' हिरवी बुरशी काय आहे? जाणून घ्या लक्षणं… अशी घेता येईल खबरदारी – InMarathi

हिरवी बुरशी काय आहे? जाणून घ्या लक्षणं… अशी घेता येईल खबरदारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी सरकारने खबरदारी घेण्यास सांगितले आहे. लॉकडाऊनचे निर्बंध जरी शिथिल केले असले तरी पूर्णतः सुरळीत व्हायला अजून वेळ लागणार आहेच.

जगाचा आढावा घेतला, तर अमेरिका, इस्राएल हे देश आता मास्क मुक्त सुद्धा झाले. सिंगापूर न्यूझीलँडसारखे देश कधीच कोरोनमुक्त झाले आहेत. प्रत्येक देशाने नियम काटेकोरपणे पाळून यावर मात केली आहे.

 

corona test inmarathi

 

दुसरी लाट ओसरली जरी असली तरी तिचे पडसाद हळूहळू उमटायला लागले आहेत. आधीच काळी बुरशीजन्य आजार म्युकरमायसीस फैलावत आहेच त्यात पांढऱ्या बुरशीने हातपाय पसरायला सुरवात केली. आता पुन्हा एका अशाच बुरशीजन्य आजाराने डोके काढले आहे ते म्हणजे हिरवी बुरशी.

देशात हिरव्या बुरशीचा पहिला रुग्ण इंदूर शहरात आढळून आला आहे. शहरात पोस्ट कोव्हीड रुग्णांची संख्या जास्त आहे त्यात ५०० काळ्या बुरशीची लागण झालेले रुग्ण आहेत. त्यामुळे एकूणच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

corona and heart disease inmarathi

हे ही वाचा – कोरोनाविरुद्ध वापरलं जाणारं हे शस्त्र कधी तुमचाच घात करेल हे कळणारही नाही

तिकडच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘ज्या रुग्णामध्ये ही बुरशी आढळून आली तो रुग्ण गेल्या दीड महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याचे फुफ्फुस ९० निकामी झाले आहे. त्याच्या  फुफ्फुसांची जेव्हा तपासणी केली तेव्हा फुफ्फुसांमध्ये हिरवी बुरशी आढळून आली आहे’, असे स्पष्टीकरण डॉक्टरांनी केले आहे.

नेमकी काय आहे हिरवी बुरशी?

तज्ञांच्या मते एस्पारगेलोसिसला सामान्य भाषेत हिरवी बुरशी असं म्हणतात. हिरवी बुरशीचा प्रभाव थेटआपल्या फुफ्फुसांवर होतो. ही बुरशी फुफ्फुसांमध्ये लवकर संक्रमित होते त्यामुळे आणखीनच धोका वाढू शकतो.

 

green inmarathi

 

अधिक धोका कोणाला?

मुळातच ज्या व्यक्तींना एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असते, अशा लोकांना या बुरशीपासून जास्त धोका आहे. एखाद्या व्यक्तीला न्यूमोनिया झाल्यास त्या व्यक्तीला सुद्धा याचा धोका जास्त आहे.

 

allergy inmarathi

 

ज्या व्यक्ती मोठ्या आजराने ग्रस्त आहेत जसे कॅन्सर, किडनी, लिव्हर यांचे आजारआहेत, अशा व्यक्ती तसेच ज्या व्यक्ती डायलेसिसवर आहेत अशा सगळ्यांना याचा धोका जास्त आहे.

 

लक्षणे कोणती?

तज्ञांच्या मते प्रत्येक बुरशीची वेगवगेळी लक्षणे दिसून येत आहेत . या बुरशीमध्ये सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे नाकातून रक्त येणे, ताप येणे, थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसून आली आहेत.

 

nose bleeding

 

काय काळजी घ्याल?

precaution is better than cure म्हणतात ते उगीच नाही. आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे. बुरशीजन्य आजार वाढत चाललेत त्यात आता पावसाळा सुरु झाल्याने प्रत्येकाने अधिकच स्वच्छता ठेवली पाहिजे.

 

n 95 mask inmarathi

हे ही वाचा – कोरोना काळात कोरडा खोकला सतावतोय? मग हे घरगुती उपाय आजच करा

धूळ माती यापासून स्वतःला चार हाथ लांबच ठेवा. N ९५ मास्क वापराचं. आपली आणि आपल्या शरीराची स्वच्छता राखा. बाहेरून जाऊन आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवा.

कोरोना नावाचे संकट कधी टळेल सांगू शकत नाही. आपण मात्र आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकजण आता स्वच्छतेबाबत जागरूक झाला आहेच तरी सुद्धा काळजी घेणे हे आवश्यक आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?