' दुर्गा माचा ग्लॅमरस लुक ते वादग्रस्त लग्न: इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या नुसरत जहाँचे किस्से – InMarathi

दुर्गा माचा ग्लॅमरस लुक ते वादग्रस्त लग्न: इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या नुसरत जहाँचे किस्से

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बंगालची नुसरत जहाँ आणि तिच्या लग्नाचे फोटो सध्या सगळ्यांच्याच न्यूज फिडमध्ये दिसत असतील. २ वर्षांपूर्वी झालेल्या या लग्नामुळे सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे, आधी सिनेक्षेत्र आणि मग राजकारण अशा दोन्ही क्षेत्रात नाव कमवणारी नुसरत जहाँ आणि तिचं लग्न हा विषय सध्या बराच चर्चिला जातोय.

वेगवेगळ्या बंगाली सिनेमात काम करणाऱ्या नुसरत जहाँने २०१९ साली राजकारणात सक्रिय होऊन काम करायचं ठरवलं आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेस पक्षात सामील झाली, आणि लोकसभा सदस्य म्हणून तिची वर्णी लागली.

याच दरम्यान म्हणजे १९ जून २०१९ मध्ये तिने निखिल जैनशी लग्न केलं, तुर्कीतल्या बोद्रममध्ये हे लग्न पार पडलं आणि त्यावेळेस यावरून बरीच चर्चा झाली होती, शिवाय त्यांचे ममता बॅनर्जी यांच्यासोबतचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते.

 

nusrat jahan marriage inmarathi

 

पण आता अवघ्या २ वर्षाच्या कालावधीतच हे लग्न मोडल्याचं चित्र समोर येत आहे. काही लोक याला लीव्ह इनचा एक प्रकार म्हणतायत तर काही लोकं आणखीन काही, पण तब्बल २ वर्षांनी हा वाद का निर्माण झालाय ते आपण जाणून घेऊया.

नुसरत ही सध्या गर्भवती आहे आणि लवकरच ती आई होणार आहे आणि याबाबत निखिल जैनला विचारणा झाल्यावर “या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. मी सध्या नुसरतसोबत रहातही नाही” असं खळबळजनक विधान निखिलने केलं!

हे ही वाचा पुरुषांनो, नको त्या लफड्यात अडकायचं नसेल तर हे १३ नियम तुम्ही पाळायलाच हवेत!

तेव्हापासून यांच्या लग्नाविषयी सोशलमीडियावर चर्चा व्हायला सुरुवात झाली. यानंतर नुसरत जहाँने हे लग्न अवैध आणि बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं शिवाय निखिल जैनवर आर्थिक घोटाळ्यांचे आरोपही केले.

पुढे याबाबतीत स्पष्टीकरण देताना नुसरतने सांगितलं की तुर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार तुर्कीमध्ये झालेलं त्यांचं लग्न हे पूर्णपणे बेकायदेशीर होतं.

 

nusrat 2 inmarathi

 

दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी लग्न केल्याने त्या लग्नाला तिथे मान्यता मिळणं शक्य नव्हतं, हे लग्न नसून लीव्ह इंन रिलेशनशिपच होतं असंही नुसरतने कबूल केलं आहे.

आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल जास्त चर्चा होऊ नये म्हणून कधीच नुसरतने याबद्दल वाच्यता केली नाही असंही तिने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हंटलं आहे. आपलं लग्न बेकायदेशीर असूनदेखील निखिलने आपल्याकडून बरेच पैसे लुबाडल्याचा आरोपही तिने केला आहे.

शिवाय या सगळ्या प्रकरणाची जास्त चर्चा करून निखिलला ‘हीरो’ बनवू नये अशी विनंती तिने मीडियाकडे केली आहे.

बंगाली अभिनेत्री नुसरत जहांचा बोल्ड अंदाज काही तिच्या फॅन्ससाठी नवीन नाही, चित्रपटात काम करतानासुद्धा आपल्या बोल्ड फोटोजसाठी नुसरत सोशलमीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

 

nusrat jahaan bold inmarathi

 

चित्रपटांना रामराम ठोकून राजकारणात शिरल्यावरही नुसरतचा हा बोल्ड अंदाज कमी झाला नाही, यावरून तिची प्रचंड आलोचना झाली.

गेल्याच वर्षी तिने दुर्गा माच्या अवतारातला एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता, त्यामुळे तर तिचा खूपच विरोध होत होता, एक पोलिटिकल लीडर असूनही तिच्या या अशा वर्तणूकीमुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा आल्या होत्या!

एवढंच नाही तर जेव्हा भारत सरकारने टिक-टॉक या चायनीज एपवर बंदी आणली तेव्हासुद्धा त्याविरोधात नुसरतनेसुद्धा भाष्य केलं होतं, टिकटॉकच्या माध्यमातून पैसे कामावणाऱ्या कलाकारांच्या रोजगाराविषयी तिने प्रश्नचिन्ह उभं केलं.

या मुद्द्यावरून तिला बरंच ट्रोल केलं गेलं, लोकसभेची सदस्य असूनही तिला आपल्या देशातल्या जवानांची किंमत नाही असंदेखील तिच्याबद्दल बोललं जाऊ लागलं.

 

nusrat jahan tiktok inmarathi

 

आता तर जैन हिंदू मुलाशी केलेल्या लग्नाच्या वादामुळे नुसरत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. निखिल जैन आणि नुसरत दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकलेत. कोणाची बाजू सत्याची आहे हे सांगणं खरंच कठीण आहे.

निखिलच्या टेक्स्टाइल कंपनीचं प्रमोशन एकेकाळी नुसरत करायची, कलकत्त्याच्या बड्या उदयोपगपतींमध्ये निखिल जैन हे नाव घेतलं जातं. नुसरतने लावलेले सगळे आरोप खोटे आहेत असं निखिलचं म्हणणं आहे.

एकंदरच सोशलमीडियावरसुद्धा या बेगडी लग्नावरुन चांगलेच वाद रंगतायत, नुसरतने जे केलं ते निखिलने केलं असतं तर हाच मुद्दा मीडियाने इतका उचलून धरला असता का? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

 

nikhil jain inmarathi

 

या सगळ्या प्रकरणात कोणाची बाजू सत्याची हे येणारा काळच ठरवेल, पण आपल्या देशातल्या एका राज्यातली महिला सांसद लग्नासारख्या पवित्र बंधनाची अशाप्रकारे खिल्ली उडवते हे किती लाजिरवाणे आहे!

===

हे ही वाचा हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?