' पडद्यावर रोमान्स, घरात मारहाण - ५ आणि ८ व्या जोडीबद्दलचं धक्कादायक वास्तव तुम्हाला ठाऊक नसेल

पडद्यावर रोमान्स, घरात मारहाण – ५ आणि ८ व्या जोडीबद्दलचं धक्कादायक वास्तव तुम्हाला ठाऊक नसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सेलिब्रिटींचे आयुष्य आणि त्यातील गॉसिप्स यात रस नसणारा माणूस शोधूनही सापडत नाही. आपल्या आवडत्या कलाकारांविषयीची उत्सुकता आणि नावडत्या कलाकारांवर केली जाणारी टिका यांमुळे प्रत्येक सेलिब्रिटींच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय? यासाठी त्यांच्या जीवनात जमेल त्या मार्गाने डोकावण्याचा प्रयत्न केला जातो.

सोशल मिडीया, इंटरेनट या माध्यमांनी सामान्य माणसांची ही इच्छा पुर्ण करण्याचा चंगच बाधल्याने एका क्लिकवर सेलिब्रिटींचे आयुष्य वाचता येतं.

झगमगत्या दुनियेत वावरणा-या सेलिब्रिटींचं आयुष्य हवहवंसं वाटत असलं तरी अशा त्याच कलाकारांच्या आयुष्यातील काळी बाजू मात्र आपल्याला ठाऊक नसते. पडद्यावर आपली ‘इमेज’ सांभाळण्यासाठी धडपडणारे कलाकार प्रत्यक्षात मात्र व्यसनं, कौटुंबिक वाद अशा अनेक चक्रव्यूहात अडकलेले असतात.

याचंच एक उदाहरण म्हणजे अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा यांचा वाद. अर्थात सेलिब्रिटींसाठी घटस्फोट ही सामान्य बाब असली तरी करण मेहराला अटक झाल्याची बातमी ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

karan mehra inmarathi

 

करणने आपल्याला मारझोड केल्याच्या आरोपानंतर करणला अटक झाली, मात्र त्यानंतर माध्यमांसमोर आलेल्या निशाने कपाळावरील जखम दाखवून या वादाचा आणखी एक पुरावा दिला. करणचे विवाहबाह्य संबंध, त्यानंतर सुरु झालेले आरोप आणि त्याचाच परिणाम म्हणून करणने केलेली मारझोड असा घटनाक्रम निशाने सांगितला, तर दुसरीकडे हे आरोप फेटाळणारा करण आपली वेगळीच कथा पोलिसांना ऐकवत आहे.

कौटुंबिक अत्याचार हा कायद्याने गुन्हा असला तरी अनेक घरांमध्ये आजही वादाचा अंत हा मारझोडीने होतो ही बाबा नाकारता येत नाही.  सिनेमा, सिरिअल्समधून प्रेमाचा, शांततेचा, आदर्श संसाराचा पाठ शिकवणा-या कलाकारांचे खरे रुप हे त्यांच्या घरातील अत्याचारांमुळे उघड होतेच.

मात्र शारिरीक हल्ले करत ते सहनही करणा-या कलाकारांची यादी मोठी आहे. जाणून घेऊयात बॉलिवूड तसेच टिव्हीच्या पडद्यावरील काही जोड्या ज्यांच्यातील प्रेमाला ओहोटी लागली आणि त्यांची प्रकरणं थेट पोलिस स्थानकात पोहोचली.

१. सलमान खान – ऐश्वर्या रॉय

बॉलिवूडच्या दबंगचा दरारा काही औरच! काळवीट प्रकरण असो वा इंडस्ट्रीतील दादागिरी, सल्लुभाईचा नाद करायचा नाही. मात्र विश्वसुंदरी ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा झालेल्या सल्लुचा एक नवा अंदाज त्या काळात प्रेक्षकांना पाहता आला. सलमान ऐश्वर्याची लव्हस्टोरी गाजली असली तरी त्याचा शेवट मात्र हिंदी सिनेमासारखा झाला नाही.

 

salman aishwarya inmarathi

 

व्यसनांच्या आहारी गेलेल्या सलमानकडून वारंवार दिला जाणारा त्रास, यांमुळे नात्यात निर्माण झालेला दुरावा यांना वैतागून ऐश्वर्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र ही बाब सलमानला पटली नाही. त्यानंतरही त्याने वागणूकीत कोणताही बदल करता ऐश्वर्याचा पिच्छा सोडला नाही. नात्यात असतानाही ऐश्वर्यावर सातत्याने घेतला जाणारा संशय, इतर हिरोंबद्दल काम न करण्याची ताकीद या आणि अशा अनेक बंधनांमुळे ऐश्वर्या त्रस्त होती.

तिच्या घराखाली जाऊन केलेला तमाशा ते तिच्या पालाकंना केलेली शिवगाळ अशा अनेक तक्रारींमुळे ऐश्वर्याच्या पालकांनी त्याच्याविरुद्ध २००० साली पोलिसांतही तक्रार दाखल केली होती.

 

salman aishwarya inmarathi

 

ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानकडून वारंवार होणारा अपमान, हक्क दाखवण्यासाठी दिला जाणारा शारिरीक त्रास यांची कबूली दिली होती. त्यानंतर अभिषेकशी लग्न करत ऐश्वर्याने सुखी संसाराचा मार्ग निवडला असला तरी सल्लू मात्र अजूनही मिस परफेक्टच्या शोधात आहे.

२. राहूल महाजन – डिम्पी गांगुली

अरेन्ज नाही, लव्ह मॅरेजही नाही तर थेट स्वयंवरातून आपली वधू निवडणाऱ्या राहूल महाजनची कथा काही वेगळी नाही. सोनी टिव्हीवर गाजलेल्या राहूल का स्वयंवरसाठी चॅनलने लाखो रुपये खर्च केले, देशातील अनेक मुलींना रांगा लावल्या. अनेक फेऱ्यांअन्ती राहूलला आपली मनपसंत वधू मिळाल्याने अखेर गंगेत घोडं न्हालं, मात्र ही कथा सुफळ संपूर्ण झाली नाही.

 

rahul mahajan inmarathi

 

तर राहूलची बंगाली पत्नी डिम्पी हिने लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात डिम्पीने राहूलला कोर्टात खेचलं. रोजच्या वादात आपल्याला सातत्याने मारहाण होत असल्याचा तिने आरोप केला होता. त्या दरम्यान अनेक माध्यमांसमोर येऊन तिने सुजलेला चेहरा, हातांवरील जखमा यांचाही दाखला दिला होता. राहूलने हे आरोप फेटाळले असले तरी प्रत्यक्षात या जोडीचा संसार अल्पायुशी ठरला.

३. राजा – श्वेता तिवारी

हिंदी मालिकेतील लोकप्रिय आणि सहनशील सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्वेताला तिच्या खऱ्याखुऱ्या संसारात मात्र यश मिळाले नाही. राजा आणि श्वेता यांच्या सुखी संसाराचे चित्र प्रेक्षकांनी नच बलिये यासारख्या रिअॅलिटी शो मधून पाहिले होते.

 

shweta tiwari

 

त्यांच्या लहानग्या लेकीसह या दाम्पत्याची प्रेमकथा व्हायरल होत होती. मात्र अखेरिस काही वर्षांनी श्वेताने राजापासून वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला.

हा घटस्फोटही दोघांच्या मर्जीने नसून श्वेता हिने राजावर मारहाणाची आरोप केला होता. श्वेता आणि राजा हे दोघेही प्रसिद्ध सेलिब्रिटी असल्याने त्यांचा हा वाद चांगलाच गाजला होता.

घटस्फोटानंतर मुलीह राहणा-या श्वेताने वारंवार राजाबद्दलच्या तक्रारी मांडल्या होत्या. त्यानंतर उद्योगपती अभिनव कोहोली यांच्याशी संसार थाटला, मात्र दुस-या मुलाच्या जन्मानंतर या नात्यातही तेढ निर्माण झाल्याने श्वेताने पुन्हा एकदा पोलिस स्थानकात धाव घेतली. या पतीकडूनही शारिरीक मारहाण, वारंवार होणारी बदनामी, आपल्यासह लेकीलाही दिली जाणारी सावत्र वागणूक असा तक्रारींचा पाढा वाचला होता.

 

shweta tiwari inmarathi

 

सध्या दोन मुलांसह श्वेता मुंबईत रहात आहे.

हे ही वाचा – प्रेमळ स्वप्नं दाखवणाऱ्या पडद्यावरील या १० रोमँटिक जोड्यांची खऱ्या जीवनातील कहाणी अधुरीच राहिली

४ कंगना राणौत – आदित्य पांचोली

बॉलिवुडच नव्हे तर राजाकारणही दणाणून सोडणारी अभिनेत्री कंगना राणौत आणि सुरज पांचोली यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे कंगना यांनी जाहीर केले.

मात्र याचा खुलासा करताना तिने आदित्यच्या वागणूकीवर बोटं ठेवत अनेक आरोप केले होते. नात्यात आदित्यने आपला छळ केल्याचेही तिने सांगितले. आदित्यकडून शारिरीक अत्याचार होत असल्याचेही तिने सांगतले होते.

 

kangana aditya inmarathi

 

मात्र या घटनेनंतर कंगनाने नातं तोडल्याचेही स्पष्ट केले होते.

६. करिष्मा कपूर – संजय कपूर

कपुर घराण्याच्या या लेकीलाही कौटुंबिक अत्याचाराचा फटका बसला. अभिनेत्री करिश्मा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचा विवाह निश्चित झाला होता. मात्र साखरपुड्यानंतर झालेल्या वादातून हे लग्न होण्यापुर्वीच मोडले. त्यानंतर दोघांनीही आपआपले संसार थाटले.

उद्योजक संजय कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर सुखी संसार सुरु असल्याचे करिश्माने वारंवार सांगितले होते. दोन मुलांच्या जन्मानंतर मात्र यांच्यातील वाद पेटले.

 

karishma kapoor inmarathi

 

आपल्या पतीकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून अखेरिस करिश्माने वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला.

 ७. युक्ता मुखी- प्रिन्स तुली

भारताची विश्वसुंदरी हा किताब पटकवणारी अभिनेत्री मॉडेल युक्ता मुखी काही काळ चर्चेत होती. त्यानंतर तिने प्रिन्स तुलीशी विवाहगाठ बांधली. मात्र २०१२ साली तिने मुंबई पोलिसांकडे पतीविरुद्ध लिखीत तक्रार दाखल केली.

वारंवार होणारे वाद आणि व्यसनांच्या आहारी गेलेल्या पतीकडून होणारा शारिरीक छळ यांसाठी तिने ही तक्रार केली होती. त्यानंतर दोघांचा घटस्फोटही झाला.

 

yukta mukhi inmarathi

 

सध्या युक्ता मुखी चंदेरी दुनियेपासून लांब आहे,

हे ही वाचा – या लोकप्रिय १८ सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो तुम्हाला नक्की आवडतील!

८. झीनत – संजय खान

बॉलिवुडची ज्येष्ठ अभिनेत्री झिनत यांचीही कथा काही वेगळी नाही. संजय खान यांच्याशी नातं असताना हॉटेल ताजमध्ये संजयनेच त्यांच्यावर हल्ला केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होता. अत्यंत रागीट असलेल्या संजयने त्याच्या बायकोसमोर झीनत यांच्याशी धक्काबुक्की केली, याच हल्ल्यात झिनत यांच्या कपाळाला मोठी जखम झाली.

 

zeenat aman inmarathi

 

या घटनेचा झीनत यांना प्रचंड धक्का बसला असून पुढील काही वर्ष त्या मनोरुग्णतज्ञाकडे उपचार घेत होत्या. या धक्क्यातून सावरल्याानंतर त्यांनी मझहर खान यांच्याशी विवाह केला, मात्र दुर्दैवाने या नात्यातही त्या सुखी होऊ शकल्या नाही.

मझहर यांनीही त्यांना मारहाण केल्याचे झीनत यांनीच एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले होते. झीनतकडून झालेल्या या खुलाशानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होती. या घटनेनंतर झीनत यांनी घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र त्यांच्या पतीचा अचानक मृत्यु झाल्याने त्यांना अखेरपर्यंत घटस्फोट मिळू शकला नाही,

 

zeenat inmarathi

 

एकीकडे सामान्यांमध्ये होणारे कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी दुसरीकडे सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणविले जाणा-या सेलिब्रिटींच्या घरात या अशा स्वरुपाच्या घटना धक्कादायक आहेत.

चित्रपट, मालिका यांतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या, अनेक तरुणांचे आदर्श असणा-या, प्रेक्षकांना प्रेम करायला शिकवणाऱ्या या फिल्मी जोड्यांनी आपल्या खऱ्याखुऱ्या संसाराकडेही गांभिर्याने आणि तितक्याच प्रेमाने पाहणे गरजेचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?