' वॉरंट घेऊन CBI लालूंना अटक करायला गेली आणि एका भलत्याच संकटात अडकली! – InMarathi

वॉरंट घेऊन CBI लालूंना अटक करायला गेली आणि एका भलत्याच संकटात अडकली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बिहारचे माजी मुख्यमंत्री श्री लालू प्रसाद यादव हे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांना चारा घोटाळ्याप्रकरणी रांचीमधील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. एकेकाळी, भारतीय राजकारणावर सर्वात अधिक पकड आणि दबदबा असलेल्या नेत्यांपैकी लालू प्रसाद हे एक होते.

अगदी त्यांची भाषणाची स्टाईल ते सगळ्यात विचित्र असा चारा घोटाळा सगळीकडे लालू प्रसाद यादव अगदी अव्वल स्थानी होते. पण काळाचं चक्र फिरत राहतं.

 

lalu prasad inmarathi

 

यश असलं की अपयशही माणसाच्या नशिबात असतंच. आणि चांगला काळ सुरु असताना केलेली वाईट कृत्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला फळं भोगायला लावतातच. तसंच काहीसं सध्या लालू प्रसाद यादवांच्या आयुष्यात सुरु आहे.

९० च्या दशकात भारताच्या प्रत्येक गल्लीगल्लीत यांच चारा घोटाळ्याच्या चर्चा पेट घेत होत्या. भारताचं नेतृत्व त्याकाळी पंतप्रधान असलेल्या इंदर कुमार गुजराल यांच्या हातात होतं.

 

 

ते बिहारकडून राज्यसभा मेम्बर असल्याने त्यांना लालू प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार वागणं बंधनकारकच होतं त्यामुळे त्यांनीदेखील या घोटाळ्याची माहिती असूनही कोणतीच कार्यवाही केली नाही.

हे ही वाचा लालू प्रसाद फ्लर्ट करत पाकिस्तानी अँकरला चक्क “आती क्या घुमने?” म्हणाले होते…

गोष्ट आहे १९९७ ची. लालू त्या काळात बिहारचं मुख्यमंत्रीपद सांभाळत होते. मुख्यमंत्र्यांची भूमिका पार पाडण्यासाठी १५ ऑगस्टला त्यांच्या हातून झेंडावंदन व्हायचं होतं, पण अचानक त्यांच्या विरुद्ध CBI कडून अरेस्ट वॉरंट जरी करण्यात आलं.

 

cbi inmarathi

 

सी.बी.आय चे माजी राज्यपाल ए.आर.किडवाई यांनी हे आदेश जाहीर केले होते. पण इंदर कुमार गुजराल यांनी किडवाई यांच्यात हस्तक्षेप करून हे आदेश रद्द करायला लावले.

कोणतेही ठोस पुरावे CBI कडे नसल्याने हे आदेश रद्द करण्यात आले आहेत, असं सगळ्यांना सांगण्यात आलं. पण सी.बी.आय चे तत्कालीन संयुक्त निर्देशक उपेंद्रनाथ विश्वास यांना हे मंजूर नव्हतं.

आपल्याकडे असं अनेकदा घडलंय, जेव्हा एखाद्या लाचखोर आणि भ्रष्टाचारी नेत्याला वाचवण्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळ, पूर्ण सिस्टीम ठामपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे.

भ्रष्टाचाराची साखळी असते, त्यामुळे एक मासा जाळ्यात अडकला कि सगळेच मासे अडकणार असतात, म्हणून सगळे राजकारणी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. एकमेकांचे गुन्हे आणि अपराध लपवण्याचा प्रयत्न करत राहतात.

लालू प्रसाद यादवांच्या वेळेसही तेच होत होतं. पण म्हणतात ना, सत्य लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते लपवून ठेवता येऊ शकत नाही आणि अगदी तसंच घडलं.

विश्वास यांनी सगळे ठोस पुरावे गोळा केले आणि राजभावनावर जाऊन धडकले. त्यांनी ए.आर.किडवाई यांना पुन्हा लालू प्रसादांविरुद्ध कार्यवाही करण्यास प्रेरित केलं.

 

a r kidwai inmarathi

 

सगळे ठोस पुरावे हातात असल्याने, आता सी.बी.आयवर कोणाचाच दबाव पडणं केवळ अशक्य होतं. किडवाईंनी पुन्हा अरेस्ट वॉरंट जारी केलं आणि यावेळी, उपेंद्रनाथ विश्वास स्वतः सी.बी.आय टीम बरोबर बिहारकडे रवाना झाले.

गुजरालसुद्धा विश्वास यांना अडवू शकले नाही. लालू प्रसाद यादवांना जेल मध्ये जाताना बघणं, फक्त इतकंच त्यांच्या हातात शिल्लक होतं.

विश्वास आपल्याला अटक करण्यास निघाले आहेत, हि बातमी लालू प्रसाद यादव यांच्याकडे कधीच पोहोचली होती. तर एक मुत्सद्दी राजकारणी स्वतःच्या बचावासाठी काही तरी सोय करून ठेवणारच.

यादवांनी सुद्धा तेच केलं. सी.बी.आयची टीम जेव्हा लालू प्रसादांना अटक करण्यास त्यांच्या बंगल्याजवळ पोहोचली तेव्हा तिथे हजारोंच्या संख्येने लालूंचे चाहते आधीच येऊन पोहचले होते.

तुम्ही अजय देवगणचा रेड हा सिनेमा जर पहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल. त्या नेत्याला अटकेपासून वाचवण्यासाठी त्याचे चाहते जसे गोतावळा करून, अगदी लाठ्या,काठ्या अणि बंदुकी घेऊन सी.बी.आय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची वाट पाहत होते.

हे ही वाचा या ७ गाजलेल्या केसेस सीबीआय बद्दल आपल्या मनात विचित्र गुंता तयार करतात!

raid movie

 

तसंच काहीसं दृश्य १९९७ साली लालू प्रसाद यादव यांच्या बंगल्यावर बघायला मिळालं होतं.

सी.बी.आय अधिकाऱ्यांना बंगल्यात शिरून दाखवण्याचं चॅलेंज तिथे जमा झालेल्या लालूच्या चाहत्यांनी केलं. विश्वास मोठ्या आत्मविश्वासाने तिथे एका भाष्टाचारी नेत्याला जेरबंद करण्यास आलेले होते. त्यामुळे, काहीही झालं तरी रिकाम्या हाताने परतायचं नाही, हे त्यांनी आपल्या मनाशी पक्कं मनाशी ठरवलं होतं.

एकीकडे लालूंचे गुंड आणि दुसरीकडे सत्याच्या पक्षात असलेले सी.बी.आय अधिकारी. काय करावं हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता.

 

lalu 2 inmarathi

 

विश्वासांनी स्थानिक बिहार पोलिसांची मदत घेण्याचं ठरवलं. पण लालूच्या भीतीपायी, पोलिसांनी सुद्धा सी.बी.आयला मदत पुरविण्यास साफ नकार दिला.

बिहार पोलिसांवर सुद्धा वरून दबाव टाकण्यात आला होता. पण विश्वास काही हार मानणाऱ्यातले नव्हते. त्यांनी आता सैन्याची मदत घेण्याचं ठरवलं. आता सेनेशी संभाषण सुरु झालं. विश्वासांना सेनेकडून मदत मिळणं अपेक्षित होतं, पण तिथुनही त्यांना नकारच मिळाला.

 

indian army inmarathi

 

सेनेचे तत्कालीन अधिकारी आपल्या उत्तरात म्हणाले होते की फक्त आणि फक्त अधिकृत सिव्हिल अधिकाऱ्यांच्या आदेशांवरच सेना कार्यवाही करू शकेल. आम्ही अशी कोणालाही मदत पुरवू शकत नाही.

कुठुनच सहकार्य न लाभल्याने उपेंद्रनाथ विश्वासांना त्या वेळी लालूच्या अटकेचा हट्ट सोडून रिकाम्याहाताने परतावं लागलं होतं. यानंतर सी.बी.आयने लालू प्रसादांना कोर्टात खेचलं.

लालू प्रसाद ती केस हरले आणि कोर्टाने त्यांना तातडीने अटक करावं, कोणीही अडथळा आणल्यास ती व्यक्ती सुद्धा शिक्षेस पात्र राहील असा आदेश जाहीर केला. पण यावेळी लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच पोलिसांची शरणागती पत्करली.

 

lalu prasad 3 inmarathi

 

त्यांना १४ वर्षांचा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यात ७ वर्षांचा कारावास हा भारतीय दंड संहित्यानुसार व इतर ७ वर्षांचा कारावास भ्रष्टाचार अधिनियम कायद्यानुसार होता. याशिवाय त्यांच्या कडून ६० लाख रुपयांचा दंडसुद्धा आकारण्यात आला.

पुढे लालू प्रसाद जेलमध्ये गेले व त्यांच्या पत्नी राबडी देवींनी मुख्यमंत्री पद सांभाळून उर्वरित सत्र पूर्ण केलं. कोर्टाने आज या केसमध्ये सामील असलेल्या ३६ जणांना तुरंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लालू प्रसाद यादव यांना अद्याप शिक्षा सुनावली गेली नाहीये.

===

हे ही वाचा जेव्हा संघाचा कार्यकर्ता भारताच्या सर्वात शक्तिशाली दलित महिलेची आब्रू वाचवतो…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?