' भारत-चीन सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी, अटलजी चक्क ८०० मेंढ्या घेऊन पोचले…!! – InMarathi

भारत-चीन सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी, अटलजी चक्क ८०० मेंढ्या घेऊन पोचले…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पाकव्याप्त काश्मीर असो, किंवा भारत-चीनचा सीमावाद, हे प्रश्न नवीन नाहीत. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला शह देणं, चीनशी झालेलं युद्ध अशा महत्त्वपूर्ण घटना सुद्धा सगळ्यांना माहित असतात.

केवळ भारतच नव्हे, तर जगातील अनेक देशांशी या ना त्या मार्गाने चीन नडत असतो असं म्हणणं चुकीचं ठरत नाही. कोरोना महामारीचं संकट आणि त्याचा चीनशी असणारा संबंध हा विषय सुद्धा, जगभरात सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेने तर हा घातक व्हायरस चीनमध्येच निर्माण झाला असल्याचा थेट आरोप केला आहे.

चीनचा वात्रटपणा आणि इतर देशांनी त्यासमोर घेतलेली माघार, अशा अनेक घटना ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या असतील. पण याच चीनला अटलबिहारी यांनी त्यांच्या हुशार आणि मिश्किल शैलीत एकदा झकास उत्तर दिलं होतं. आज तोच किस्सा आपण पाहुयात…

 

atal bihari inmarathi

===

हे ही वाचा – “मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे

===

चीनचा सीमा विस्ताराचा डाव…

ही गोष्ट आहे, सप्टेंबर १९६५ मधली; म्हणजे भारताला चीनकडून युद्धात पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर अवघ्या ३ वर्षांनंतरची! सिक्कीमवर नजर ठेऊन चीनने पुन्हा त्याच्या कुरापती सुरु केल्या होत्या. सिक्कीममध्ये घुसत देशाचा सीमाविस्तार करण्याचा कपटी डाव चीनच्या मनात होता.

भारताला एकदा युद्धात धडा शिकवला, तसंच त्यांना पुन्हा एकदा तोंडघशी पाडावं असा विचार चीन करत होता. त्याचवेळी एका बाजूला काश्मीरमधील पाकिस्तानी घुसखोरांशी भारतीय सैन्य दोन हात करत होतं. त्यामुळे भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करायचं चीनने निश्चित केलं होतं.

 

indo china dispute inmarathi

 

येन केन प्रकारेण भारतीय सैन्याशी सीमावाद उकरून काढायचा असं चीनने ठरवलं होतं. भारतीय सैन्याने चीनच्या ८०० मेंढ्या आणि ५९ याक चोरले असल्याचा दावा करणारं पत्र चीनने ऑगस्ट १९६५ मध्ये भारतीय सरकारला लिहिलं. अर्थातच, या आरोपाचा स्वीकार भारताने केला नाही.

===

हे ही वाचा – १९६२ च्या लाजिरवाण्या पराभवाबद्दल भारतीय सरकार ह्या गोष्टी अजूनही लपवून ठेवत आहे

===

अटलबिहारी यांनी लढवली शक्कल

भारतीय सरकारने तर आरोप फेटाळून लावलेच, मात्र तत्कालीन जणसंघाचे तरुण नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी चीनला दिलेलं उत्तर, ही त्यांच्य्यासाठी सणसणीत चपराक ठरली.

अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी ४२ वर्षांचे होते. या राजकीय नेत्याने त्यावेळी ८०० मेंढ्यांचा एक कळप गोळा केला आणि त्या मेंढ्या घेऊन ते थेट भारतातील चीन दूतावासाकडे पोचले. या मेंढ्यांचा कल्पासोबत एक सूचना लिहिलेली होती, ‘आम्हाला खा, पण जगाला वाचवा.’

या अशा प्रकारच्या प्रत्युत्तराची अपेक्षा चीनने अजिबातच केली नव्हती. करायला गेलो एक आणि झालं भलतंच, अशी चीनची अवस्था झाली. हा चीनला भारताने केलेला अपमान वाटला.

या अपमानामुळे पेटून उठलेल्या चीनने भारत सरकारला आणखी एक पात्र पाठवलं. यात केलेला आरोप तर अधिकच गंभीर होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारचा या प्रकरणाला पाठिंबा होता, असा घणाघाती आरोप चवताळलेल्या चीनने केला होता.

 

lalbahadur shastri inmarathi3

 

अर्थात, हा आरोप सुद्धा झिडकारून देत, भारत सरकारने याविषयी त्यांचं स्पष्ट आणि ठाम मत मांडलं होतं. चीन देत असलेल्या युद्धाच्या धमक्या आणि मूर्खपणा याला दिल्लीमधील एका नागरिकाने दिलेलं हे मिश्किल आणि विनोदी उत्तर आहे, असं भारत सरकारने चीनला उत्तर दिलं.

चीनच्या आरोपांमधील सत्य आणि इतर आरोप

भारतीय सैन्याने ४ तिबेटी नागरिकांचं अपहरण केलं आहे, असा आरोपसुद्धा चीनने भारतावर केला होता. ते चार जण म्हणजे इतर तिबेटी नागरिकांप्रमाणेच भारताच्या आश्रयाला आलेले लोक आहेत, असं भारताने चीनला सांगितलं होतं. ते त्यांच्या मर्जीने आले आहेत, तसेच त्यांच्या मर्जीने परत जाऊ शकतात, असंही स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

या चार जणांपैकी २ महिलांनी त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचं सांगत भारतीय हद्दीतील पोलीस ठाणं गाठलं होतं. मात्र त्यांचा चीनला साफ विसर पडलेला दिसला.

 

tibet inmarathi

 

याउलट इतर २ तिबेटी, म्हणजेच दोन मेंढपाळांचा आधार घेऊन भारतावर आरोप करण्याचा प्रयत्न चीन करत असल्याचं भारत सरकारने स्पष्ट केलं. याकबद्दल काहीही माहित नसून, त्या मेंढ्या याच दोन मेंढपाळांच्या आहेत, असं त्या पत्रात म्हटलेलं होतं. एवढंच नाही, तर या तिबेटींना जेव्हा पुन्हा तिबेटमध्ये जाऊन राहायचं असेल, तेव्हा ते त्यांच्ग्या मेंढ्या घेऊन इथून जाऊ शकतात, हेदेखील या उत्तरात म्हटलेलं होतं.

===

हे ही वाचा – अटल सरकार केवळ १ मताने का हरलं अविश्वास ठराव? इतिहासाचा असाही एक धांडोळा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?