' विनोदी रामायण ते गांधीहत्येचं षडयंत्र उलगडणाऱ्या या १० पुस्तकांवर भारतात बंदी आहे! – InMarathi

विनोदी रामायण ते गांधीहत्येचं षडयंत्र उलगडणाऱ्या या १० पुस्तकांवर भारतात बंदी आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हा चित्रपट बॅन करा, ही वेबसिरिज बॅन करा, ही कलाकृति आमच्या धार्मिक सामाजिक भावना दुखावत आहे, अशी स्टेटमेंट सध्या आपल्याला नवीन नाहीत.

फक्त कलाकृतीच नाही तर समाज माध्यमांवर तुम्ही काही उलट सुलट बोललात तरीही तुमच्यावर कारवाई होऊ शकते याचं धडधडीत उदाहरण कंगना रनौत!

बॅंडिट क्वीनपासून पद्मावतपर्यंत कित्येक सिनेमांना या बॅनचा सामना करावा लागला आहे, सध्याच्या डिजिटल युगात तर वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या बहुतेक प्रत्येक कलाकृतिवर लोकं बंदी आणू इच्छित असतात.

 

banned films inmarathi

 

नुकतंच तांडव किंवा बॉम्बे बेगम्ससारख्या सिरिजमधून आपण ते अनुभवलंच आहे. कोणत्याही प्रकारच्या कलेवर बंदी घालणं हे कधीही योग्य नाही, पण जर एखाद्या कलेमुळे एका ठराविक समाजाच्या भावानांना आघात पोहोचणार असेल तर त्यावर चर्चा नक्कीच झाली पाहिजे.

प्रत्येकवेळेस एखाद्या कलाकृतीवर येणारी बंदी ही समाजासाठी फायद्याची ठरेलच असं नाही, कधी कधी त्या कलाकृतीतून समाजातल्या बऱ्याच मोठ्या प्रश्नावर भाष्य केलेलं असू शकतं, त्यामुळे सरसकट बंदीसुद्धा बरोबर नाही आणि वाट्टेल ती मोकळीक देणंही योग्य नाही. याचा सुवर्णमध्य आपल्यालाच काढायचा आहे!

 

banned stars inmarathi

 

पण आज या सगळ्यावर चर्चा होण्याचं कारण काय? चित्रपट गाणं किंवा सिरिज यावर येणारी बंदी आपण पाहिली आहे, अनुभवली आहे. पण तुम्हाला माहितीये का की भारत सरकारने १० ज्वलंत पुस्तकांवरसुद्धा बंदी घातलेली आहे.

ही पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकत नाहीत, विक्री करू शकत नाही, इम्पोर्ट करू शकत नाही एवढंच नाही तर ही पुस्तकं संग्रही असणं हा देखील एक गुन्हाच आहे!

कोणती आहेत ती पुस्तकं? असं काय होतं त्यात की देशाने त्यांवर बंदी आणली? हे सगळं आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

1. Rangila Rasul – Pandit Chamupati M.A. :

 

rangila rasul inmarathi

 

१९२३ साली अज्ञात प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने पंजाबमधील आर्य समाज आणि मुस्लिम समाज यांच्यात बरेच वाद निर्माण केले होते. Rangila Rasul चा खरा अर्थ म्हणजे ईश्वराचा ऐयाश प्रषित, ज्याला इंग्रजीत प्रोफेट मुहम्मद असंही म्हणतात.

या पुस्तकात प्रॉफेट मूहम्मद यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि लैंगिक सबंधांवर भाष्य केलं असल्याने बहुसंख्य मुस्लिमांनी याचा विरोध केला.

लेखकाचं नाव विचारल्यावर ते न सांगितल्याने या पुस्तकाचे प्रकाशक महाशय राजपाल यांना अटक झाली आणि त्यांचा खून केला गेला, अजूनही या पुस्तकावर भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश तिन्ही देशात बंदी आहे.

2. The Myth of the Holy Cow – Dwijendra Narayan Jha :

 

the myth of the holy cow inmarathi

 

हिंदू संस्कृतीत गाय म्हणजे गौ माता,आपल्या आयुष्यात तिचं स्थान किती पवित्र आहे ते आपल्याला ठाऊक आहेच. पण गायीबद्दलची हिंदूंची आस्था, किंवा गौमांस खाणं म्हणजे एक अंधश्रद्धा आहे हे या पुस्तकाच्या माध्यमातून ठसवण्यात आलं.

हे पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या हैद्राबाद सिव्हिल कोर्टाने यावर बंदी आणली, लेखकाला त्यामुळे बऱ्याचदा जीवे मारण्याच्या धमक्यादेखील मिळाल्या!

3. The Ramayana – Aubrey Menen :

 

the ramayana inmarathi

 

हिंदू धर्मातली दोन महाकाव्य किंवा प्राचीन ग्रंथ म्हणजे रामायण आणि महाभारत, त्यापैकी रामायणाचे विनोदी अंगाने केलेल विश्लेषण आणि एकंदरच satire पद्धतीने केलेलं लिखाण हे बऱ्याच लोकांना आवडलं नाही.

हिंदू लोकांच्या विनोदबुद्धीला चॅलेंज करणारं पुस्तक आपण लिहिल्याचा लेखकाने कितीही आव आणला असला तरी त्यातला कंटेंट अपमानकारक होता. यामुळेच त्यावर बंदी आणली!

4. Jinnah: India-Partition-Independence – Jaswant Singh :

 

jinnah inmarathi

 

भारतासाठी फाळणी हा विषय म्हणजे कधीही भरून न येणाऱ्या जखमेसारखा आहे. काहींच्या मते गांधींमुळे देशाचे २ तुकडे झाले तर काहींच्या मते जिना यांनीच भारताचे २ लचके तोडले.

याच धर्तीवर आधारतीत जिना यांना सहानुभूति मिळवून देणारं पुस्तक जसवंत सिंह यांनी लिहिलं, शिवाय यात नेहरू आणि पटेल यांच्या काही निर्णयांबद्दल चुकीच्या पद्धतीने लिखाण केल्याचे आढळले, त्यामुळे या पुस्तकावरही भारतात बंदी आहे.

5. Lajja (shame) –  Taslima Nasreen :

 

lajja taslima inmarathi

 

तस्लिमा नसरीन या बांग्लादेशी लेखिकेचं नाव आपल्याला ठाऊक आहेच. वेगवेगळ्या मुद्द्यावरून सतत चर्चेत असणाऱ्या तस्लिमा यांनासुद्धा बंदीचा सामना दोन वेळा करावा लागला होता.

बाबरी मशिदीच्या पाडावानंतर त्यावरच आधारीत त्यांच्या लज्जा पुस्तकावर मुस्लिम लोकं आणि समाज यांनी आक्षेप घेतला आणि त्यावर बंदी घातली गेली. त्यांच्या द्विखंडीता या पुस्तकावरसुद्धा बांग्लादेशी लोकांच्या भावना  दुखावल्याने बंदी घातली गेली.

मुस्लिम समाज आणि संस्कृतिबद्दल उलट सुलट लिहिणाऱ्या या लेखिकेविरुद्ध १९९४ मध्ये फतवादेखील काढला होता!

6. The Face Of Mother India – Katherine Mayo :

 

face of mother india inmarathi

 

भारतात जेव्हा स्वशासनासाठी संघर्ष सुरू झाला तेव्हा कॅथरीन यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, यात भारतीय संस्कृति आणि परूष कसे कमकुवत आहेत हे मांडलं होतं.

ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून भारत हा स्वशासनासाठी पात्र नाहीये असंच यातून मांडलं गेलं, म्हणूनच भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घातली!

7.  Unarmed Victory – Bertrand Russell :

 

unarmed victory inmarathi

 

बघायला गेलं तर क्युबा देशातल्या मिसाईल क्राईसीसवर आधारित असलेल्या या पुस्तकात १९६२ च्या इंडो-चायना युद्धाबाबतही उल्लेख केलेला आढळून येईल.

या पुस्तकाच्या लेखकाचे भारताशी चांगलेच संबंध होते, पण आपल्या पुस्तकात इंडो चायना युद्धाबद्दल त्यांनी भारताची खूप आलोचना केली आणि त्यामुळेच या पुस्तकावर सरकारने बंदी आणली.

8. The True Furqan – Al Saffee, Al Mahdee :

 

the true furqan inmarathi

 

मुस्लिम लोकांसाठी त्यांचा सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे कुराण आणि याच कुराणातल्या शिकवणींना ख्रिस्ती धर्माशी जोडून लिहिलं गेलं आहे. असं म्हणतात की हे पुस्तक म्हणजे मुस्लिम धर्मियांची खिल्ली उडवणारं आहे.

मुस्लिम धर्म सोडून ईसाइ धर्माकडे वाटचाल करा अशाच प्रकारची वक्तव्य करणाऱ्या या पुस्तकावर देशात बंदी आहे.

9. Lady Chatterley’s Lover – D. H. Lawrence :

 

lady chatterly's lover inmarathi

 

या पुस्तकातलं मुख्य पात्र म्हणजे एक विवाहित बाई जीच्या नवऱ्याचा कमरेखालचा भाग अर्धांगवायूने निकामी आहे, अशातच तिचं एका तरूणाशी सूत जुळतं आणि त्याचीच कहाणी म्हणजे हे पुस्तक.

हे पुस्तक ब्रिटीशांनीच बॅन केलं होतं. १९६० मध्ये त्यांनी यावरची बंदी काढली, पण भारतात आजही या पुस्तकावर बंदी आहे.

हे पुस्तक यातली कथा, पात्र हे सगळं खूपच अश्लील आहे यामुळेच समाजासाठी हे पुस्तक योग्य नाही म्हणूनच यावर बंदी घातलेली आहे!

10. Nine Hours To Rama – Stanley Wolpert :

 

nine hours to rama inmarathi

 

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे आणि त्या घटनेवर हे पुस्तक आधारित आहे. महात्मा गांधी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला असंही या पुस्तकात नमूद केलेलं आहे.

त्यावेळच्या गृहमंत्रालयाने मुद्दाम गांधीजींच्या सुरक्षेत ढील दिली होती असे आरोप करण्यात आले ज्यामुळे ही हत्या म्हणजे एक मोठं षडयंत्र आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला.

हे पुस्तक आणि यावर आधारित सिनेमा या दोन्हीवर भारत सरकारने बंदी घातली आहे.

===

===

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?