' जेव्हा 'करोडपती' बिग बी कुमार विश्वास यांच्याकडे केवळ "३२ रुपये" मागतात तेव्हा...!

जेव्हा ‘करोडपती’ बिग बी कुमार विश्वास यांच्याकडे केवळ “३२ रुपये” मागतात तेव्हा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘कोई दिवाना केहता हैं, कोई पागल समझता हैं’ हे शब्द कानावर पडले की कुमार विश्वास हे नाव आपोआपच आठवतं. त्यांची ती भलतीच व्हायरल झालेली कविता आणि एक विशिष्ट चाल, या गोष्टी माहित नसलेला कविता प्रेमी सहज सापडणं अशक्य नाही. राजकारणाकडे पाठ फिरवली असली, तरी आजही ते कवी म्हणून अनेकांचे लाडके आहेत.

एकेकाळी राजकारणातही कुमार विश्वास हे नाव फार चर्चेत होतं. दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटचे सहकारी म्हणून जी यादी मंडळी जायची, त्यात हमखास हे नाव पाहायला मिळायचं. कालांतराने योगेंद्र यादव आणि कुमार विश्वास यांनी अरविंद यांची साथ सोडली. योगेंद्र यादव यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, तर कुमार विश्वास हे राजकारणापासून अलिप्त राहिलेले दिसतात.

 

kumar vishwas inmarathi

 

===

हे ही वाचा – योगेंद्रजींच्या ‘सलीम’ या नावामागचा इतिहास: फसलेल्या सर्वधर्मसमभावाची ‘यादवी’!

===

आज कुमार विश्वास हे नाव पुन्हा एकदा कवी म्हणूनच अधोरेखित केलं जातं. राजकारणात जसे त्यांनी अनेक चढउतार पाहिले, तसेच एक कवी म्हणून त्यांनी केलेल्या प्रवासातही त्यांना काही चढउतारांचा सामना करावा लागला. मात्र स्वतः एक कवी असल्याने, आणि साहित्याची आवड असल्याने इतर कवींचा सुद्धा ते आदर करतात. हाच आदर, एकदा त्यांच्यासाठी डोकेदुखीचं कारण ठरला होता.

असं झालं होतं की…

विश्वास यांनी तर्पण नावाची एक काव्यमालिका सुरु केली होती. दिवंगत कवींच्या उत्कृष्ट रचना ते यासाठी निवडत आणि त्यांना चाली लावून, स्वतःच्या आवाजात ते सादर करत असत. यात त्या कवीची प्रसिद्धी हा मुद्दा अगदीच गौण असे. रसिकांना आवडतील अशा, उत्तम रचना निवडणं एवढा एकच निकष विश्वास यांनी ठरवलं होता. यूट्यूबच्या माध्यमातून या रचना ते लोकांपर्यंत पोचवत.

नागार्जुन, आग्येय, महादेवी, निराला असे अनेक कवी आणि त्यांच्या रचना तर्पणमधून कुमार विश्वास यांनी सादर केल्या आहेत.

त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कवी आणि बिग बी अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या एका दर्जेदार कवितेची निवड कुमार विश्वास यांनी केली. या कवितेला संगीतबद्ध करून, ती सादर केली आणि तर्पण या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून युट्युबवर तिचा एक व्हिडिओ त्यांनी सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला.

 

harivanshray bachhan inmarathi

 

वास्तविक कुमार विश्वास यांनी याकरिता, हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र आणि अमिताभ यांचे बंधू अजिताभ बच्चन यांची रीतसर परवानगी घेतली होती. तसं लेखी पत्र असल्याचं कुमार विश्वास यांनी अनेकदा सांगितलं आहे. असं असूनही, आपले वडील हरिवंशराय यांची कविता कुमार विश्वास यांनी सादर करणं अमिताभ यांना आवडलं नाही.

===

हे ही वाचा – पडद्यामागे राहून घडलेला यशस्वी उद्योजक, वाचा ‘बिग बीं’च्या खऱ्या “बिग”ब्रदरचा प्रवास!

===

अमिताभ यांचा आक्षेप आणि विश्वास यांचं उत्तर

साहजिकपणे ही गोष्ट पटली नाही, म्हणून अमिताभ यांनी त्यावर आक्षेप घेतला. हरिवंशराय यांचा मुलगा म्हणून अमिताभ यांचा तो हक्कही होता. पण केवळ आक्षेप घेऊन ते थांबले नाहीत. त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि कुमार विश्वास यांना थेट एक नोटीस पाठवली. या व्हिडिओच्या माध्यमातून झालेल्या कमाईवर अमिताभ यांनी त्यांचा हक्क दाखवला.

 

amitabh bachchan inmarathi2

 

ही रचना हरिवंशराय यांची असल्यामुळे, आणि केवळ सादरकर्ते विश्वास असल्याने, त्यांना याविषयी काहीही खेद वाटला नाही. अमिताभ यांची मागणी त्यांना अगदीच रास्त वाटली. त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला.

बत्तीस रुपयांचा चेक…

अमिताभ यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली त्यावेळी व्हिडिओ टाकून केवळ ३ दिवस झाले होते. व्हिडिओ डिलीट करून कुमार विश्वास थांबले नाहीत. त्यांनी त्यातून झालेल्या कमाईचा रीतसर हिशोब मांडला. ३ दिवसांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ३२ रुपयांची कमाई केली होती.

अमिताभ यांच्या मागणीनुसार, ही रक्कम त्यांना द्यायचं विश्वास यांनी निश्चित केलं होतं. त्यानुसार त्यांनी ३२ रुपयांचा चेक तयार केला आणि तो बिग बींना पाठवून दिला.

या घटनेबद्दल कुमार विश्वास यांना काय वाटतं?

एक अभिनेता म्हणून कुमार विश्वास यांना अमिताभ यांच्याविषयी आदर वाटतो. तो आदर कमी होणार नाही हे ते नेहमीच स्पष्ट करतात. त्यांच्याविषयी किंवा कविता, साहित्य यातून मिळणारं उत्पन्न याच्याविषयी अमिताभ यांची विचारसरणी वेगळी असावी, अथवा त्यांच्या टीमकडून किंवा इतर कुणाकडून तरी अमिताभ यांना चुकीची माहिती मिळाली असावी असं कुमार विश्वास यांना वाटतं.

अमिताभ यांची मागणी मान्य करून आणि व्हिडिओ डिलीट करून त्यांनी हा गोंधळ आणि वाद तिथेच संपुष्टात आणला, हे मात्र तितकंच खरं… 

 

kumar vishwas inmarathi

===

हे ही वाचा – ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ नितीन गडकरींनी अमिताभला झापलं…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?