' नोलनच्या सिनेमांना टक्कर देणारा हा 'जबरदस्त' चित्रपट अजिबात चुकवू नका...

नोलनच्या सिनेमांना टक्कर देणारा हा ‘जबरदस्त’ चित्रपट अजिबात चुकवू नका…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

एका घरात एक मुलगी राहतीये, तिला तिच्या घरच्या कॉर्डलेस फोनवर एक फोन येतो. समोरून तिच्याच वयाची एक मुलगी बोलत असते, फक्त समोरून बोलणारी मुलगी १९९९ या काळातली असते तर या बाजूची मुलगी २०१९ मधली!

हे ऐकून तुम्हाला क्रिस्तोफर नोलनचे इनसेप्शन, नेटफ्लिक्सची डार्क वेबसिरिज किंवा इतर कोणते टाइम ट्रॅव्हलवर आधारित सिनेमे आठवले असतील नाही का?

पण थांबा ही कथा आहे एका कोरियन सिनेमाची, जो नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘The Call’! गेल्यावर्षी २७ नोव्हेंबेर २०२० सालीच हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, पण नेटफ्लिक्सच्या कृपेने तो सध्या सगळ्यांना बघायला मिळतोय.

 

the call inmarathi

 

पहिल्या २ ओळीत या सिनेमाचं कथानक सांगायचा प्रयत्न केला आहे, मी त्याबद्दल फक्त तेवढंच सांगणार आहे, कारण हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे, त्यामुळे याविषयी मी काहीच स्पॉयलर देऊ इच्छित नाही.

हे ही वाचा उपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय?

हा सिनेमा यातलं थ्रील, सस्पेन्स, एक प्रकारचं गुढनाट्य आणि यात दाखवलेल्या टाइमलाईन्सची कमाल या सगळ्या गोष्टी अनुभवण्यात जी मजा आहे ते सगळं इथे सांगण्यात नाही.

मी पुन्हा नमूद करतो की हा सिनेमा म्हणजे टाइम ट्रॅव्हलवर बेतलेला नाही, फक्त २ वेगवेगळ्या टाईमलाईन्स एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत आणि या २ टाइम लाईन्समधल्या त्या नायिका जी इन्फॉर्मेशन एकमेकींशी शेअर करतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेमके काय बदल घडतात हे थरारनाट्य तुम्हाला यात बघायला मिळेल.

एका टाइमलाइनमधली मुलगी स्वतःचा भूतकाळ बदलू पाहतीये, तर दुसऱ्या टाइमलाईनमधली मुलगी स्वतःचं भविष्य काय असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतीये, पण हे सगळं करता करता हा खेळ त्यांच्याच कसा जीवावर उठतो आणि एकमेकींशी रोज फोनवर गप्पा मारणाऱ्या या दोघी एकमेकींना संपवायचा विचार करतात, हे सगळं बघताना आपण आ वासून बघत जातो.

 

call film inmarathi

 

खरोखर कोणत्याही प्रकारचं टाइम ट्रॅव्हल न दाखवता सिनेमात ज्या पद्धतीने २ टाईमलाईन्स कनेक्ट होताना दाखवलंय ते बघताना तुम्हाला क्रिस्तोफर नोलनच्या सिनेमाची आणि दिग्दर्शनाची हमखास आठवण होतेच.

शिवाय यातल्या त्या दोन्ही नायिका त्यांच्या घरच्यांचे असलेले संबंध आणि त्या दोघींचा एक विचित्र भूतकाळ, त्या भूतकाळातली माणसं हे सगळं खूपच गुंतवून ठेवणारं आहे.

सस्पेन्स, थ्रीलर या सोबतच सिनेमातल्या काही सीन्सना जो एक हॉरर टच दिलाय तो बघून आपली झोप उडते हे नक्की, तसं बघायला गेलं तर यात भूत, प्रेत, आत्मा किंवा इर काही किळसवाणा प्रकार अजिबात नाही पण जे एक टेंशन क्रिएट केलंय त्यामुळे काही काही सीन्स बघताना आपल्या काळजाचा थरकाप उडतोच.

खासकरून सिनेमाच्या शेवटाकडे येणारा तो सीन जिथे मुख्य नायिका येणाऱ्या फोनला कंटाळून जमिनीवर बसलेली असते, फोन बाजूला ठेवलेला असतो बराच वेळ शांतताच आहे त्या सीनमध्ये, अचानक त्या फोनची रिंग पुन्हा वाजते आणि तिथून जे काही आपल्यासमोर घडतं ते आपण आ वासून बघत बसतो.

 

the call scene inmarathi

हे ही वाचा दरवाज्याआडचं स्त्री पुरुषाचं नातं दाखवता दाखवता भलतंच काहीतरी दाखवणारा प्रयोग

हा कोरियन सिनेमा २०११ च्या “the caller” या इंग्रजी सिनेमावर जरी बेतलेला असला तरी या दोन्ही फिल्म्सच्या मांडणीपासून हाताळणीपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्रचंड फरक आहे.

हे थरारनाट्य अनुभवताना या सगळ्यावर कळस म्हणजे या सिनेमाचा क्लायमॅक्स, शेवटच्या काही मिनिटांत त्यांनी जो ट्विस्ट आणलाय तो बघताना तुम्ही तुमचं डोकं नक्की खाजवत रहाल!

म्हणजे अशा पद्धतीचा ओपन एंड आपण नोलनच्या बऱ्याचशा सिनेमात पाहिला असेल, पण माझ्यासाठी एका कोरियन सिनेमात हे असं काहीतरी बघायला मिळणं म्हणजे एक पर्वणीच होती.

 

christopher-nolan-inmarathi

 

सिनेमाची तांत्रिक बाजूदेखील तितकीच भक्कम असल्याने हा सिनेमा बघणं सुसह्य होतं हे नक्की, ज्या पद्धतीने २ टाईमलाईन्सचं सादरीकरण केलंय ते बघताना कुठेही बालिशपणा वाटणार नाही, त्या २ टाइमलाईन्समधले कल्चरल बारकावे हे अगदी अचूक टिपले गेले आहेत.

शिवाय सिनेमाच्या शेवटाला येणार एक सायको थ्रीलर अॅंगल देतानाही कुठेच ते बीभत्स वाटत नाही, सिनेमात रक्तपात आहे पण तो कुठेच तुम्हाला uncomfortable करत नाही इतक्या खुबीने ते सीन्स आपल्यासमोर उभे केलेत!

सिनेमाचे काही सीन्स जितके अंगावर येतात तितकंच यातलं पार्श्वसंगीतही तुमची झोप उडवतं, एक थरारनाट्य उलगाडताना ज्या धाटणीचं संगीत अपेक्षित असतं अगदी तसाच अनुभव तुम्हाला या सिनेमात मिळतो.

दिग्दर्शक Lee Chung-hyun हे नाव मला परिचित नाही, पण या माणसाने ज्या पद्धतीने ते कथानक आपल्यामोर सादर केलं आहे तेही भाषेची मर्यादा असूनही ते खरंच थक्क करणारं आहे.

याबरोबरच यातले कलाकार, अगदी हातावर मोजता येतील इतकी पात्रं या सिनेमात आहेत, पण प्रत्येकाचा अभिनय लाजवाब आहे, २ मुख्य नायिकांची भूमिका साकारणाऱ्या Park Shin-hye, Jeon Jong-seo या २ अभिनेत्रींनी तर खरंच मनाचा ठाव घेतला.

 

the call actress inmarathi

 

नोलनच्या परफेक्ट सिनेमांपेक्षा काही बाबतीत हा सिनेमा कमी पडला असेल पण त्याच्या स्टाईलने कथेचं सादरीकरण करणं आणि ते करताना शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवणं हे कसब प्रत्येकाला जमतंच असं नाही.

इथे आपली कलाकार मंडळी कोरियाचे सिनेमे उचलून ‘राधे’ सारखे अर्धवट सिनेमे काढतायत तिथे हीच लोकं वेगवेगळे प्रयोग करून सामान्य लोकांनाही त्यांच्या कथानकातून भुरळ पडतायत.

एकंदर एक उत्कृष्ट खिळवून ठेवणारं कथानक आणि तितक्याच उत्तम पद्धतीने सादरीकरण केल्याने हा सिनेमा तुम्ही अजिबात चुकवू नका, नेटफ्लिक्सवर हा सिनेमा कोरियन, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे!

===

हे ही वाचा भारतीय उद्योग विश्वातील “चांडाळ चौकडी”ची विस्फोटक माहिती प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?