' कोरोनापूर्व काळापासूनच, हे गाव दरवर्षी चारमहिने असतं ‘लॉकडाऊन’…!!! – InMarathi

कोरोनापूर्व काळापासूनच, हे गाव दरवर्षी चारमहिने असतं ‘लॉकडाऊन’…!!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या आठवड्यात आपल्याच राज्याच्या मंत्र्यांनी, ‘लवकरच सर्व काही अनलॉक होणार’, मात्र लोकल सेवा तूर्तास सुरु होणार नाही, अशी घोषणा केली. मंत्र्यांनी जशी घोषणा केली तसे लोकांना सुद्धा हायसे वाटले. मात्र मुख्यमंत्र्यांनी अनलॉकच्या या घोषणेला लगेचंच दुजोरा दिला नाही. प्रस्तावावर पूर्ण विचार होऊन मग निर्णय जाहीर करण्यात आला.

मंत्री महोदयांनी यावर मात्र नेहमीप्रमाणे सारवासारव केली, एकूणच महाविकास आघाडीच्या विसंवादाचा कारभार पुन्हा एकदा नव्याने बघायला मिळाला. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी लगेचच आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून टप्य्या टप्प्याने अनलॉक होईल अशी घोषणा केली. त्याबतचे माहितीपत्रक देखील जाहीर केले.

 

unlock inmarathi

 

आजपासून अनेक जिल्ह्यातले निर्बंध उठले दुकानांना परवानगी दिली आहे, सरकारी, खाजगी ऑफिसेस काही वेळेपर्यंत चालू करण्यास परवानगी दिली आहे. लोक सुद्धा आता बाहेर फिरायला जाणयासाठी प्लॅनिंग करायला सुरवात केली असेल

लॉक अनलॉकच्या या त्रासातून आपण गेले वर्षभर जात आहोत, मात्र आपल्याकडे असे गाव आहे जिथे दरवर्षी तब्बल ४ महिन्यांचा लॉकडाऊन असतो, आणि तोदेखील पार कोरोनापूर्व काळापासून! या लॉकडाऊनमध्ये लोक अगदी घराबाहेर सुद्धा पडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात अशाच एका गावाबद्दल….

हे ही वाचा – लॉकडाऊन ही संकल्पना जगासाठी नवीन नाही! चला थोडे इतिहासात डोकवूयात…

बिहार राज्य फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. गौतम बुद्धाची कर्म भूमी मानल्या जाणाऱ्या या राज्यात नैसर्गिक आपत्तींचा, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रोजगाराचा, परिणामी वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न निर्मण झाला आहे. आज तिकडची सवर्सामान्य जनता हवालदिल झाली आहे.

हे गाव नेमके कोणते?

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात मधवापूर हे गाव आहे. मधवापूर हे गाव नेपाळ या देशाच्या सीमेजवळ आहे. मधुबनी जिल्ह्यापासून हे गाव ३५ कि.मीवर आहे.

 

maddhwapur inmarathi 1

 

लॉकडाऊन का असते?

मधवापूर हे गाव नेपाळ सीमेच्याजवळ असल्याने नेपाळमधील नद्यांचा समूह आणि मधुबनी जिल्ह्यातील इतर नद्यांचा समूह एकत्रितपणे येऊन या गावात मिळतात. त्यामुळे साहजिकच पावसाळा सुरु झाला की या नद्यांना पूर येतो.

 

madhwapur inmarathi

 

गावातून दुसऱ्या गावात जायला एक लाकडी पूल आहे, नदीला पूर आला की साहजिकच पाण्याच्या प्रवाहाने हा पूल वाहून जातोच. आजतायगायत इथे पक्का पूल बांधला गेलेला नाही. गावकरीच पावसाळा आला की थोडी भर घालून त्या पुलाची डागडुजी करतात.

 

madhwapur bridge inmarathi

 

पावसाळा सोडल्यास इतर वेळेत हा पूल गावकरी वापरतात, मात्र एकदा पावसाळा सुरु झाला की गावातले लोक घराबाहेर देखील पडत नाही. ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या आधीच साठवून ठेवतात. याचकाळात जर एखादा माणूस आजारी पडला, तर गावातील लोक डॉक्टरांचा नव्हे तर फक्त देवाचा धावा करतात.

आज आपल्याला चांगले उपचार मिळावेत म्हणून चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो, चांगले उपचार घेतो मात्र या गावातील लोकांना त्या ४ महिन्यात उपचार तर सोडाच साधी मदत सुद्धा मिळू शकत नाही.

 

madhwapur villegeres inmarathi

हे ही वाचा – मा. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करण्याआधी “हा” साधा विचार करून पहावा

लॉकडाऊन असताना रोज ७ ते ११ याचवेळेत सामान मिळतं, म्हणून आपण तक्रार करायचो, घरात चीडचीड व्हायची. या गावातील लोक आठवड्याचे नव्हे तर तब्बल ४ महिने पुरेल इतके सामान भरून ठेवतात.

आतापर्यंत अनेक सरकार येऊन गेली. प्रत्येकवेळी या गावातील नागरिकांना पूल बांधण्याचे आश्वासने मिळाली. इतकी वर्ष या पुलाखालून बरेच पाणी गेले आहे, मात्र आजही लोकांच्या डोळ्यात फक्त दुःखाचेच पाणी वाहत असते.

आज खऱ्या अर्थाने म्हणू शकतो या गावातील नागरिकांनी आपल्यापेक्षा लॉकडाऊनचे पावसाळे जास्त बघितले आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?