' सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बोल्डनेस आणि बॉलिवूड यांचं नातं कीती जुनं आहे ते वेगळं सांगायची अजिबात गरज नाही, आणि खासकरून हिंदी सिनेमातल्या अभिनेत्रींच्या बोल्ड अवताराबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे.

मेरा नाम जोकरमधल्या झाडीत जाऊन कपडे बदलणाऱ्या सीम्मी गरेवालपासून, लस्ट स्टोरीजमधल्या हस्तमैथुन करणाऱ्या कियारा अडवाणीपर्यंत कित्येक अभिनेत्रींनी त्यांच्या करियरमध्ये कधी ना कधीतरी असे बोल्ड सीन्स दिले आहेत.

 

bold bollywood inmarathi

 

काही अभिनेत्री त्यांच्या बोल्ड अवताराप्रमाणेच त्यांच्या दमदार अभिनयासाठीसुद्धा ओळखल्या जातात, जसं की विद्या बालन!

बी ग्रेड सिनेमातली स्टार सिल्क स्मितावर बेतलेल्या The Dirty Picture या सिनेमातला विद्याचा बोल्ड अंदाज लोकं कधीच विसरू शकणार नाहीत, पण त्याबरोबरच तिने जो दमदार अभिनय केला त्याचीसुद्धा तेवढीच प्रशंसा झाली.

हे ही वाचा बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!

बोल्डनेस आणि अभिनय हा समतोल फार कमी अभिनेत्रींना साधता आला त्यातल्या मोजक्या नावांपैकी एक विद्या बालन!

 

vidya balan inmarathi

 

पण याच बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या फक्त आपलं नाव चर्चेत राहण्यासाठी बोल्ड सीन्स देतात आणि त्यामुळेच त्या लोकांच्या लक्षात राहतात. यातल्या बऱ्याच अभिनेत्रींनी तर केवळ आपलं नाव चर्चेत राहावं यासाठी सगळ्या सीमा पार केल्या होत्या.

जाणून घेऊया त्याच काही अभिनेत्रींविषयी ज्या केवळ बोल्डसीन्समुळे चर्चेत राहतात आणि त्यांच्या या बोल्ड सीन्सवर सेन्सॉरची कात्री चालली तर त्या बॉलिवूडमध्ये कधीच दिसणार नाहीत!

१. शर्लिन चोप्रा :

सध्या सोशलमीडियावर आणि खासकरून इंस्टाग्रामवर शर्लिन चोप्रा ही तिच्या खास बोल्ड फोटोज आणि व्हीडियोजमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या शर्लिनने बॉलिवूडमध्येसुद्धा तिचं नशीब आजमावायचा प्रयत्न केला होता.

पण एक बोल्ड सिनेमा केल्यानंतर तिला केवळ बोल्डसीन्ससाठीच सिनेमात घेतलं जाऊ लागलं. तिने तिच्या सिनेमात अश्लीलतेचे सर्वच रेकॉर्ड मोडले.

 

sherlyn chopra inmarathi

 

कामसूत्रा ३डी या सिनेमासाठी तर तिने चक्क न्यूड सीन्ससुद्धा दिले, पण तरीही त्या सिनेमाची कुणीच दखलही घेतली नाही आणि शर्लिन चोप्रा म्हणजे अश्लील हे जणू समीकरणच बनलं.

आजही तिचे सोशल मीडियावर जे फॉलोवर्स आहेत ते केवळ तिच्या या बोल्ड अवतारामुळेच, बाकी अभिनयाशी तिचा काडीचाही संबंध नाही!

२) सनी लीऑनी :

पॉर्न इंडस्ट्री सोडून हिंदी सिनेमात आपलं करियर घडवायला आलेल्या सनीची कहाणी सगळ्यांना ठाऊक असेलच, तिच्या या प्रवासावर स्वतंत्र सिरिजदेखील बनवली गेली.

ते म्हणतात ना आपण केलेली कर्मच आपल्या भविष्याच्या आड येतात तसंच सनीच्या बाबतीत घडलं. पॉर्नस्टारची इमेज पुसण्यासाठी सनीने बॉलिवूडचा सहारा घेतला खरा पण बॉलिवूडनेही केवळ सनीच्या हॉट आणि बोल्ड इमेजलाच ग्लोरीफाय केलं!

आज सनी एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून स्वतःला मिरवते खरी पण आजही तिला सिनेमात केवळ आयटम गर्ल म्हणून किंवा हॉट आणि बोल्ड सीन्स देण्यासाठीच घेतलं जातं.

 

sunny leone inmarathi

 

वैयक्तिक आयुष्यात सनी एक सुजाण नागरिक जरी असली तरी तिच्या या हॉट आणि बोल्ड अवतराने तिचं अभिनयाचं स्वप्न धुळीला मिळवलं हेदेखील तितकंच खरं आहे.

३) राधिका आपटे :

हे नाव वाचून बरेच लोकं चक्रावतील, राधिका ही उत्तम अभिनेत्री आहेच याबद्दल अजिबात दुमत नाही, पण तिलाही जी ओळख मिळाली आहे ती तिच्या या बोल्ड अंदाजामुळेच.

विद्या बालनप्रमाणेच राधिकाचा अभिनयही अव्वल दर्जाचा आहे पण अनुरागच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये दिलेला तो विचित्र सीन किंवा parched या सिनेमात दिलेला न्यूड सीनमुळे तिच्या अभिनयापेक्षा तिच्या या सीन्सचीच चर्चा अधिक झाली.

 

radhika apte inmarathi

 

निश्चितच राधिका ही उत्तम अभिनेत्री आहे आणि तिचं भविष्य ऊज्वल आहे यात शंकाच नाही, पण तिलाही तिच्या बोल्ड इमेजचा कुठेतरी त्रास होत असणार हेदेखील सत्य आहे!

४) झरीन खान :

बॉलिवूडचा दिलदार भाईजानने ज्या काही मुलींना स्टार बनवलं त्यापैकी एक झरीन खान. सलमानच्या वीर सिनेमात जेव्हा लोकांनी तिला पाहिलं तेव्हा तिची तुलना कतरिना कैफ हिच्याशी केली गेली.

हे ही वाचा यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!

पण तरीही तिला काही खास काम इंडस्ट्रीमध्ये मिळालं नाही, गेल्या काही वर्षांपासून झरीन पुन्हा चर्चेत आली ती हेट स्टोरीज या सिनेमात दिलेल्या बोल्ड सीन्समुळे. त्यानंतरही आलेल्या एका म्युझिक व्हीडियोमध्ये तिने असेच बोल्ड सीन्स दिले.

 

zareen khan inmarathi

 

आज इतकी वर्ष होऊनही चर्चेत राहण्यासाठी झरीनला हे असे सीन्स द्यावे लागले आणि आणि आता तिची इमेजही तशीच बनली आहे.

सलमानने जरी स्टार बनवलं तरी अभिनयाशी गंध नसलेल्या झरीनला आज केवळ प्रेक्षकांच्या लैंगिक भावना चाळवण्यासाठीच घेतलं जातं हे उघड सत्य आहे.

५) नेहा धुपिया :

“बॉलिवूडमध्ये फक्त SRK म्हणजेच शाहरुख आणि सेक्स विकलं जातं” हे खळबळजनक विधान करणाऱ्या नेहा धुपियाला विसरून कसं चालणार? कदाचित हे स्टेटमेंट नेहाने फारच मनावर घेतलं आणि जुली, शिषासारख्या सिनेमात काम करून स्वतःच्या या स्टेटमेंटला पुष्टी दिली.

या दोन सिनेमात दिलेल्या अत्यंत भडक आणि अश्लील सीन्समुळे नेहा चर्चेत राहिली खरी पण ती त्या हॉट बोल्ड इमेजच्या बाहेर कधीच पडू शकली नाही.

 

neha dhupia inmarathi

 

अगदी नुकत्याच आलेल्या करण जोहरच्या नेटफ्लिक्सवरच्या लस्ट स्टोरीजमध्येसुद्धा तिची भूमिका एका बोल्ड आणि मादक शिक्षिकेचीच होती. अभिनय क्षमता असूनही नेहाला केवळ सेक्स सिम्बल म्हणूनच चित्रपटात घेतलं जातं!

६) उदिता गोस्वामी :

बॉलिवूडच्या सिरियल कीसर इम्रान हाश्मीला त्याच्या उभरत्या काळात टक्कर देणारी अभिनेत्री म्हणून उदीत गोस्वामीचं नाव समोर येतं.

इम्रानची इमेज सिरियल कीसर होती आणि कालांतराने त्याने ती पुसून त्याच्यातला अभिनेता त्याने बाहेर काढला, पण त्याच काळात इम्रानप्रमाणेच बोल्ड सीन देणाऱ्या उदिताला ते शक्य झाले नाही.

 

udita goswami inmarathi

 

इम्रानसोबत जेहेर, अक्सर आणि जॉनसोबत पाप सारख्या सिनेमातून उदिताने अत्यंत बोल्ड सीन्स दिले खरे, पण तिथेच तिच्या अभिनयाला ब्रेक लागला. खरंतर तिला तिची अभिनय क्षमता दाखवण्यासारखे चित्रपट पुढे मिळालेच नाहीत.

पण आजही उदिता गोस्वामी हे नाव समोर आलं की इम्रानसोबत दिलेले तिने ते भडक सीन्सच डोळ्यासमोर उभे राहतात!

७) इशा गुप्ता :

सध्याची इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी इशा गुप्ता आणि अभिनय या कधीच न जुळून येणाऱ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियावर येणारे बोल्ड न्यूड फोटोज असोत किंवा इम्रान हाश्मीबरोबर दिलेले सिनेमातले बोल्ड सीन्स, इशा कायम याच गोष्टींमुळे चर्चेत राहिली.

 

esha gupta inmarathi

 

तिलाही बऱ्याच सिनेमातून तिच्यातलं अभिनयाचं कसब दाखवायची संधी मिळाली खरी पण त्यात यश न मिळाल्याने तिने आपल्या बोल्ड अवतारातच राहणं जास्त पसंत केलं!

===

हे ही वाचा एका शब्दामुळे अर्थाचा अनर्थ झाल्याने बॉलिवूडची ही ६ गाणी सापडली वादाच्या भोवऱ्यात

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?