' सुचेता दलालच्या एका ट्विटमुळे अदानी ग्रुपला करोडोंचं नुकसान: वाचा नेमकं काय झालं? – InMarathi

सुचेता दलालच्या एका ट्विटमुळे अदानी ग्रुपला करोडोंचं नुकसान: वाचा नेमकं काय झालं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्कॅम १९९२ ही सिरिज सगळ्यांना आठवत असेलच, त्यात इश्क है तो रिस्क है म्हणत कित्येकांना इन्व्हेस्टमेंट शेयर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे धडे देणारा हर्षद मेहता सगळ्यांचाच फेवरेट झाला.

बँकिंग सिस्टिममधला सर्वात मोठा घोटाळा करूनसुद्धा हा बिग बुल आणि त्याचा खडतर प्रवास लोकांनी खूप एंजॉय केला!

याच सिरिजमध्ये काही आणखीन महत्वाची पात्रंसुद्धा दाखवण्यात आली, त्यातलं सर्वात महत्वाचं पात्र म्हणजे बिझनेस पत्रकारीतेत नाव कमावणारी आणि हर्षद मेहताचा मुखवटा जनतेसमोर टराटरा फाडणारी सुचेता दलाल!

हे ही वाचा शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

sucheta dalal inmarathi

 

हर्षद मेहता स्कॅम असो किंवा २००१ सालचा केतन पारेख घोटाळा असो किंवा एनरॉन प्रकरणातील गैरव्यवहार असोत, हे सगळं उघडकीस आलं ते फक्त सुचेता दलाल यांच्यामुळेच!

सध्या सुचेता दलाल या सगळ्यापासून तशा लांब असल्या तरी त्यांनी हे कोर फील्ड सोडलेलं नाही, एका मॅगजीनची एडिटर म्हणून काम करत असल्या तरी देशातल्या आर्थिक घडामोडींवर, शेअर मार्केटमधल्या हालचालींवर त्यांचं बारीक लक्ष असतं.

काल तर चक्क सुचेता दलालच्या एका ट्विटमुळे भारतातल्या सर्वात एका नावाजलेल्या कंपनीला करोडो रुपयांचं नुकसान झालं, ती कंपनी म्हणजे अदानी इंडस्ट्रीज!

या कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे आज जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १४ व्या क्रमांकावर आहेत. काही अहवालांच्या अनुसार गेल्या वर्षभरात अदानी यांच्या संपत्तीत कमालीची वाढ झालेली दिसून आली आहे.

 

adani inmarathi

 

त्यांच्या कंपनीचे शअर्समध्ये गेल्या वर्षभरात तब्बल दसपटीने वाढ झालेली असून मध्यंतरी गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्याशी बरोबरी करण्यात फारच जवळ आले होते.

आपल्याला तर माहिती आहेच सध्या भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ति कोण आहे, आणि रेसधल्या पहिल्या नंबरच्या स्पर्धकाकडून किंवा त्या व्यक्तीच्या अधिपत्याखाली असलेल्या समाज माध्यमातून आपल्याशी बरोबरी करू पाहणाऱ्या व्यक्तीला मागे टाकायचा हा एक प्लॅन आहे अशीही मार्केटमध्ये चर्चा होताना दिसत आहे!

पण सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळेच अदानी ग्रुप पार हादरून गेला आहे, अदानी ग्रुपमधली ही वाढ खरी आहे का हा देखील शेअर मार्केटमधला एक मोठा बुडबुडाच आहे जो कधीही फुटू शकतो याबद्दल पुसटशी कल्पना सुचेता दलाल यांनी दिली आणि पुढे त्याचा फटका अदानी ग्रुपला बसला!

काय होतं ते नेमकं ट्विट आणि त्यामुळे अदानी यांनी कसा फटका बसला त्याविषयी विस्तृतपणे जाणून घेऊया!

अदानी ग्रुपमध्ये नेमकं काय घडलं?

अलबुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड, एपीएमएस फंड या तीन विदेशी कंपन्यांनी अदानी ग्रुपमध्ये एक मोठी रक्कम गुंतवल्याने National Security Depositary Limited (NSDL) या यंत्रणेने त्या विदेशी फर्मची खाती फ्रीज म्हणजेच गोठवली आहेत!

 

NSDL inmarathi

 

या तीनही कंपन्यांचे तब्बल ४३ हजार कोटी एवढ्या रक्कमेचे शेअर्स गोठवण्यात आले असून अदानी ग्रुपमधली ही वाढ कृत्रिम आहे का याची कसून तपासणी सेबीकडून होण्याची शक्यता आहे.

सुचेता दलाल यांनी नेमकं काय ट्विट केलं?

१२ जून रोजी सकाळीच सुचेता यांनी हे ट्विट केलं आणि खासकरून त्यांनी कोणत्याही कंपनीचे यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नाव न घेता देशाला एका गंभीर घोटाळ्याला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला.

 

sucheta dala tweet inmarathi

 

त्या म्हणतात “सेबी ट्रॅकिंग सिस्टममध्ये उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आणखीन एक घोटाळा सिद्ध करण्यात अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे एका विशिष्ट ग्रुपच्या शेअरच्या किंमती ह्या वाढवून दाखवल्या जात आहेत, तेदेखील विदेशी फर्मच्या माध्यमातून!” 

खरंतर अदानी ग्रुप्सचे हे शअर्स ३१ मे आधीच गोठवण्यात आले होते, पण काही कारणास्तव ही माहिती उजेडात आली नव्हती, सुचेता दलाल यांच्या या ट्विटनंतर ही बातमी लगेचच दुसऱ्या दिवशी इकॉनॉमिक टाइम्समध्ये छापून आली.

यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हे राजकीय किंवा आर्थिक विश्लेषक/अभ्यासक यांच्या एका स्टेटमेंटमुळे काय काय घडू शकतं. सुचेता दलाल यांनी केलेल्या या भूकंपामुळे अदानी ग्रुप्सची शेअर व्हॅल्यू ही तब्बल १ लाख ३ हजार कोटी रुपयांनी कमी झाली.

हे ही वाचा पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक!

जसं एलॉन मस्कच्या एका ट्विटमुळे बिटकॉईनचे भाव वरखाली होतात तसंच सुचेता दलाल आणि तिच्यासारख्या पत्रकारांमुळे बऱ्याच मोठमोठ्या उद्योगपतींना एवढं मोठं नुकसान होतं!

 

sucheta dalal 2 inmarathi

 

अदानी ग्रुपने यावर काय स्पष्टीकरण दिलं?

समाज माध्यमं, वृत्तपत्रं यांच्या मार्फत जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा दुपारी लगेच याबाबतीत अदानी ग्रुपने एक ऑफिशियल नोटिस काढून आणि ती सगळ्या मार्केटशी निगडीत समाज माध्यमांना पाठवून असं काही घडलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं!

आता खरंतर या बातमीत किती तथ्य आहे, खरंच ही गुंतवणूक म्हणजे मार्केटमधला फुगवटाच आहे का हे सगळं चौकशी झाल्यावर समोर येईलच. पण तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ती खूप काळजीपूर्वक करा आणि तज्ञांचा सल्ला घेऊनच करा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?