरिया हा कायम याच गोष्टींमुळे चर्चेत राहिला आहे.

इथल्या हुकुमशाही सत्तेने लोकांच्या कशा मुसक्या दाबलेल्या आहेत, अभिव्यक्ती वगैरे इथे कसं थोतांड आहे, समाज माध्यमांवर सरकारची कशी पकड आहे, गुन्हेगारांना इथे कडक शिक्षा कशा होतात?

 

North Korea Rules.Inmarathi3

 

या सगळ्याबद्दल आपण बरंच काही वाचलं असेल, ऐकलं असेल. एकंदरच उत्तर कोरिया या देशात अराजकता असूनही तिथली लोकं त्यांच्या सरकारला कसा पाठींबा देतात अशा मथळ्याचे लेखही आपण वाचले असतील.

हे ही वाचा जोक्सवर बंदी ते पॉर्नसाठी मृत्यूदंड, उत्तर कोरियाचे १४ विचित्र कायदे!

पण एवढं होऊनसुद्धा आज उत्तर कोरिया एका भयानक संकटातून जात आहे. food crisis म्हणजेच उपासमारीची पाळी आज उत्तर कोरियासारख्या प्रगत देशावर आली आहे, फक्त सामान्य लोकच नव्हे तर देशातल्या सैन्याचीसुद्धा अशीच बिकट अवस्था आहे.

या लेखातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की उत्तर कोरियाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली आहे? त्यामागची आर्थिक आणि राजकीय बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करुयात.

 

north korea food crisis inmarathi

 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने चीन लगतच्या सगळ्या सीमा बंद केल्या आणि त्यामुळे आवश्यक गोष्टींचा तुटवडा देशात जाणवू लागला. तसेच कोरोना आणि या वर्षी आलेल्या काही समुद्री वादळामुळेसुद्धा इथल्या शेतीला बराच मोठा फटका बसला आहे.

शेतीचं नुकसान आणि महामारी यामुळे आता उत्तर कोरियामध्ये फक्त २ महीने पुरेल एवढंच रेशन बाकी असल्याचं सांगितलं जातंय. यामुळेच देशातली महागाई रोज नवनवे उच्चांक गाठतान दिसत आहे.

चहाची किंमत ५१०० रुपये तर कॉफीची किंमत ७३०० रुपये एवढी झाली असून एक किलो केळी घेण्यासाठीसुद्धा तब्बल ३३०० रुपये लोकांना मोजावे लागत आहेत.

 

kim jong un inmarathi

 

ही सगळी परिस्थिती बघता १९९० च्या काळात झालेली उपासमार लोकांना आठवत आहे आणि त्यामुळे लोक आणखीनच घाबरले आहेत. ९० च्या काळात अशाच उपासमारीने तब्बल ३० लाख नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

सध्या या देशात चीनकडून येणाऱ्या तेलाची आणि पिठाची कमी खूप आहे शिवाय दिवसेंदिवस तांदूळ आणि इंधनाचीसुद्धा चणचण भासू लागली आहे.

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने ही बिकट अवस्था मान्य केली खरी पण याचं खापर कोरोना महमारी आणि नैसर्गिक संकट यावर फोडून हात वर केले आहेत.

इतकंच नाही तर उत्तर कोरियाच्या शेतकऱ्यांकडे एक अजबच मागणी करण्यात आली आहे, शेतकऱ्यांनी त्यांची २ लीटर लघवी फर्टिलायजर्स निर्मिती दान करावी अशी मागणीदेखील या सरकारकडून होताना दिसत आहे.

 

rice farmers inmarathi

 

एकंदरच कोरोना महामारीमुळे सीमा बंद असल्याने बाहेरच्या देशातून आणि खासकरून चीनकडून मिळणाऱ्या अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे परिस्थिति आणखीन हाताबाहेर जाऊ शकते असंही किम जोंग ऊन याने घोषित केलं आहे.

हे ही वाचा वयाच्या ५व्या वर्षीच सैन्यातल्या जनरलचा पोशाख, वाचा सत्ताधुंद नेत्याचा प्रवास!

एकेकाळी झिंम्बाब्वे या देशातही अशीच परिस्थिती होती, किंबहुना तिथे अजूनही त्यात फार सुधारणा नाही. तिथल्या राजकारणामुळे आणि आर्थिक धोरणांमुळे अशीच महागाई वाढली होती, तिथेही एक ब्रेड विकत घ्यायला लोकांना लाखो हजारो खर्च करावे लागत होते.

पण ही अशी अवस्था उत्तर कोरियासारख्या देशावर येईल याची कल्पना कुणीच केली नसेल. अर्थात या सगळ्याला त्यांचं सरकार आणि त्यांची कठोर धोरणंदेखील जबाबदार आहेत.

लवकरात लवकर कोरियाचा हा प्रॉब्लेम दूर होऊन शक्य होईल तितकी मनुष्यहानी टळो अशीच आपण प्रार्थना करू शकतो, बाकी तिथल्या लोकांची सोय करून परिस्थिति नियंत्रणात आणणं हे केवळ तिथल्या सरकारच्या हातात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?