' हनुमानाच्या या मंदिरात शनी देव चक्क स्त्री वेशात आहेत ...वाचा

हनुमानाच्या या मंदिरात शनी देव चक्क स्त्री वेशात आहेत …वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हल्ली लोक एकवेळ भुताखेतांना घाबरणार नाहीत, पण शनीच्या साडेसातील खूप घाबरतात. आयुष्यात एकदा साडेसाती चालू झाली की आपले नुकसान व्हायला सुरवात होते, असा समज सर्वांमध्ये असतो. मात्र शनीच्या साडेसातीचे सुद्धा प्रकार असतात आणि पत्रिकेमध्ये शनी कोणत्या स्थानावर आहे यावरून साडेसातीचा काळ ठरला जातो.

पत्रिकेतील ग्रह ताऱ्यांचे स्थान तर आपण बदलू शकत नाही, नशिबात असलेल्या साडेसातीचा सामना करावा लागतोच. मात्र जसे देव संकटात टाकतो तसेच त्यातून बाहेर येण्याचे मार्गही दाखवत असतोच. साडेसाती सुरु झाल्यावर अनेकजण ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना सुरु करतात.

अनेक ज्योतिषी शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी हनुमानाची भक्ती करायला सांगतात. जेणेकरून शनी महाराजांची कृपा त्यांच्यावर राहील, कारण पुराणांत असे सांगितले आहे की शनी देवाने हनुमानाला वचन दिले होते की जो मनुष्य माझी ध्यानधारणा करेल मी त्यांचे सदैव रक्षण करेन.

 

sadesati inmarathi

 

हनुमान भक्त आणि ज्यांना साडेसातीचा त्रास आहेत, असे लोक हमखास शनिवारी देवळात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतात, सोबतीला शनीची देखील आराधना करतात. सध्या लॉकडाऊनमुळे भक्तांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे.

हनुमान आणि शनी देव या जोडगळीची शेकडो मंदिरं आज आपल्याकडे आहेत. हनुमानाची विविध रूपं असलेली मंदिरं आज आपल्या देशात आहे. पण आपल्याकडे असं एक मंदिर आहे जिथे शनी देव चक्क स्त्री वेशात आहेत.

गुजरातमधील भावनगर भागातील सारंगपूर नामक गावात हे मंदिर आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून अशी माहिती मिळते, की देवळातील हनुमानाची प्रतिमा ही गोपालनंद स्वामी यांनी प्रस्थपित केली आहे.

 

kashtbhajan 1 inmarathi

हे ही वाचा – संजीवनी आणताना इथे थांबले होते हनुमान… आजही दिसतात त्यांच्या पाऊलखुणा…!!

शनीची मूर्ती ही हनुमानाच्या पायाशी आहे. विशेष म्हणजे शनिदेव स्त्रीरूपात का आहे? यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी आहे, की एकदा पृथ्वीवर शनी देवाचा प्रकोप खूपच वाढला होता. लोक सुद्धा शनिदेवाच्या त्रासाने बेजार झाले होते, शेवटी लोकांनी संकटमोचन  बजरंगबलीकडे साकडे घातले की आम्हाला या संकटापासून मुक्त कर.

भक्तांवर आलेले संकट हनुमान कसा दूर करणार नाही?  ज्याच्या नुसत्या धाकात संपूर्ण ब्रह्मांड आहे, संपूर्ण धरतीमाता थरथरते, असा हा हनुमान, शनी देवाचा बंदोबस्त करायला निघाला. ही बातमी जेव्हा शनी देवांना कळली तेव्हा ते चांगलेच घाबरले.

 

hanuman dronagiri inmarathi

 

हनुमानापासून वाचायचे असेल तर आपल्याला काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक शक्कल लढवली. शनी देवाने चक्क स्त्री वेष धारण केला, जेणेकरून हनुमान आपल्याला काही करू शकणार नाही.

त्यावेळी सगळ्यांनाच माहिती होते की ब्रह्मचारी हनुमान कधीच कोणत्या स्त्रीवर हात उचलत नाहीत. स्त्रीवेषातील शनी देव थेट हनुमानाला शरण गेले, हनुमानाला देखील कळून चुकले की ही स्त्री शनीदेवच आहे. हनुमानाने देखील मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाकले.

 

kashtbhajan 3 inmarathi

 

साहजिकच शनी देवाने सुद्धा लोकांवर होणारे अत्याचार थांबवले, आणि हनुमानाचे भक्त सुद्धा संकट मुक्त झाले.

एखाद्या राजदरबाराप्रमाणे मंदिराचा परिसर आहे, हनुमानाची मूर्ती सुद्धा सिंहासनावर विराजमान आहे. संकटमोचन करणाऱ्या या हनुमानाकडे दूरदूरवरून लोक दर्शनासाठी येतात आणि संकट मुक्त होऊन जातात. दर मंगळवारी आणि शनिवारी लाखोंनी भक्तांचा जनसागर इथे जमतो. म्हणूनच या हनुमानाला कष्टभंजन हनुमान म्हणून ओळखले जाते.

 

kashtbhajan inmarathi

हे ही वाचा – बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?

सध्या संपूर्ण जगावर ओढवलेल्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन हे संकट लवकरात लवकर टळू दे या साठी बजरंगबलीकडे प्रार्थना करूयात. 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?