' खुद्द ब्रह्मदेव जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घेतात…! – InMarathi

खुद्द ब्रह्मदेव जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घेतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘श्रीकृष्ण म्हणजे आनंदाचे मूर्तिमंत उदाहरण, देवकीपुत्र, प्रेमाचे उगमस्थान’ असे म्हंटले जाते. श्रीकृष्णाच्या जन्मापासून त्याला संघर्ष करावा लागला होता. श्री कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे असे मानले जाते. श्रीरामाप्रमाणे श्रीकृष्णदेखील ऐतिहासिक व्यक्ती असावी असे संशोधकांचे म्हणणे आहे.

गोकुळात आपल्या खोडकर स्वभावाने सगळ्यांच्यात प्रेम, स्नेह निर्माण करणारा, दुष्ट राक्षसांचा वध करणारा, स्त्रियांचे, पाळीव प्राण्यांचे रक्षण करणारा, असा हा श्रीकृष्ण आजच्या युगातला ही वाटतो. गीतेमधले त्यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात.

 

bal krishna inmarathi

 

भगवान श्रीकृष्णाच्या जीवनकाळात अनेक घटनांमधून आपल्याला शिकता येते. खोडकर स्वभाव असलेल्या श्रीकृष्णाने अनेकांच्या परीक्षा घेतल्या होत्या, या जगाच्या निर्मितीत मुख्य मानल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाने खुद्द एकदा श्रीकृष्णाची परीक्षा घेतली होती.

ब्रह्माने श्रीकृष्णाची लहानपणीच परीक्षा घेतली होती. कारण श्रीकृष्णाच्या पराक्रमांची गाथा ब्रह्मदेवांपर्यंत पोहचली होती. म्ह्णूनच त्यांनी श्रीकृष्णाची परीक्षा घेणायचे ठरवले. त्यांनी ब्रम्हलोंकातून पृथ्वीवर जाणायचे ठरवले.

 

bramha inmarathi

हे ही वाचा – श्रीकृष्ण: महाभारत घडविणारा, जीवन जगायला शिकवणारा, अतिशय स्मार्ट “स्ट्रॅटेजिस्ट”

श्रीकृष्णाची परीक्षा घेण्याआधी ब्रह्मदेवाला हे सुद्धा कळले होते की, विष्णूने देखील पृथ्वीवर अवतार घेतला आहे. त्यामुळे विष्णूचा अवतार सुद्धा बघता येईल. म्हणून ते पृथ्वीवर आले.

पृथ्वीतलावरील कृष्णाचा अवतार बघून ब्रह्मदेव अचंबित झाले. एखादे लहान मुल जसे खेळते, बागडते त्याच प्रकारे श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत आणि गायी वासरांसोबत खेळत होता, इतकाच नव्हे तर हे सर्व बालगोपाळ मातीत खेळात होते, मज्जा मस्ती करत होते. त्याच छोट्या हातांनी एकमेकांना भरवत सुद्धा होते.

श्रीकृष्णाचे हे सामान्य मुलाचे रूप बघून ब्रह्मदेवाचा विश्वास बसेना, कारण विष्णूचा अवतार असलेला हा इतका सामान्य असू शकत नाही. म्हणून त्यांनी ठरवले की या मुलाची परीक्षा घेऊयात.

 

krishna and sudama inmarathi

 

श्रीकृष्ण जेव्हा आपल्या मित्रांसोबत खेळण्यात दंग होता तेव्हा ब्रहदेवाने हळूच तिथे असलेल्या गाई आणि त्यांच्या वासरांना उचलून ब्रह्मलोकात नेले. आपल्या गाई दिसत नाही हे कळल्यावर श्रीकृष्ण त्यांना शोधायला निघाला. याचा फायदा घेऊन ब्रह्मदेवाने त्याच्या मित्रांना देखील उचलून ब्रह्मलोकात नेले.

 

krishna 4 inmarathi

 

श्रीकृष्णची झालेली फजिती बघायला, काही वेळानंतर ब्रह्मदेव पुन्हा पृथ्वीवर अवतरले,  मात्र पृथ्वीवर आल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण ज्या गाईंना, मुलांना त्यांनी ब्रम्हलोकात नेले होते, तेच सर्वजण पृथ्वीतलावर होते. त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने ब्रह्मलोकात पाहिले तर तिथेही हेच लोक दिसत होते आणि पृथ्वीतलावर बघितल्यावर सुद्धा हेच लोक दिसत होते.

हे सर्व पहिल्यांनंतर ब्रह्मदेवाला जाणवले की, श्रीकृष्णानेच हा अद्भुत पराक्रम केला असेल. ब्रह्मदेवाने लगेचच मनोमन विष्णूकडे प्रार्थना केली की ‘या सर्व प्रकारातील सत्य उलगडू द्या’ आणि काही क्षणातच श्रीकृष्ण आपल्या विराट रूपात अवतरले. आणि ब्रम्ह देवाला म्हणाले  ‘या चराचर सृष्टीत जे काही आहे ते माझ्यापासूनच बनले आहे’.

 

mahabharat-krishna-inmarathi

हे ही वाचा – साक्षात श्रीकृष्णानेच दिले भूमिका स्वीकारण्याचे संकेत, वाचा या अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं

भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या या कृष्णाने अनेकांना दृष्टांत दिले आहेत. आजही आपल्याकडे गोकुळाष्टमी मोठ्या उत्सहात साजरी करतात. फक्त रासलीलांपुरता श्रीकृष्ण नाही तर मानवी जीवनाच्या अनेक पैलूंचा महत्व सांगणारा हा एक युगपुरुष आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?