' गरिबांची काळजी दाखवणारे डावे इकॉनॉमिस्ट्स स्वतः देशाचे पैसे "असे" उधळतात

गरिबांची काळजी दाखवणारे डावे इकॉनॉमिस्ट्स स्वतः देशाचे पैसे “असे” उधळतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. मागच्या वर्षी तर जीडीपी हा मायनसमध्ये  गेला होता. जे काही लोक सावरत होते ते दुसरी लाट आल्यामुळे देशोधडीला लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यवहार ठप्प आहेत, लोकांकडे आज गरजेच्या वस्तू घ्यायाला पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळे साहजिकच कंपन्या देखील कमी प्रमाणात  उत्पादन करत आहेत. कंपनीने सुद्दा आता उत्पादन कमी असल्यानेत्यांनी कॉस्ट कटिंगचा पर्याय वापरला आहे, त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत.

 

 

economy inmarathi 2

हे ही वाचा – काँग्रेस काळात एका रॉकेट सायंटिस्टला “देशभक्तीची किंमत” चुकवावी लागली होती..

देशाच्या अर्थव्यवस्थेचा खुळखुळा करणाऱ्यांमध्ये अनेक राजकारणी, समाजातील प्रतिष्ठित लोक सुद्धा आहेत. सध्या अमर्त्य सेन यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप केले जात आहेत.

कार्तिक तन्ना यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून अमर्त्य सेन यांच्या फुकट विमान प्रवासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे नक्की प्रकरण

 

kartik 2inmarathi

 

नेमकं प्रकरण काय?

आरटीआय ( right to information act) च्या अहवालानुसार अमर्त्य सेन यांनी २०१५ ते २०१९च्या दरम्यान तब्बल २१ वेळा फुकट विमान प्रवास केला आहे. एअर इंडियाचा मोफत विमान प्रवास हा त्यांनाच दिला जातो जे भारत रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत. अमर्त्य सेन यांना १९९९ साली भारत रत्न पुरस्कार दिला गेला आहे.

 

air india plaen InMarathi

 

आश्र्चर्य म्हणजे भारत रत्न मिळालेल्या व्यक्तीं पैकी फक्त अमर्त्य सेन यांनी ४ वर्षात २१ वेळा या योजनेचा फायदा घेतला आहे. आणि एअरलाईन्स च्या म्हणण्यानुसार अमर्त्य सेन हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.

 

कोण आहेत अमर्त्य सेन?

अमर्त्य सेन हे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि त्यांना याच विषयातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. सत्तरच्या दशकात त्यांनी अमेरिका इंग्लड सारख्या देशांमध्ये प्राध्यापकचे काम केले आहे. कोलकात्यामधून अर्थशास्त्रात शिक्षण घेऊन ते पुढे विदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले.

 

amertya sen inmarathi

 

गरिबांची आर्थिक परिस्थिती सुधारली गेली पाहिजे यावर त्यांचा कायम भर असतो, वेगवेगळे कार्यक्रम हाती घेऊन त्यावर त्यांनी संशोधन केले आहे. मात्र जेव्हा प्रवासाची वेळ येते तेव्हा सरकारी योजना आठवतात.

नालंदा विद्यपीठाचे ते चॅन्सलर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले गेले आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराला तर डॉ. कलाम देखील कंटाळले होते, असा आरोप एका भाजपच्या मंत्र्याने केला होता.

बंगालमधील निवडणूक नुकत्याच होऊन गेल्या, ममता बॅनर्जींचे कौतुक तर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी देखील केले. अमर्त्य सेन कसे मागे पडतील, निडणुकांच्या आधी त्यांनी ममता दीदींच्या कामाचे कौतुक केले तसेच आपली बंगाल बद्दल असलेली अस्मिता देखील दाखवली.

नोबेल पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून त्यांनी एक सामाजिक संस्था काढली, ज्या संस्थेतून गोगरीब मुलांना आर्थिक मदत मिळू शकेल, असे स्तुत्य उपक्रमसुरु करून सुद्धा एकीकडे सरकारच्या अशा योजनांचा सर्वात जास्त फायदा त्यांनी घेतला.

भाजपचे सरकार आल्यापासून त्यांनी कायमच त्यांच्यावर टीका केली आहे, शेतकरी आंदोलन असो किंवा नोटबंदी असो, त्यांनी कायमच सरकारच्या धोरणांना विरोध केला आहे. मात्र त्याच सरकारडून पुरस्कार मात्र स्वीकारला आहे. ते स्वतःला नास्तिक समजतात आणि त्यांच्या विचारसरणीवर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव आढळून येतो.

 

मोफत प्रवास योजना कधी सुरु केली?

आज पर्यंत देशातील ४८ दिग्गज मंडळींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ज्या लोकांनी देशाचे नाव मोठे केले आहे. अशा लोकांना पुरस्कार तर दिलाच आहे त्याचबरोबरीने काही सुविधा दिल्या आहेत. २००३ साली जेव्हा वाजपेयींचे सरकार होते तेव्हा मोफत प्रवासाची सुविधा दिली गेली आहे.

 

atal bihari vajpayee inmarathi

हे ही वाचा – या भारतीयाच्या UN मधल्या ८ तासाच्या भाषणामुळे काश्मीर आज भारताचा हिस्सा आहे!

अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना देशात निवडणुका होत आहेत, विकासाची कामे रखडली आहेत, एखाद्या अभिनेत्रींच्या मतावरून तिचे घर फोडले जाते. कोर्टाने नुकसान भरपाई देण्यास सांगितले, तिला गेलेली भरपाई शेवटी आपण भरलेल्या टॅक्समधूनच जाणार.

गोव्याचे दिवंगत मुखमंत्री मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री पदावर असताना देखील इकॉनॉमी श्रेणीतुन प्रवास करायचे, जनतेला कोणतंही गोष्ट फुकट न देता ती स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्या वस्तूची किंमत लोकांना कळेल, या मताचे ते होते.

आज अर्थशास्त्राचे अभ्यासकच दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा असा वापर करत आहेत. सामान्य माणूस मात्र प्रवासाला निघाला की त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?