' श्याम बेनेगल, सत्यदेव दुबेंच्या छत्रछायेत घडलेला ‘इबू हटेला’ थेट मार्व्हल युनिव्हर्समध्ये! – InMarathi

श्याम बेनेगल, सत्यदेव दुबेंच्या छत्रछायेत घडलेला ‘इबू हटेला’ थेट मार्व्हल युनिव्हर्समध्ये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ए ग्रेड सिनेमा, बी ग्रेड सिनेमा हे असं वर्गीकरण तुम्हाला फक्त भारतातच बघायला मिळेल, पण याच काही बी ग्रेड सिनेमांमध्ये राजेश खन्नासारख्या सुपरस्टारपासून अक्षय कुमार, शाहरुख खानसारख्या कलाकारांनीदेखील कामं केली आहेत.

८० आणि ९० चं दशक हे हिंदी चित्रपटसृष्टिसाठी तितकं चांगलं नव्हतं, ३ खान मंडळींनी ९० नंतर बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली, त्याआधी सुनील शेट्टी, संजय दत्त, अनिल कपूर, आणि आपला गोविंदा यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना एका वेगळ्याच साच्यात बसवलं होतं!

 

old movies inmarathi

 

त्या काळातले सिनेमे हे बरेचसे एकाच साच्यात बसणारे होते आणि १० पैकी ५ सिनेमे हे बरेचसे अश्लीलतेकडे झुकणारेच होते म्हणून त्याला बी ग्रेड सिनेमा म्हणत असत.

हे ही वाचा बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!

असाच एक बी ग्रेड सिनेमा जो आजच्या काळात कल्ट क्लासिक बनला आहे तो म्हणजे कांती शहा दिग्दर्शित ‘गुंडा’! अत्यंत टुकार आणि अश्लीलतेच्या सगळ्या सीमा पार करणारा हा सिनेमा बघितला जातो तो केवळ यातल्या डबल मीनिंग डायलॉग्ससाठी आणि अचंबित करणाऱ्या अॅक्शन सिक्वेन्ससाठी.

मिथुन चक्रवर्ती पासून मोहन जोशी पर्यंत बऱ्याच मोठ्या कलाकारांनी या सिनेमात काम केलं, त्यातलंच एक पात्र आणि त्याचा तो विचित्र डायलॉग लोकांच्या कायम लक्षात राहिला, ते पात्र म्हणजे ‘इबू हटेला’!

 

ibu hatela inmarathi

 

“मेरा नाम है इबू हटेला, माँ मेरी चूडैल की बेटी, बाप मेरा शैतान का चेला…” हा आणि असे कित्येक डबल मीनिंग डायलॉग आजही कित्येक सिनेप्रेमींना पाठ आहेत, पण तुम्हाला माहितीये का हाच इबू हटेला तुम्हाला आता हॉलिवूडच्या सुपेरहिरोजसोबत दिसणार आहे.

अवेंजरसारखे तगडे सुपरस्टार देणाऱ्या Marvel Studios च्या मोठ्या सिनेमात तुम्हाला इबू हटेला म्हणजेच हरिश पटेल हा बॉलिवूड अभिनेता दिसणार आहे.

Marvel च्या Eternals या फिल्मच्या टीजरमध्ये काही सेकंदांसाठी हरिश यांची झलक पाहायला मिळाली, पण नेटकऱ्यांनी त्यांना बरोबर ओळखले, त्यानंतर चर्चा सुरू झाल्या इबू हटेला हॉलिवूडमध्ये? हे खरं आहे का काही स्टंट?

पण खुद्द हरिश पटेल यांनीच काही दिवसांनी या गोष्टीवर पडदा टाकला, Marvel च्या एका बड्या सुपेरहिरो सिनेमात हरिश यांची छोटीशी भूमिका आहे हे त्यांनी जाहीर केले आणि अचानक कधीही लाईमलाईटमध्ये नसणारे हरिश रातोरात इंटरनेट सेन्सेशन झाले.

 

harish patel inmarathi ]

 

बॉलिवूडमध्ये कायम दुय्यम आणि विनोदी पात्र साकारणाऱ्या हरिश पटेल यांना मारवेलसारख्या बड्या बॅनरच्या सिनेमात कशी संधी मिळाली. त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

मुंबईत एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या हरिश यांचा लहानपणापासूनच अभिनयाकडे जास्त ओघ होता. वयाच्या ७ व्या वर्षापासूनच ते रामायणातील स्त्री तसेच पुरुष पात्र फार खुबीने साकारायचे.

श्याम बेनेगल यांच्या ‘मंडी’ या सिनेमातून हरिश यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि या सिनेमाने त्यांना एक वेगळी ओळख दिली. मधली काही वर्षं त्यांनी सत्यदेव दुबे यांच्याकडे नाटकाचं प्रशिक्षण घेतलं.

 

mandi inmarathi

 

यादरम्यान त्यांना बऱ्याच इंग्रजी नाटकांमध्ये काम करायची संधी मिळाली. बरोबरीनेच बॉलिवूडमध्ये चायना गेट, मिस्टर इंडिया, घातक, अंदाज अपना अपना अशा वेगवेगळ्या सिनेमातून छोट्या मोठ्या भूमिका ते करतच राहिले.

हे ही वाचा बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहूनही स्वबळावर उजळलेला तारा आपल्यालाही प्रेरणा देतो!

टेलिव्हिजनवरही त्यांनी बरंच काम केलं. मालगुडी डेज, भारत एक खोज अशा मालिकांमधल्या त्यांच्या कामांची लोकांनी दखलसुद्धा घेतली, पण आपल्यावर बसलेला कॅरेक्टर  अॅक्टरचा शिक्का त्यांना आजही सलतो!

गुंडासारख्या बी ग्रेड सिनेमाने त्यांना इबू हटेला ही जो ओळख मिळवून दिली त्यामुळे ते जास्त लोकप्रिय झाले खरे, अर्थात त्यांच्या या भूमिकेमुळे नक्कीच त्यांना हॉलिवूडमध्ये काम मिळालेलं नाही असं त्यांनी स्वतः एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

 

gunda inmarathi

 

त्यांनी गंमतीत पुढे असेही म्हणाले की “त्या लोकांनी इबू हटेला पाहिला तर त्यांना हा प्रश्न नक्की पडेल की हा माणूस आपल्या सिनेमात काय करतोय?”

पुढे ते असंही म्हणाले की “मी मुख्य भूमिकेत दिसत नाही म्हणजे माझ्याकडे काहीच काम नाही असं नाही, मी दररोज काम करतो, इंग्रजी नाटकं आणि काही टीव्ही सिरियलमध्ये केलेल्या छोट्या छोट्या रोल्समुळेच मला आज एवढी मोठी संधी मिळाली आहे. गुडा सिनेमपेक्षाही बऱ्याच चांगल्या सिनेमात मी काम केलं आहे.”

२०१९ मध्ये Eternals या सिनेमासाठी हरिश यांनी एक ऑडिशन दिली होती, जेव्हा त्यांना स्क्रिप्ट रीडिंगसाठी सगळ्या कलाकारांसोबत बोलावलं तेव्हा त्यांनी हे मान्य केलं की एंजेलिना जोली आणि सलमा हायक यांच्याव्यतिरिक्त ते कोणालाच ओळखत नाहीत!

 

angelina and salma inmarathi

 

Marvel च्या सिनेमात काम करणार असूनसुद्धा त्यांनी आजवर त्यांचा एकही सिनेमा पाहिलेला नाही असंही त्यांनी कबूल केले आहे. शिवाय इतक्या मोठ्या चित्रपटात काम करताना त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते इंग्रजी भाषेचं.

अपल्याकडचं इंग्रजी आणि त्यांच्याकडचं इंग्रजी यात बराच फरक असल्याने हरिश यांना सुरुवातीला शूट करताना बऱ्याच अडचणी आल्या पण तिथल्या त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना या सगळ्यात फार सावरून घेतलं, असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

हे शेयर करताना त्यांनी त्यांचा आणि ओम पुरी यांचा एक किस्सादेखील सांगितला. ओम पुरी आणि हरिश हे दोघेही हिंदी मिडियममध्ये शिकलेले, ‘My Son fanatic’ या सिनेमात या दोघांनी एकत्र काम केलेलं, दोघेही हिंदीमध्ये शिकले असल्याने ते सीन शूट करताना त्या सीनचा विचार ते हिंदीत करायचे आणि त्याप्रमाणे मग इंग्रजीत संवाद म्हणायचे.

 

harish patel inmarathi 2

 

एवढं सगळ्या अडचणी येऊनसुद्धा हॉलिवूडच्या लोकांनी त्यांना दिलेला मान आणि त्यांना दिलेल्या भूमिका यासाठी ते नेहमीच कृतज्ञ राहतील असंही हरीश म्हणाले.

श्याम बेनेगल, सत्यदेव दुबे अशा दिग्गजांच्या छत्रछायेखाली शिकलेला पण भारतात केवळ कॅरेक्टर अॅक्टर म्हणून सीमित राहिलेल्या हरिश यांच्यातला खरा अभिनेता फक्त हॉलिवूडनेच हेरला.

Marvel Eternals लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून सुपेरहिरोजची एक वेगळीच फळी आपल्याला यात पाहायला मिळणार आहे याबरोबरीनेच आपल्या या बॉलिवूडच्या ‘इबू हटेला’ला त्या सुपेरहिरोजच्या घोळक्यात बघताना प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईल हे नक्की!

 

eternals inmarathi

===

हे ही वाचा कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?