' एकेकाळी होता प्रत्येक गोलंदाजांचा कर्दनकाळ, आज काढतोय पत्नीच्या अब्रूचे धिंडवडे… – InMarathi

एकेकाळी होता प्रत्येक गोलंदाजांचा कर्दनकाळ, आज काढतोय पत्नीच्या अब्रूचे धिंडवडे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सनथ जयसूर्या हे नाव ऐकलं की आजही भल्याभल्यांना धडकी भरते. स्फोटक आणि घणाघाती फलंदाजांची यादी करायची ठरवली, तर ती जयसूर्या या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. धमाकेदार फलंदाजीसह नियमित गोलंदाजी करणारा फिरकीपटू म्हणून सुद्धा महत्त्वपूर्ण होता. एक उत्तम अष्टपैलू आणि श्रीलंकन संघाचा महत्त्वाचा खांब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या जयसूर्याचा धाक किती होता, हे त्याकाळातील गोलंदाजच काय, तर क्रिकेटचा आनंद लुटणारे जगभरातील प्रेक्षकही सांगू शकतील. आयपीएलसारख्या स्पर्धा, २०-२० किंवा त्याहूनही वेगवेगळे क्रिकेटचे प्रकार अस्तित्वात येऊ लागल्यामुळे, सगळेच फलंदाज हाणामारी करतात, हेही खरं… त्यामुळे कदाचित हल्लीच्या प्रेक्षकांना, नव्या पिढीला जयसूर्याची दहशत काय होती, ते समजूही शकणार नाही.

 

sanath jaysuriya inmarathi

 

जयसूर्या हा जसा एक अप्रतिम खेळाडू म्हणून गाजला, तसाच तो त्याच्या नावाशी जोडल्या गेलेल्या वादांमुळेही बराच गाजला. अर्थात, हे वादविवाद आणि त्यांची चर्चा रंगली ती त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात!

International Cricket Council म्हणजेच आयसीसीकडून त्याच्यावर घालण्यात आलेल्या २ वर्षांच्या बंदीचा कालावधी काही महिन्यांपूर्वीच संपला आहे. २०१९ साली त्याच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यामुळे जयसूर्या या नावामागे लागलेला धब्बा पुसला जातोय न जातोय तोच त्याचं आणखी एक प्रकरण बाहेर आलेलं आहे.

जयसूर्याने स्वतःच त्याच्या पत्नीचा एक अश्लील एमएमएस व्हायरल केल्याचं आता बाहेर आलं आहे. आजवर तीन लग्न झालेला सनथ जयसूर्या, आता आणखी गोत्यात आलेला दिसतोय.

 

sanath jaysuriya wife inmarathi

===

हे ही वाचा – …आणि मग जावेद मियाँदादला झापायला एक ‘भारतीय पठाण’ पाकिस्तानात पोचला…!!

===

नेमकं काय आहे हे प्रकरण?

जयसूर्याची एकूण ३ लग्न झालेली आहेत. यातील एकही लग्न टिकलेलं मात्र नाही. या पार्शवभूमीवर त्याच्यावरील हे आरोप अधिक गंभीर ठरतात. त्याचं तिसरं लग्न लपूनछपून एका मंदिरात झालं असल्याचं म्हटलं जातं. लंकेतील अभिनेत्री मल्लिका सिरीसेना ही सनथची तिसरी पत्नी होती. हे लग्न सुद्धा टिकलं नाही आणि मल्लिकाने जयसूर्याच्या आयुष्यातून काढता पाय घेतला होता.

तिसरी पत्नी सोडून गेली, हा धक्का जयसूर्या पचवू शकला नाही आणि सूडाच्या भावनेतून त्याने हे चुकीचं पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जातं.

२०१२ साली या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली. खरं तर त्यावेळी दुसऱ्या पत्नीसह त्याचा घटस्फोट झालेला नव्हता. तीन मुलांची आई असणाऱ्या सॅन्ड्रा डिसिल्वा हिच्याशी त्याचे वाद सुरु झाले. त्याचं कारण होतं सनथ आणि मल्लिका यांचं नातं. लग्न आणि आधीचं नातं संपवलेलं नसतानाच त्याने मल्लिकाशी साखरपुडा केला आणि नंतर ते विवाहबद्ध सुद्धा झाले.

 

jaysuriya inmarathi

 

त्यांचं नातंही हवं तेवढं खुलू शकलं नाही, आणि अखेर त्यांच्यातही वाद होण्यास सुरुवात झाली. या वादांना कंटाळून मल्लिकाने जयसूर्याला सोडून एका व्यावसायिकाशी लग्न केलं.

त्या दोघांनी लपून विवाह केला होता की नाही, यावरही अनेकांचं दुमत असल्याचं म्हटलं जातंय. काहींच्या मते, हे नातं अधिकृत कधीही नव्हतं.

मल्लिकाचा हा निर्णय सनथला रुचला नाही आणि तिचा एक अश्लील व्हिडिओ त्यानेच व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. २०१७ साली त्याने हे पाऊल उचललं होतं अशी बातमी आता बाहेर आली आहे.

 

jayasurya mms inmarathi

 

जयसूर्याचं पहिलं लग्न

१९९८ साली म्हणजेच क्रिकेट करियरच्या शिखरावर असताना त्याने पहिलं लग्न केलं होतं. त्याची पहिली पत्नी सुमुदु करुणनायक ही ग्राउंड होस्टेस होती. हे लग्न वर्षभराच्या आतच मोडलं. त्यानंतर, २००० साली एअर होस्टेस सॅन्ड्रा डिसिल्वा हिच्याशी त्याचं दुसरं लग्न झालं. थोडक्यात काय, तर त्याच्या पत्नी सुद्धा ग्लॅमर असणाऱ्या व्यवसायातीलच होत्या असं म्हणता येईल.

जयसूर्याला लग्नं मानवली नाहीत, तरी त्याने सूडबुद्धीने केलेली ही कृती योग्य आहे असं कधीची म्हणता येणार नाही. नुकताच एका आरोपातून बाहेर पडत असताना ही बातमी फुटल्याने, कधी काळी गोलंदाजांचा कर्दनकाळ असणाऱ्या जयसूर्याची पळता भुई थोडी होऊ शकते हेही तितकंच खरं… आयुष्याच्या पिचवरील त्याची फलंदाजी क्रिकेट पीच इतकी प्रभावी ठरली नाही, असंच म्हणायला हवं.

 

sanath jaysuriya inmarathi

===

हे ही वाचा – इंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?