' ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कंगनाचे "मी हॉट संघी" म्हणत फोटोसह स्पष्टीकरण!

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कंगनाचे “मी हॉट संघी” म्हणत फोटोसह स्पष्टीकरण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कंगना रनौत आणि वादंग, वादविवाद, हे समीकरण आता कुणाहीसाठी नवं राहिलेलं नाही. मग कधी ते ह्रितिक रोशन सोबतचे वाद असोत, तर कधी मुंबईतील घर पालिकेने पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या नावाने एकेरी उल्लेख असो, किंवा ट्विटरवर सतत वादग्रस्त ठरल्यानंतर थेट ट्विटर अकाउंटवर आलेली बंदी असो…

वाद तिथे कंगना किंवा कंगना तिथे वाद असंही कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचं ठरत नाही. ट्विटरवरून बॅन झाल्यानंतर आता इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडे कंगनाने तिचा मोर्चा वाळवल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळतंय. सध्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही माध्यमांचा ती पुरेपूर वापर करून घेतेय असं दिसतंय.

 

kangana featured inmarathi

===

हे ही वाचा – इतरांचं ते फ्रीडम ऑफ स्पीच, कंगना करेल ते हेट स्पीच : वाह रे ट्विटर अजब तुझे नियम!

===

हे असं असताना, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिने वादग्रस्त किंवा प्रचंड व्हायरल जाईल अशी पोस्ट केली नसती तरच नवल! यावेळी तिने यासाठी इंस्टाग्रामचा पर्याय निवडलाय. संघाबद्दल भाष्य करणाऱ्या एका ऑडिओ क्लिपला उत्तर म्हणून तिने हे पाऊल उचललंय.

संघावर टीका करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील लोकांवर टीका केलेली आहे. एवढंच नाही तर संघातील महिला या आकर्षक किंवा हॉट नसतात, असा सूर या ऑडिओ क्लीपमध्ये लावल्याचं दिसून येतंय.

हल्ली नियमितपणे साडी परिधान करून वावरणाऱ्या कंगनाला ही बाब फारशी रुचलेली दिसत नाही. हा मुद्दा खोडून काढत, संघातील महिला सुद्धा आकर्षक असतात, हे पटवून देण्याचं जणू कंगनाने मनावर घेतलं आणि त्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला.

 

kangana in saree inmarathi

 

कंगनाचे हॉट फोटो आणि…

सध्या रोजच्या आयुष्यापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे केवळ साडीमध्ये दिसणाऱ्या कंगनाने दोन हॉट फोटोज इंस्टाग्रामच्या स्टोरीवर टाकलेले आहेत. एवढं करून ती थांबलेली नाही, तर त्या फोटोजमधून तिने दिलेले संदेश सुद्धा काहीसे खोचक आणि तिच्या नेहमीच्या आक्रमक शैलीला साजेसे आहेत.

 

kangana hot sanghi inmarathi

 

पहिल्या फोटोला कॅप्शन म्हणून, ‘लिब्रूज: संघी महिला हॉट नसतात; मी: माझी बियर धरा’ अशी कॅप्शन पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या फोटोमध्ये थेट ‘हॉट संघी’ हे शब्द वापरून हॅशटॅगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. थोडक्यात काय, तर ‘संघी महिला आकर्षक नसतात’, हे बाईंच्या फारच मनाला लागलेलं दिसतंय.

हे फोटो इंस्टाग्रामवर टाकून तिने त्या ऑडिओ क्लिपला उत्तर दिलं आहे, असं म्हणायला नक्कीच वाव आहे. अन्यथा एरवी साडीतच दिसणाऱ्या कंगनाला, हे फोटो आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यायला सुचलंच नसतं. चर्चेत कसं राहायचं हे कंगनाला अगदी पक्कं ठाऊक आहे, नाही का…!!

प्रत्येकच विषयावर असं एखादं, वादग्रस्त विधान करून चर्चेत राहण्याची कंगनाची ही पहिली वेळ नाही; आणि शेवटची तर अजिबातच नाही.

===

हे ही वाचा – कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा!

===

आयकर भरला नाही, कारण…

सर्वाधिक आयकर भरण्याच्या स्लॅबमध्ये असणारी कंगना याबद्दल म्हणाली होती, की ‘सध्या कामच नसल्यामुळे मला मागच्या वर्षीचा आयकर सुद्धा पूर्ण भरणे शक्य झालेले नाही. सध्या सरकार या करासोबत त्यावर व्याजही आकारत आहे. मात्र मी सरकारच्या निर्णयाशी सहमत आहे.’

कंगना ही भाजप धार्जिणी असल्याची आणि तिला लवकरच भाजपकडून निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा नेहमीच होत असते. या पार्श्वभूमीवर, तिचं हे विधान म्हणजे, ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था आहे, असंच म्हणायला हवं.

 

kangana ranaut crying inmarathi

 

संघी महिलांवर झालेल्या या टीकेवर उत्तर देण्यासाठी धावून आलेली कंगना, आता यापुढे आणखी काय काय वादग्रस्त विधानं करेल हे फक्त आणि फक्त तो सर्वशक्तिमान परमेश्वरच जाणे…!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?