' भाषण सुरू असताना 'अजान' सुरू होताच बाळासाहेब म्हणाले...

भाषण सुरू असताना ‘अजान’ सुरू होताच बाळासाहेब म्हणाले…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

देशातील राजकारण आणि त्याबद्दल होणाऱ्या चर्चा याविषयी बोलायचं झालं, तर मुख्यतः दोन प्रकारातील लोक दिसून येतात. राजकारणाविषयी भरभरून बोलणारे आणि ‘आपल्याला काय त्याचं’ असा अगदी तटस्थ पवित्र घेणारे.

राजकीय विषयांवर भरभरून बोलणाऱ्या मंडळींसाठी कुठलाही विषय अगदी सहजपणे आवडीचा ठरू शकतो. सध्या मराठा आरक्षणावरून तापलेलं राजकारण असो, किंवा मग केंद्र अथवा राज्यसरकार… २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणातील असाच एक विषय कायम चर्चेत असतो, तो म्हणजे महाविकास आघाडी!

 

mahavikas aghadi inmarathi

 

बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि आजची शिवसेना वेगळी, हादेखील अनेकदा या चर्चेतील केंद्रस्थानी असलेला मुद्दा असतो. त्यावरून सातत्याने राजकारण सुद्धा पेटलेलं असतं हेही पाहायला मिळतं. काही काळापूर्वी मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध शाब्दिक हल्ले चढवत असतात. या नेत्यांनी एकमेकांवर शरसंधान साधलं, की जनतेमध्ये त्याचे पडसाद आपोआपच उमटतात.

===

हे ही वाचा – ‘त्या’ एका भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”!

===

त्याकाळी शिवसेना कधी होती आणि आज कशी आहे, त्यांनी हिंदुत्व बाजूला सारलं का, बॅनरवर बाळासाहेबांच्या नावासह आता हिंदूहृदयसम्राट हा शब्द का लिहिला जात नाही, असे एक ना अनेक मुद्दे नाक्यावरच्या गप्पांमधून डोकावू लागतात. हल्ली कोरोनाची नियमावली आणि भीती पाहता, या चर्चा व्हिडिओ कॉल्स, कॉन्फरन्स कॉल्सच्या माध्यमातून सुद्धा रंगातात.

असाच बाळासाहेबांचा एक किस्सा आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जो माहित असेल तर पुढच्या वेळी या नाक्यावरील गप्पांमध्ये सांगता येईल आणि तुमची कॉलर टाईट करून घ्यायला नक्कीच मदत होईल.

 

balasaheb thackrey inmarathi

 

विषय प्रतिष्ठेचा होता

ही घटना आहे २००५ मधली, ज्यावेळी काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे २००४ साली महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार अस्तित्वात आलं होतं. औरंगाबाद महापालिका मात्र अजूनही शिवसेनेच्या अखत्यारीत होती. थोडीथोडकी नाही, तर सलग १५ वर्ष औरंगाबाद महापालिकेत त्यांचंच सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आलं होतं.

या पार्श्वभूमीवर आघाडीने औरंगाबादेत मोठा जोर लावला होता आणि म्हणूनच ही निवडणूक राज्यभरात मोठ्या प्रतिष्ठेचा विषय ठरली होती.  प्रत्येक पक्षाची, राज्यातील आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काहीही करून इथे सत्तापालट घडवायचा असा आघाडीचा प्रयत्न होता, तर सत्ता टिकवण्यासाठी युतीच्या नेत्यांनीही जोर लावला होता.

 

congress ncp inmarathi

===

हे ही वाचा – काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जेव्हा बाळासाहेबांना ‘थेट मातोश्रीवर’ जाऊन भेटतात…

===

बाळासाहेबांचं भाषण सुरु असतानाच…

युतीला सत्ता टिकवता येणार का? हा एकच सवाल जनतेच्या आणि नेत्यांच्या मनातही होता. खरंतर याचीच मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. असं म्हटलं जातं की सत्ता टिकवता येईल का, याविषयी युतीमधील नेत्यांच्या मनातही शंका आणि धाकधूक होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेकडे!

 

balasaheb sabha inmarathi

 

ही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.

बाळासाहेबांच्या भाषणाविषयी सगळ्यांनाच नेहमीच कुतुहूल असायचं. तसंच याही भाषणाचं होतं. याशिवाय त्यांच्या भाषणात ते नेमका कुठला नवा मुद्दा मांडणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र जे घडलं ते भलतंच होतं.

बाळासाहेबांचा हजारजबाबीपणा

बाळासाहेबांचं भाषण ऐन रंगात आलेलं असतानाच अचानक अजान सुरु झालं. अवघा जनसमुदाय शांत झाला. खुद्द बाळासाहेबांनी सुद्धा त्यांचं भाषण काही क्षणांसाठी थांबवलं.

त्यांनी एक पॉझ घेतला; त्यांच्या खास शैलीत एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताचं बोट हवेत आकाशाकडे निर्देश करणारं, आणि ते म्हणाले “याचसाठी मी विचारतोय, तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?”

 

balasaheb thackarey inmarathi

 

अपेक्षेप्रमाणेच टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळासाहेबांच्या हजरजबाबी स्वभावाचं आणखी एक उदाहरण अनुभवण्याची संधी मिळाली. सलग चौथ्यांदा शिवसेना आणि भाजप युतीची औरंगाबाद महापालिकेत सत्ता आली. याला काहींनी बाळासाहेबांच्या त्या वाक्याचा करिष्मा म्हटलं, तर काहींनी आणखीही काही… मात्र अजान सुरु झाल्यावर त्यांनी काही क्षण थांबून अवघा माहोल बदलून टाकला हे मात्र खरं…

===

हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?