' "मास्टर ब्लास्टरच्या" १० अफलातून गोष्टी ज्या तुम्हाला माहित नसतील...

“मास्टर ब्लास्टरच्या” १० अफलातून गोष्टी ज्या तुम्हाला माहित नसतील…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सचिन तेंडूलकर…!

क्रिकेटचा देव म्हणून अख्ख क्रिकेटविश्व ज्याची पूजा करतं, त्याच्याबद्दल तुम्हाला वेगळ्याने काय ते सांगणार! क्रिकेटची बॅट पहिल्यांदा हातात घेतल्यापासून सचिन तेंडूलकर नावाचं जे गारुड आपल्या मनाला भुरळ घालतं, ते कायमचंच!

त्यामुळे त्याच्याबद्दल सर्वच गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही देखील केला असेल.

पण आज आम्ही तुम्हाला आपल्या लाडक्या सचिनबद्दल अश्या काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला आज पर्यंत कधीच कोणी सांगितल्या नसतील.

 

Sachin-Tendulkar-inmarathi

 

तत्पूर्वी थोडंसं तुम्हाला माहित असलेलं.

सचिन रमेश तेंडूलकरचा जन्म हा २४ एप्रिल १९७३ चा!

आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आणि कसोटी सामन्यांमधील डॉन ब्रॅडमन नंतरचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिनचे नाव घेतले जाते.

सचिनच्या चाहत्यांनी त्याला तेंडल्या आणि मास्टर ब्लास्टर ही दोन टोपण नावे बहाल केली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता जाणून घेऊ या, सचिनबद्दल कमी माहिती असलेल्या गोष्टी –


१) सचिनच्या वडिलांनी प्रसिद्ध संगीतकार एस.डी. बर्मन यांच्या नावावरून आपल्या लाडक्या मुलाचं ‘सचिन’ हे नामकरण केलं होतं.

 

Sachin-Tendulkar-inmarathi

२) वयाच्या १४ व्या वर्षी सचिनने रणजी सामान्यांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि रणजी सामन्यामध्ये खेळणारा तो आजवरचा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

 

Sachin-Tendulkar-inmarathi

३) तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सचिनला फास्ट बॉलर म्हणून नावलौकिक मिळवायचा होता, पण त्याचे हे स्वप्न भंगले.

१९८७ साली चेन्नईच्या MRF Pace Academy मध्ये भंग पावले, जेथे प्रसिद्ध ओस्ट्रेलियन बॉलर डेनिस लिली याने सचिनला वेगवान गोलंदाज म्हणून रिजेक्ट केले होते.

 

Sachin-Tendulkar-inmarathi

 

४) सचिन हा उजव्या हाताने बॅटिंग आणि बॉलिंग करत असला तरी तो लिखाण मात्र डाव्या हाताने करतो.

डावखु-यांबद्दल नेहमीच सर्वांना आकर्षण असते, त्यामुळे उजव्या हाताने खेळ आणि डाव्या हाताने लिखाण ही बाब नेहमीच कौतुकाचा विषय ठरते.

 

Sachin-Tendulkar-inmarathi

५) सचिनच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम आहे तो म्हणजे – तो असा एकमेव खेळाडू आहे ज्याला टीम हरलेली असताना देखील सहा वेळा Man-of-the-Match पुरस्कार मिळालेला आहे.

Sachin-Tendulkar inmarathi

 

६) वयाची २० वर्षे पूर्ण होईपर्यंत सचिनने कसोटी कारकिर्दीमध्ये ५ शतके ठोकली होती, हा देखील क्रिकेट विश्वातील जागतिक विक्रम आहे.

 

Sachin-Tendulkar-inmarathi

७) सचिन तेंडूलकर हा एकमेव फलंदाज आहे ज्याने वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये २००० रन्सचा टप्पा पार केला आहे.

 

Sachin-Tendulkar-marathipizza08

 

त्याने वर्ल्डकप क्रिकेटच्या ४५ सामान्यांमध्ये २,२७८ रन्स कुटल्या आहेत. तसेच दोन वर्ल्डकप टूर्नामेंट्समध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून देखील त्याच्या नावावर विक्रम आहे.

२००३ च्या वर्ल्डकप मध्ये त्याने सर्वाधिक ६७३ रन्स आणि १९९६ च्या वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक ५२३ रन्स केले होते.

 

Sachin-Tendulkar inmarathi

८) सचिन काहीसा श्रद्धाळू (की अंध श्रद्धाळू??!) आहे.

हे सिद्ध करणारा एक प्रसंग म्हणजे- फिरोजशहा कोटलावर पाकिस्तान विरुद्ध जो सामना सुरु होता ज्यामध्ये अनिल कुंबळेने १० विकेट्स पटकावत विक्रम घडवला होता, तेव्हा सचिनने प्रत्येक वेळी कुंबळेची ओव्हर सुरु होण्यापूर्वी कुंबळेचे स्वेटर आणि कॅप काढून अम्पायरकडे सोपवले होते.

आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी अनिल कुंबळेने विकेट्स घेतले. ते देखील सर्वच्या सर्व १०!

९) सचिनची पहिली शॅम्पेन

 

Sachin-Tendulkar-inmarathi

 

जेव्हा १९९० साली सचिनला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या सेंच्युरीसाठी Man-of-the-Match पुरस्कार मिळाला, तेव्हा त्याला सेलिब्रेशनसाठी शॅम्पेनची बॉटल देण्यात आली होती.

परंतु तेव्हा त्याचे वय १८ पेक्षा कमी असल्याने कायद्याप्रमाणे तो मद्याचा वापर करू शकत नव्हता.

नंतर मात्र १९९८ साली आपल्या मुलीच्या पहिल्या बर्थडे वेळी त्याने शॅम्पेनची बॉटल उघडून पहिल्यांदा सेलिब्रेशन केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?