' सूर्यनमस्काराचे शरीराला होणारे हे फायदे आवर्जून वाचण्यासारखे आहेत

सूर्यनमस्काराचे शरीराला होणारे हे फायदे आवर्जून वाचण्यासारखे आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागच्या वर्षांपासून आपण सगळेच घरात अडकलो आहोत, जराशी मोकळीक मिळाली की लगेच निर्बंध लागत आहेत. आज सगळ्याच गोष्टी घरातच बसून होत असल्याने आधी होणारी धावपळ नक्कीच थांबली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मुलांच्या शाळा, नोकरदारवर्गाचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे, त्यामुळे आता या सगळ्याची सर्वांनाच सवय बनून गेली आहे. मध्यंतरी कडक निर्बंधांमुळे घराच्या बाहेर पडणे देखील मुश्कीलच बनले होते. घरातील वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याच्या समस्या देखील वाढत चालल्या आहेत.

 

corona lockdown inmarathi

 

गेल्या वर्षभरापासून जिम सुद्धा पूर्णपणे चालू नाहीत. त्यामुळे अनेक जिम व्यावसायिक सुद्धा चिंतेत आहेत. जिम बंद असल्याने लोकांच्या आरोग्यवर सुद्धा परिणाम होत आहे.

लोकांनी या नवीन चक्राला सुद्धा स्वीकारले आहे, त्यामुळे जसे काम घरातून करत आहेत त्याप्रमाणे आता स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील ते घेत आहेत. घरातल्या घरात योग करणे, घराच्या आसपास सायकलिंग करणे इत्यादी व्यायाम करताना दिसून येतात.

 

bamboo-cycle-inmarathi01

 

लहानपणापासून आपल्याला एक व्यायाम करायला आपले बुजुर्ग नेहमी सांगतात ते म्हणजे सूर्यनमस्कार, १२ आसनांचा असलेला हा व्यायाम आपल्या शरीराला आणि मनाला आणि आपल्या श्वासाला एकत्र आणतो. चला तर मग जाणून घेऊयात या सूर्यनमस्काराच्या फायद्यांबद्दल ..

सूर्यनमस्कार सकाळी का करावेत? 

सूर्यनमस्कार या शब्दातच सूर्य असल्याने तसेच आपल्या दिवसाची सुरवात करणारा देखील सूर्य असतो. त्यामुळे सूर्यप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संधी असते.

 

surynamskar inmarathi

हे ही वाचा – त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही चिरतरुण राहू शकता..!

सूर्यनमस्कार सकाळी घालावेत, कारण दिवसाची सुरवात उत्तम होते आणि मन सुद्धा प्रसन्न होते. शरीराला लवचिक बनवते तसेच रक्ताभिसरण सुधारते, शरीरातील इतर महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते. ज्यांना अगदीच सकाळी शक्य नसते त्यांनी संध्याकाळी घालायला हरकत नाही.

 

सूर्यनमस्कार लाभदायी कसे?

संपूर्ण अंगाचा यात व्यायाम होतो. रोज सूर्यनमस्कार घातल्याने आपल्या प्रवृत्ती म्हणजे कफ, वात, पित्त यांच्यात समतोल साधला जातो. आपले पोट, मज्जसंस्था, यांचे कार्य सुधारते.

 

 

cough inmarathi

 

सूर्यनमस्कार कुठे घालाल?

प्रत्येक गोष्टीची एक जागा ठेवून दिलेली असते. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार देखील स्वच्छ, सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये घालवेत. सूर्यनमस्कार योगा मॅटवरच शक्यतो करावेत. सूर्यनमस्कार घालताना शक्यतो सैल कपडे घालावेत. शरीराला संपूर्णपणे ताण देणारा हा व्यायाम आहे. सूर्यनमस्कार घालताना चेहरा नेहमी प्रसन्न ठेवावा.

 

suryanasmkar 1 inmarathi

 

सूर्यनमस्काराचे मानसिक फायदे :

आजच युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. स्पर्धा म्हंटल की हरणे आले आणि जिंकणे आले, जिंकल्यावर जसा आनंद होतो तसेच हरल्यावर आपण जास्त दुःखी होतो. सतत दुःख कुरवाळत बसलो तर आपण कधीच प्रगती करू शकत नाही.

 

mental health inmarathi

 

सूर्यनमस्काराने जसे शरीरातील अवयवांचे कार्य सुधारते त्याचप्रमाणे मनाचे कार्य देखील सुधारते. सूर्यांसमकार घालणं दीर्घ श्वास घेऊन सोडायचा त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तसेच आपला मेंदू सुद्धा ऍक्टिव्ह राहतो.

मुलांना कडून देखील सूर्यनमस्कार घालून घेतले पाहिजेत, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकून राहण्यासाठी शरीर देखील तंदुरुस्त असायला हवे म्हणूनच त्यांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत. एखाद्या मुलाला जर खेळाडू बनायचे असेल तर त्यासाठी हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे.

 

suryanasmkar 2 inmarathi

हे ही वाचा – व्यायामाशिवाय वजन आटोक्यात ठेऊन ‘सुपर फिट’ राहण्यासाठी या १० टिप्स वाचाच!

स्त्रियांनी सूर्यनमस्कार का घालावेत?

आज स्त्रीचे आरोग्य जपणे खूप महत्वाचे असते. आजच्या स्त्रीला अनेक जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे साहजिकच तिचं आरोग्य चांगले असलेच पाहिजे.

सूर्यनमस्कारांनी स्त्रियांच्या पोटातील स्नायूंचे कार्य सुधारते. तसेच स्त्रियांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात त्याचे कार्य देखील सुधारते. काही आसनांमुळे वाढलेल्या अतिरिक्त चरबीचे प्रमाण सुद्धा कमी होते.

 

surya 2 inmarathi

 

स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मासिक पाळी. सूर्यनमस्कारांमुळे स्त्रियांच्या मासिक पाळीत बरीच सुधारणा होते. अनेकांना अनियमित मासिक पाळीचा प्रॉब्लेम असतो, अशांनी  सूर्यनमस्कार घातल्यास हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. एवढच नाही तर मेनोपॉजच्या वेळी होणारा त्रास आणि मानसिक त्रास देखील दूर होऊ शकतो.

 

सूर्यनमस्काराने किती कॅलोरी खर्च होतात?

एक सूर्यनमस्कार घातल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या १३.६० कॅलोरी खर्च होतात. त्यामुळे हळूहळू रोज सूर्यनमस्काराची संख्या वाढवावी, १०८ सूर्यनमस्कार घालण्याचे लक्ष ठेवावे.

 

calorie inmarathi

 

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?