' बिग बींच्या त्या एका चुकीमुळे विनोद खन्ना यांनी अमिताभ सोबत काम करणं टाळलं! – InMarathi

बिग बींच्या त्या एका चुकीमुळे विनोद खन्ना यांनी अमिताभ सोबत काम करणं टाळलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चुका कोणत्या व्यक्तीकडून होत नाही, जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी, कळात नकळत चुका करत असते. आपल्या हातून घडलेल्या शुल्लक चुकीमुळे त्या व्यक्तीला ते आयुष्यभर भोगावे लागते.

अनेकजण निर्णय घेण्याची क्षणी गोंधळले असतात. अति घाई संकटात नेई या म्हणीचा प्रत्यय अनेक चुका करणाऱ्या व्यक्तींना आला असेल, घाईघाईत घेतलेल्या निर्याणाने त्या माणसाचेच नुकसान होते.

कधी कधी माणूस आपल्या चुकीमुळे स्वतःचे नव्हे, तर दुसऱ्याचे नुकसान देखील करू शकतो. कॉर्पोरेट जग असो किंवा सरकारी ऑफिसेस असो मोठ्या अधिकाऱ्याच्या हातून होणाऱ्या चुकीमुळे इतर अधिकाऱ्यांना त्याचा सामना करावा लागतो.

 

Mistake inmarathi

 

चित्रपटसृष्टी यात मागे कशी पडेल? पडद्यावर आपल्याला सगळे व्यवस्थित दिसते, मात्र पडद्यामागची धडपड आपल्याला दिसत नाही. आज मेकिंगचे व्हिडिओ सहज नेटवर उपलब्ध असतात, त्यामुळे आता ते शक्य झाले आहे.

सिनेमा करताना सुद्धा अनेक अडचणी येत असतात. आता सर्व तंत्रज्ञान विकसित झाले आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुखकर झाल्या आहेत. ७०,८०च्या दशकात सिनेमा बनवणे म्हणजे मोठे दिव्य असायचे. तो काळ होता मारधाडीच्या चित्रपटांचा, तर दुसरीकडे समांतर सिनेमाच्या सुरवातीचा.

चित्रपटात मारधाड म्हंटल की साहजिकच कितीही काळजी घेतली तरी हिरो लोकांना थोड्याफार प्रमाणावर दुखापत व्हायचीच. आपल्या जीवावर उदार होऊन फाईट सीन्स करणारे, बॉडी डबलची काम करणारे केवळ सिनेमाच्या प्रेमापोटी अशी काम करतात.

 

lalita pawar 2 inmarathi

हे ही वाचा – मानहानीला कंटाळून अखेरिस ‘जातीचा दाखला’ काढणा-या मराठी अभिनेत्रीची दुर्दैवी कथा

अगदी मराठीत सुद्धा असे सीन्स करताना कलाकारांना दुखापत झाली आहे. भगवान दादांनी एका चित्रपटात ललिता पवार यांच्या कानाखाली मारण्याचा प्रसंग होता, भगवान दादांनी इतक्या जोरात मारले की ललिता पवार याना स्वतःचा डोळा गमवावा लागला होता.

बॉलीवूडचे शहेनशहा असलेल्या बच्चनजींना जेव्हा कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी दुखापत झाली होती. ती दुखापत इतकी गंभीर होती, अनेक दिवस बच्चनजी हॉस्पिटलमध्ये होते. सारा देश त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून देवाकड़े प्रार्थना करत होता.

 

coolie inmarathi

 

बॉलीवूडच्या या दिग्गज अभिनेत्याने सुद्धा त्याच काळात सुपरस्टार असलेल्या अभिनेत्याला एका फाईट सीनमध्ये जखमी केले होते. तो अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. मर्दानी सौंदर्य म्हणून त्या काळात नावाजलेल्या या सुपरस्टारला सुद्धा त्याच्या सौंदर्यात एक काळा डाग लागला होता.

 

Vinod-Khanna-marathipizza00

 

नक्की काय झालं?

जवळजवळ १० चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले. अमर अकबर ऍंथोनी मधले भाऊ असो किंवा हेराफेरी मधले दोन ठग असो, दोघांनी कायमच एकमेकांना ठसन दिली होती.

 

amitabh vinod inmarathi

 

बच्चनजींना मोठा ब्रेक देणारे प्रकाश मेहरा यांनी या दोन सुपरस्टारना घेऊन मुकद्दर का सिंकदर चित्रपट बनवणायचा घाट घातला. याच चित्रपटात एक सीन होता, ज्यात बच्चनजींना विनोद खन्नांच्यावर एक काचेचा तुकडा फेकायचा होता आणि विनोद खन्नांना तो वाचवायचा होता.

सीन तसा जीवाशी खेळणारा असला तरी बॉडी डबल न वापरता विनोद खन्ना तो सीन स्वतः करणार होते, आणि सीन सुरु झाला बच्चनजींनी तो काचेचा तुकडा इतक्या जोरात फेकला तो वाचवण्याच्या प्रयत्नात विनोद खन्नांच्या हनुवटीला दुखापत झाली. बरेच दिवस त्या जखमेची खूण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

या चित्रपटानंतर त्यांनी कधीच एकत्र काम केले नाही. या घटनेमुळे एकत्र काम करत नाही का असा प्रश्न वेळोवेळी पत्रकरांनी विनोद खन्ना याना विचारला होते मात्र त्यांनी नेहमीच या प्रश्नाला दुजोरा दिला.

त्याकाळात या विषयावर अनेक उलट सुलट चर्चा येऊ लागल्या. अमिताभ यांच्या करियरची गाडीने चांगलाच स्पीड पकडला तर दुसरीकडे विनोद खन्नांनी आपली गाडी आध्यात्मकतेकडे वळवली.

 

vinod osho inmarathi

हे ही वाचा – ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ नितीन गडकरींनी अमिताभला झापलं…

पुनीत इस्सर या अभिनेत्यामुळे बच्चनजींना दुखापत झाली होती, तेव्हा पुनीत यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मात्र त्यांनी सुद्धा एका मुलाखतीत सांगितले होते की ‘बच्चनजींच्या हातून सुद्धा अशीच चूक घडली आहे’.

आज जरी सिनेमातील मारधाड कमी झाली असली तरी ऍक्शन चित्रपट आजही काही प्रमाणात बनतात. तंत्रज्ञान विकसित होऊन सुद्धा कलाकार जखमी होत असतात. त्याच्यातून बरे होऊन सिनेमा पूर्ण सुद्धा करतात, शेक्सपिअरच्या शो मस्ट गो ऑन या एका वाक्यावर आपला जीव टाकणारे हे कलाकार आहेत, म्हणूनच तर सिनेमा चालतो आहे.

सिनेमात आपण फाईट सीन्स बघतो तेव्हा आपल्याला ते खरेच वाटतात, पण त्यामागची मेहनत अनेक लोकांची असते. खोटा खोटा खावा लागणारा मार कधी कधी खराच लागून जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?