' इन्कम टॅक्स, जीएसटी तसाच युट्युब टॅक्स…! हो आता युट्युबर भरणार एक नवा कर! – InMarathi

इन्कम टॅक्स, जीएसटी तसाच युट्युब टॅक्स…! हो आता युट्युबर भरणार एक नवा कर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज इंटरनेटवर काहीही करायचं असलं, तर गुगल शिवाय पान हलत नाही, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. याच गुगलने केलेलं आणखी एक उत्तम काम म्हणजे युट्युबची निर्मिती! २००५ साली या व्हिडिओ प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली, तर २००८ साली त्याने भारतीय इंटरनेटवर एंट्री घेतली.

आज तर युट्युब म्हणजे अगदी साध्या मनोरंजनापासून ते थेट हवं ते ज्ञान मिळवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी महत्त्वाचं साधन बनलं आहे. लॉकडाऊनच्या काळात युट्युबवर पदार्थाची रेसिपी पाहून, ते शिकून, घरी करून बघण्यापर्यंत सगळंच अनुभवणाऱ्या मंडळींनी याचा चांगलाच अनुभव मागच्या दीड वर्षाच्या कालावधीत घेतला असेल.

 

indian cooking InMarathi

 

युट्युबवर आज अनेकविध चॅनल्स पाहायला मिळतात. भारतातील अनेक युट्युबर्स जगभरात नावाजले गेलेत हेदेखील तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही.

भारतातील अनेकजण चरितार्थासाठी पूर्णपणे युट्युबकडे वळले आहेत. आशिष चंचलानी सारखा स्टार युट्युबर वडिलांचा चित्रपट गृहासारखा उत्तम चालणारा व्यवसाय सोडून युट्युबकडे वळला. ‘बी यु निक’ नावाने आज तुफान प्रसिद्ध असेलला निकुंज सुद्धा अॅग्रीकल्चरचं शिक्षण घेऊन, मग युट्युब व्हिडिओच्या व्यवसायाकडे वळला… अशी जगभरातील, एक ना अनेक नावं घेता येतील.

सुरुवातीला युट्युबनेच अशी चॅनल्स बनवण्यासाठी अनेकांना प्रोत्साहित केलं. त्याकाळापासून, आज युट्युब हे अनेकांसाठी व्यवसायाचं मुख्य साधन बनण्यापर्यंतचा युट्युबचा प्रवास फारच अभिनव आहे.

या प्रवासात युट्युबमध्ये अनेक बदल होत गेले. कधी त्याचं रंगरूप बदललं, कधी कामाचं स्वरूप तर कधी त्यांच्या अटीशर्तींमध्ये बदल होत गेला. असाच एक नवा नियम आता युट्युबने अस्तित्त्वात आणला आहे. युट्युबर्सना यूट्यूबच्या माध्यमातून केलेल्या कमाईसाठी आता चक्क कर भरावा लागणार आहे.

 

youtube app inamrathi

===

हे ही वाचा – युट्युब वापरताय? मग हे फिचर्स तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत

===

होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. युट्युबवर चॅनल बनवून त्यातून अर्थार्जन करणाऱ्या मंडळींना आता युट्युबचा टॅक्स भरावा लागणार आहे. अर्थात, हा टॅक्स त्यांच्या युट्युबवरील कमाईतूनच घेण्यात येणार असून, ही नियमावली १ जून २०२१ पासून लागू करण्यात आली आहे.

या टॅक्सची अधिकतम मर्यादा ३० टक्के इतकी असून, तुम्ही कुठल्या प्रकारचं चॅनल सुरु केलं आहे, तुम्ही कुठल्या देशातील आहात आणि कुठल्या देशात तुमचा व्ह्यूवर बेस, अर्थात प्रेक्षकवर्ग जास्त आहे, यावर या टॅक्सची रक्कम ठरणार आहे.

अर्थात या नव्या टॅक्सचा भुर्दंड अनेकांना बसणार हे नक्की…!!

या नव्या पॉलिसीचा सर्वाधिक फटका भारतीय आणि अन्य देशातील युट्युबर्सना बसणार आहे. अमेरिकेतील युट्युब कन्टेन्ट क्रिएटर्सना मात्र या नव्या पॉलिसीमधून सूट मिळाली आहे.

तुमच्या प्रेक्षकवर्गातील जो घटक अमेरिकेतील आहे, त्यांच्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशांवर हा टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच अमेरिकेतून जितके लोक, जितका वेळ युट्युबवर तुमचा व्हिडिओ पाहतील, त्यातून होणारी कमाई कर भरण्यासाठी पात्र असेल.

केवळ युट्युबवरील जाहिरातींमधून होणारी कमाईच नाही, तर युट्युब प्रीमियम, युट्युबरला प्रेक्षक स्वखुशीने देत असलेल्या सुपर चॅटमधील रक्कम, चॅनलचे मेम्बर्स देत असलेली फी अशा सगळ्याच प्रकारांमधून होत असलेली कमाई यात गृहीत धरण्यात येणार आहे.

 

yotube super chat inmarathi

 

युट्युबमधून होणाऱ्या कमाईबद्दल ज्यांनी ३१ मेपर्यंत माहिती कळवलेली नाही, त्यांना तब्बल २४ % टॅक्स भरावा लागण्याची शक्यता आहे.

===

हे ही वाचा – छोट्याशा गावातील ७० वर्षांची ‘आपली आजी’ युट्युबवर अशी ठरली सुपरहीट! युट्युबनेही केला गौरव!

===

कशाप्रकारे लावला जाणार टॅक्स?

अमेरिकेबाहेरील युट्युब कन्टेन्ट क्रिएटर्सना ० ते ३० % पर्यंत टॅक्स भरायला लागू शकतो. अमेरिकेतून त्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकसंख्येनुसार या टॅक्सची टक्केवारी ठरवण्यात येणार आहे. म्हणजेच, अमेरिकेतून ज्यांच्या चॅनलला सर्वाधिक प्रतिसाद असेल, अशा युस्ट्युबवीरांना याचा सर्वाधिक भुर्दंड बसेल. 

 अमेरिका आणि तुमचं नागरिकत्व असणारा देश यांच्यात करप्रणालीविषयी असणाऱ्या करारांचा सुद्धा यावर मोठा प्रभाव असेल.

व्यावसायिक युट्युब चॅनलकरिता टॅक्सची रक्कम सर्वाधिक म्हणजेच ३० टक्के इतकी असेल. अर्थात, अमेरिकेतून तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्न या टक्केवारीसाठी गृहीत धरलं जाणार आहे.

चॅनल वैयक्तिक असणाऱ्या मंडळींसाठी यात एक दिलासादायक बाबा आहे असं म्हणता येईल. कारण, हे चॅनल व्यावसायिक नसून वैयक्तिक असेल, तर केवळ २४ टक्के रक्कम कर म्हणून भरावी लागेल.

 

youtube channel inmarathi

 

गुगल फोटोजच्या सुविधेसाठी भरावे लागणार पैसे…

गुगलची एक सुविधा आपण अगदी हमखास नेहमी वापरत असतो, ती म्हणजे गुगल फोटोज! यापुढे गुगल फोटोज वापरण्यासाठी सुद्धा पैसे खर्च करण्याची तयारी ठेवायला लागणार आहे, बरं का मंडळी…!!

मोबाईलमध्ये काढलेले फोटोज आणि व्हिडीओज थेट गुगल फोटोजमध्ये सेव्ह करून ठेवायचे, म्हणजे ते हवे तेव्हा मिळतातसुद्धा आणि मोबाईलमधील मेमरी फार भरत नाही, अशी सवय असणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे. यापुढे केवळ १५ जीबी मेमरी फ्री, म्हणजेच कुठलीही रक्कम भरावी न लागता वापरता येईल.

 

google photos inmarathi

 

यापेक्षा अधिक मेमरीचा वापर करायचा असल्यास, गुगलचं सब्स्क्रिप्शन घ्यावं लागेल. म्हणजेच, १५ जीबी स्टोरेज भरत आलं असेल, आणि नवीन फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर आधीचं डिलीट करा किंवा अधिकच्या मेमरी स्टोरेजसाठी पैसे भरा असे दोनच पर्याय समोर आहेत.

थोडक्यात काय, तर आधी फुकटात देऊन चटक लावायची आणि मग दामदुप्पटीने वसुली करायची, हा फंडा आता गुगल वापरतंय… म्हणजेच या जगात फुकट काहीच मिळत नाही, हे कायम लक्षात असू द्या…!! 

===

हे ही वाचा – प्रत्येक मराठी माणसाने फॉलो करायलाच हवेत असे ११ अफलातून युट्युब चॅनल्स!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?