' टीव्हीवरील ‘ताजं मांस!’च्या जाहिरातीमागील स्टार्टअपचा प्रवास हा ‘असा’ झालाय! – InMarathi

टीव्हीवरील ‘ताजं मांस!’च्या जाहिरातीमागील स्टार्टअपचा प्रवास हा ‘असा’ झालाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा शाकाहारी लोकांचा देश आहे ही समजूत आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात आहे, पण ती चुकीची आहे. काही तज्ञांच्या मते भारतातील ७२% जनता ही मांसाहारी आहे.

आता या मांसाहार करणाऱ्यांमध्ये फक्त अंडी खाणारी लोकं सोडली तर भारतात एक मोठा असा वर्ग आहे जो इतर सगळं मास आवडीने खातो. चिकन, मटण, बिफ, मासे आणि असे कित्येक वेगवेगळे पदार्थ खाणारा एक मोठा वर्ग आहे.

 

non veg inmarathi

 

आजही भारतातल्या बऱ्याचशा लोकांचं Meat Industry बाबतचं मत तितकंसं चांगलं नाहीये. कारण आपल्याकडे मीट व्यवसायात असलेली अस्वच्छता, उदासीनता आणि क्रूरपणा बघून आपल्यापैकीच कोणालाही या व्यवसायात उतरायची इच्छा होणार नाही.

हे ही वाचा मुक्या प्राण्यांची हत्या न करता नॉन व्हेज एन्जॉय करायचंय, वाचा या नव्या प्रयोगाबद्दल!

पण ही गोष्ट २ भारतीय तरुणांनी खोटी ठरवली आहे. भारतातसुद्धा पद्धतशीरपणे मीट व्यवसाय केला तर त्याची फळं चाखायला मिळतातच, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे लीशीयस (Licious)!

 

licious 2 inmarathi

 

साधारणपणे गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे साऱ्या देशात लॉकडाउन आहे, याच दरम्यान या लीशीयसची ख्याती जगभर पसरायला मदत झाली, तुम्हाला आठवत असेल तर युट्यूब व्हिडिओ बघताना दर २ जाहिरातींमागे तिसरी जाहिरात ही लीशीयसच्या मीट बॉल्स आणि कबाबचीच असायची!

आता जवळपास सगळीकडेच लीशीयसची जाहिरात तुम्हाला बघायला मिळत आहे. टेलिव्हिजन असो किंवा मोबाइल, जिथे पहावं तिथे यांची जाहिरात आहेच, स्वीगीसोबत tie-up करून त्यांनी हळू हळू सगळीकडेच हात पाय पसरवायला सुरुवात केली आहे.

आधी फक्त बेंगलोर, दिल्ली, मुंबई अशा मेट्रोसिटीजमध्येच ही लोकं सर्व्हिस द्यायचे पण आता छोट्यातल्या छोट्या शहरातसुद्धा यांची सर्व्हिस मिळायला लागली आहे.

 

licious inmarathi

 

काय आहे हे लीशीयस? नेमका हा प्रवास कसा सुरू झाला त्याविषयी आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊया!

लीशीयस म्हणजे नेमकं आहे तरी काय?

लीशीयस ही उत्कृष्ट प्रतीचं, फ्रेश आणि स्वच्छ मीट देणारी एक इ-कॉमर्स कंपनी आहे. चिकन, मटण, मासे, अंडी अशा वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीत ही सध्या अग्रेसर कंपनी आहे.

भारतातील ही एकमेव अशी कंपनी आहे जी Farming To Fork या मॉडेलवर काम करते. याचा अर्थ असा की पशूपालनापासून त्यांच्या संवर्धनापासून त्यांचे मीट लोकांच्या दारात पोचवण्यापर्यंत सगळे काम लीशीयस करते.

 

licious chicken inmarathi

 

प्राण्यांची स्वच्छता, त्यांचे खाद्य, त्यांच्या आरोग्याची निगा राखण्यापासून सगळी सप्लाय चेन आणि कोल्ड चेन लीशीयसच्याच हातात असते. बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, नोयडा, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांच्या शाखा आहेत.

२०१९ साली त्यांनी त्यांच्या मीट सर्व्हिसची ऑनलाइन विक्री सुरू केली आणि आज बहुतेक बऱ्याचशा शहरात त्यांनी त्यांचा चांगलाच जम बसवला आहे.

लीशीयसची सुरुवात कुणी केली?

लीशीयस या कंपनीचे फाऊंडर अभय हंजुरा म्हणतात की “नॉन-व्हेज किंवा इतर मांसाहार करणाऱ्या लोकांचं त्या मीटशी एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं, फुडी लोकं तशी चव आणि तसं मीट खाण्यासाठी दूरवर प्रवास करतात ते केवळ त्या फ्रेश मांसाहारासाठी!”

 

abhay hanjura inmarathi

 

लोकांची हीच नस त्यांनी पकडली आणि विवेक गुप्ता यांच्यासोबत मीट इंडस्ट्रीमध्ये यायचं त्यांनी निश्चित केलं. इन्फोसिससारख्या कॉर्पोरेट क्षेत्रात रग्गड पगाराची नोकरी सोडून अभय यांनी या क्षेत्रात उडी घ्यायचं ठरवलं, विवेक गुप्ता यांनीसुद्धा त्यांचा कॉर्पोरेट जॉब सोडून अभय यांना यात साथ द्यायची निश्चित केलं!

हे ही वाचा छोट्या हॉटेलमध्ये बनवण्यात आलेल्या या चविष्ट पदार्थाच्या जन्माची कथा, वाचा!

त्यांचं ध्येय एकच होतं की नॉन-व्हेज खाणाऱ्या लोकांना एका उत्तम क्वालिटीच्या मीटची सवय लावणे आणि यात ते चांगलेच यशस्वी झाले, आता ते हर तऱ्हेच्या Raw Meat ची ऑनलाइन विक्री करतात.

फक्त मीटच नाही, तर रेडी टू इट मीट बॉल्स, कबाब, फिश, चिकन तसेच चिकन स्प्रेड अशा त्यांच्या विविध पदार्थांनासुद्धा खूप डिमांड आहे!

सुरुवातीला या दोघांच्या घरच्यांनी या व्यवसायात उतरायला विरोध केला होता, कारण एकंदरच मीट व्यवसाय करणाऱ्याला आपल्या समाजात आजही सन्मानाने वागवलं जात नाही, कसायाकडेसुद्धा खूप वाईट नजरेने बघितलं जातं!

 

abhay and vivek inmarathi

 

पण याच टिपिकल विचारांवर मात करत अभय आणि विवेक यांनी आज जो ब्रॅंड उभा केलाय तो भारतातला असा एकमेव मीट ब्रॅंड आहे जी येणारी कित्येक वर्षं लोकांना यशस्वी होण्याचे धडे देत राहिल!

३५ ऑर्डर्स ते १७००० ऑर्डर्सचा पल्ला कसा गाठला?

त्यांनी जेव्हा हा उद्योग सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे पुरेसं पाठबळ नसल्याने मीटची डिलिव्हरी करायला बऱ्याच अडचणी येत असत, दिवसाला मिळणाऱ्या जेमतेम ३५ ऑर्डर्ससुद्धा त्यांना पोचवायला उशीरच होत असे.

पण नंतर त्यांनी या क्षेत्रातल्या तज्ञांचा सल्ला घेतला आणि ऑनलाइन मीट डिलीवर करायला सुरुवात केली. आज स्वीगीवरूनसुद्धा लीशीयस मधून ऑर्डर करता येत असलं तरी त्यांच्या ऑनलाइन साईट आणि अॅप्लिकेशनवरुनसुद्धा तेवढीच डिमांड कायम असते!

२००० कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन लीशीयस सगळ्यांच्या ऑर्डर पोचवायचं काम करतं, ३५ ऑर्डर्सपासून सुरुवात करत आज ते दिवसाला १७००० ऑर्डर्स बिनदिक्कतपणे डिलीवर करण्यात यशस्वी झालेले आहेत.

 

licious inmarathi 2

 

पहिल्या वर्षात कंपनीने १.५ करोडचा नफा कमावला होता, अवघ्या काही वर्षात १८० करोडचा प्रॉफिट कमावल्याची नोंद त्यांनी केलेली आहे. 

फक्त २ तासात फ्रेश आणि उत्तम दर्जाचं मीट तुमच्या दाराशी आणून देणाऱ्या या स्टार्टअपचा आपण सगळ्यांनीच नीट अभ्यास करायला हवा. कोणतंही काम वाईट नसतं, ते काम तुम्ही कीती सचोटीने करताय हे जास्त महत्वाचं असतं!

टॅबू मानल्या जाणाऱ्या या व्यवसायाला एका जागतिक ब्रॅंडचं रूप देणाऱ्या याच्या संस्थापकांकडून प्रत्येकाने काहीतरी शिकण्यासारखं आहे!

केएफसी किंवा मॅकडी इतकाच लीशीयस हा ब्रॅंडदेखील फेमस व्हावा आणि देशाबाहेरही याच्या कित्येक शाखा सुरू व्हाव्यात अशी आशा करूया, त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

===

हे ही वाचा ‘हलाल’ म्हणजे काय…? मुस्लिम बांधव हलाल मांस खाण्यामागची कारणं जाणून घ्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?