' एकीकडे फीअभावी मुलं शाळेबाहेर, तर दुसरीकडे हा शिक्षक फुकटात शिकवतोय गणित

एकीकडे फीअभावी मुलं शाळेबाहेर, तर दुसरीकडे हा शिक्षक फुकटात शिकवतोय गणित

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘आजकालची शाळेतली मुलं शाळा विसरले असतील, शाळेत मुलांनी फोन आणू नये पण आता शाळाच फोनवर चालते’, असे जोक्स सर्रास whats app वर गेल्या वर्षभरापासून फिरत आहेत.

गेल्या वर्षभरापासून कोरोना नावाचे संकट आपल्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर ओढवले गेले आहे. त्यामुळे पूर्ण मानवी चक्रच बदलून गेल आहे. लोकांच्या कामाची पद्धत बदलली, मुलांचे शिक्षण सुद्धा आता ऑनलाईन होऊ लागले.

 

online school inmarathi

 

भारतातील काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आज अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मागच्या ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रभाव जरा कमी झाला होता, तेव्हा काही ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या होत्या, मात्र लगेच त्या बंद झाल्या.

दहावी बारावीच्या परीक्षांचा गोंधळ संपत नाही. त्यातच परीक्षा रद्द केल्या असल्याने मुलांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होणार आहे. दहावी बारावी खरं तर करियरचा सुरवातीचा टप्पा, तोच टप्पा डळमळीत झाल्याने पालक देखील चिंताग्रस्त आहेत.

दिलेल्या शिक्षणाचा मोल हे काही रुपयांमध्ये आकारात येत नाही, असे म्हंटले जाते तरी सुद्धा शाळांच्या अवाढव्य फीया हा मुद्दा गेली अनेक वर्ष पालकांना सतावत आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी त्यांनी फी मध्ये कोणताही आखडता हात घेतला नाही. आधीच अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्याने ते फी भरू शकत नाहीत, अशा पालकांच्या मुलांना शाळेने थेट काढून टाकले आहे.

 

school life InMarathi

 

कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता काम नये असे आपल्याकडील महापुरुषांनी म्हंटले आहे, मात्र शाळाच अशा प्रकारची पाऊले उचलत आहेत. मात्र असं जरी असले तरी संजीव कुमार सारखे शिक्षक हे खऱ्या अर्थाने आजच्या जगातील द्रोणाचार्य आहेत.

कोण आहेत संजीव कुमार?

पंजाब राज्यातील भटिंडा शहरातील एका सरकारी शाळेतील  हे शिक्षक, घरबसल्या चेन्नई, म्हैसूर, मुंबई, पणजी ते थेट केनिया पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवतात.

 

sanjiv kumar 3 .jpg inmarathi

हे ही वाचा – एका शिक्षकाने ‘अवघ्या काही तासात’ लिहिलं गाणं: जे भारताला ‘स्वच्छतेची’ सवय लावतंय

गणित म्हंटल की आजही अनेक जणांच्या पोटात गोळा येतो. त्यातील प्रमेय, सूत्र पाठ करण्यातच मुलांना कंटाळा येतो. बाकी विषय वाचून कळतात मात्र गणितसारखा विषय, हा शिक्षक घरबसल्या हजारो मुलांना शिकवतात.

कसा चालतो क्लास?

गेल्या वर्षांपासून या क्लासला सुरवात झाली. सरांचा क्लास सकाळी ८ वाजता सुरु होतो, पहिले बॅच असते १०वी च्या मुलांची जी चालते ८ ते ९ मध्ये, नंतर ९ ते १० मध्ये ९वी मधील मुले, १० ते १ मध्ये मुलांचे काही डाउट्स असतील तर ते सोडवले जातात. आणि संध्याकाळी ११वी आणि १२वी चे विदयार्थी असतात.

 

whatsapp sharing inmarathi

हे ही वाचा – बघा, शिक्षकाने केलेली नामी युक्ती – टिव्ही पाहून होतंय गरीब मुलांचं शिक्षण!

मुलांना क्लासबद्दलची माहिती त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर येते. ऑनलाईनक्लास सुरु होण्याआधी १० मिनिटे त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जातो. ज्यांना या क्लासमध्ये ऍडमिशन घायची असेल त्याना whats app group  जॉईन करण्यासाठीची लिंक पाठवली जाते. त्यावर पालकांनी आपल्या पाल्याची सध्या सुरु असलेल्या शाळेची वेळ, इयत्ता अशी माहिती भरायची असते.

इतक्या विद्यार्थ्यांवर लक्ष कसे ठेवतात? 

संजीव कुमार यांनी झूमचे एक विशिष्ट पॅकेज घेतले आहे, तसेच ते क्लास मधील प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवून असतात. तसेच क्लास सुरु असताना एखाद्या विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारायचे असल्यास, तशी त्यांनी (raise hand ) ची सोय केली आहे. त्यामुळे मुलांचे प्रश्न त्वरित सोडवले जातात.

 

sanjiv kumar 2 inmarathi

 

नुसतं शिक्षणावर न थांबता संजीव कुमार हे मुलांची परीक्षा सुद्धा घेतात, जो धडा शिकवला असेल त्यावर १ तासाची परीक्षा घेतात, आणि जो टॉपर असेल त्याला एक पुस्तक सुद्धा भेट देतात.

माणूस बाकी सगळी सोंग आणू शकतो पैशाचे सोंग मात्र आणू शकत नाही असे आपल्याकडे म्हंटले जाते, हा शिक्षक स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आज देशविदेशातील मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे.

आज एकीकडे शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलांना शाळेतून काढणाऱ्या या क्रूर शाळा तरी दुसरीकडे कोणतंही मानधन न घेता हा शिक्षक फुकटात अनेक विद्यार्थ्यांना शिकवत आहे.

बिल गेट्सच म्हणून गेला आहे ‘तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे, मुलांना प्रेरित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे’.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?