' बुद्धिबळाच्या राजाला हरवायला गेला, पण या कृतीमुळे ‘तो’ स्वतःच चेकमेट झाला – InMarathi

बुद्धिबळाच्या राजाला हरवायला गेला, पण या कृतीमुळे ‘तो’ स्वतःच चेकमेट झाला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बैठे खेळ खेळण्यामध्ये जसे पत्ते, कॅरम येतात, तसा एक खेळ आवर्जून खेळला जातो तो म्हणजे बुद्धिबळ. दोन खेळाडूंमध्ये खेळाला जाणारा हा खेळ, खेळाडूच्या बौद्धिक कौशल्यावर आधारलेला आहे. ज्यात खेळाडूने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वेगवेगळ्या चाली खेळून हरवायचे असते ज्याला बुद्धिबळात चेकमेट असं म्हणतात.

अनेक हिंदी मराठी सिनेमात सुद्धा दोन कॅरेक्टरमधील ठसन दाखवण्यासाठी बुद्धिबळाचा वापर केला जातो. या खेळावरून चक्क एक चित्रपट सुद्धा बनवला होता, शतरंज के खिलाडी.

 

shatranj ke khiladi inmarathi

 

या खेळाचे मूळ सुद्धा आपल्या मातीच जन्मले आहे असे संशोधक सांगतात. आपल्या देशातून इराण अरबस्ताना मार्गे यूरोपपर्यंत पोहचला. आपल्याकडे बुद्धिबळ म्हंटल की एकच नाव येत ते म्हणजे  ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद.

कोणी माई का लाल सरकार पडू शकत नाही, असे विधान काही दिवसांपूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचे हे विधान आनंद यांच्या बाबतीत लागू होते.

 

visvhnath aanand inmarathi

हे ही वाचा – अल्झायमरला दूर ठेवण्यासोबतच बुद्धिबळ तुमच्यासाठी या १० जादुई गोष्टी घडवून आणतं!

आनंद यांनी जवळजवळ पाच वेळा बुद्धिबळातील जगजेतेपद मिळवले आहे. अशा या महान खेळाडूला हरवणायचा प्रयत्न एका व्यावसायिकाने केला आहे. कोण आहे तो व्यावसायिक चला तर मग जाणून घेऊयात…

कोण आहे निखिल कामथ?

निखिल कामथ हा देशातील सर्वात मोठ्या असलेल्या झेरोदा नामक स्टॉक एक्सचेंज कंपनीचा सह संस्थापक आहे, निखिल आणि त्याच्या भावाने ही कंपनी सुरु केली आहे. आज देशात चाळीस वयाच्या खाली असलेल्या श्रीमंत लोकांमध्ये हे दोघे येतात.

 

nikhil 4 inmarathi

 

वयाच्या १७ वर्षी आपल्या भावाला घेऊन त्याने देशातील पहिल्या ऑनलाईन ब्रोकरेज कंपनीची सुरवात केली. २०१० साली स्थापन झालेल्या या कंपनीचा दरवर्षी १०० कोटींच्या वर टर्नर्ओव्हर आहे.

निखिलने नेमकं कस हरवलं?

एका एनजीओ संस्थेने कोरोनग्रस्त लोकांना मदत मिळावी, म्हणून बुद्धिबळाच्या स्पर्धा ठेवली होती. chess.com म्हणून जगभरात बुद्धिबळ ऑनलाईन खेळली जाणारी एक वेबसाईट आहे. जी या कार्यक्रमाची आयोजक होती. याच स्पर्धेत निखिल कामथ च्या बरोबरीने आमिर खान, क्रिकेटर यूजवेन्द्र चहल आणि विश्वनाथ आनंद असे दिग्गज लोक सहभागी होते.

 

nikhil 3 inmarathi

 

स्पर्धेच्या वेळी निखिल कामथने विश्वनाथ आनंद यांना हरवले, अनेकांना यावर विश्वास बसेना, अखेर निखिलनेच आपल्या अधिकृत अकाउंट वरून आपण लबाडी केल्याचे काबुल केले. हा बुद्धिबळाचा खेळ ऑनलाईन घेतल्याने निखिलने यामध्ये काही मित्रांच्या आणि तज्ञांच्या मदतीने लबाडी करून ही मॅच जिंकली.

 

nikhil 2 inmarathi

 

 

आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवरून त्याने स्वतःच कबुली जवाब दिला आहे, तो असं म्हणतो की, ‘ अनेकांना वाटलं असेल मी खरंच विश्वनाथ आनंद यांना पराभूत केले, त्यांना पराभूत करणं म्हणजे सकाळी उठून रेसिंग ट्रॅकवर १०० मीटरच्या शर्यतीत थेट उसेन बोल्टचा पराभव करण्यासारखा आहे.

तो पुढे असेही म्हणाला, मी केवळ मजेसाठी आणि चॅरिटीसाठी ही स्पर्धा खेळली होती. माझ्याकडून मूखर्पणा झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

अकाउंट केले बॅन:

ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे हा खेळ खेळाला गेला होता त्या साईटने सुद्धा निखिलचे अकाउंट बॅन केले होते. मात्र दोन दिवसांनी पुन्हा त्याचे अकाउंट ऍक्टिव्ह केले गेले आहे.

 

chess 1 inmarathi

 

झालेल्या या प्रकणावरून विश्वनाथ आनंद यांनी कधीच हे प्रकरण सोडून दिले आहे. त्याच प्रमाणे निखिल कामथने chess.com यांची माफी सुद्धा  मागितली आहे. आणि खेळाचे नियम मोडणार नाहीत याची काबुल देखील दिली आहे.

===

हे ही वाचा – जगात सर्वांच्या बुद्धीचा कस लावणारं ‘बुद्धिबळ’ भारतात कसं जन्मलं याची रोचक कहाणी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?