' भारतीय सैन्य कल्याण निधीसाठी अर्थसहाय्य मागणारा वॉट्सअप मेसेज खरा की खोटा? – InMarathi

भारतीय सैन्य कल्याण निधीसाठी अर्थसहाय्य मागणारा वॉट्सअप मेसेज खरा की खोटा?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

वॉट्सअप हे आजकाल आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलंय. उठल्यापासून झोपेपर्यंत वॉट्सअप चेक करणार नाही असा आजच्या युगातील तंत्रज्ञानी माणूस सापडणे कठीण! पण वॉट्सअप आल्यापासून आपल्या जीवनात क्रांतीकारी बदल घडला एवढे मात्र नक्की! वैयक्तिक उपयुक्ततेपासून आता थेट सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीकोनातून वॉट्सअपचा वापर होऊ लागलाय ही गोष्ट देखील कौतुकास्पद आहे. लोकांना जागृत करण्यासाठी, त्यांना समाजाविषयी त्यांची जबाबदारी समजवून देण्यासाठी वॉट्सअप इमेजेस, व्हिडियोज, मेसेजेस रामबाण ठरतात. अश्या या उत्तम कार्याला गालबोट लावतात खोटे/फेक मेसेजेस. या खोट्या मेसेजसच्या माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो.

whatsapp-message-scam-marathipizza02
allsingaporestuff.com

मध्यंतरी या गोष्टी फार व्हायच्या, ज्यामुळे अनेक लोक लुबाडले गेले होते आता मात्र अश्या गोष्टींपासून लोक सावधच राहतात. त्यामुळे सहसा अर्थसहाय्य मागणाऱ्या, कोणाला मदत करा म्हणून निधी गोळा करण्यासाठी आवाहन करणाऱ्या मेसेजवर लोक विश्वासच ठेवत नाही. ही गोष्ट चांगलीच आहे म्हणा, पण यामुळे झालं असं की लोकांना आता वॉट्सअपवर फिरणारे सर्वच मेसेज खोटे वाटू लागले आहेत. असाच एक प्रकार मध्यंतरी झाला. काही महिन्यांपूर्वी सेनेला मदत करा असे आवाहन करणारा एक मेसेज संपूर्ण भारतभर वॉट्सअपवर व्हायरल झाला होता, नेहमीच्या प्रमाणे लोकांना वाटलं की हा काहीतरी फसवेगिरीचा प्रकार आहे, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा मेसेज खरा होता आणि खुद्द भारतीय आर्मीकडून तो देशभर व्हायरल करण्यात आला होता,

whatsapp_fraud-marathipizza
हिंदी भाषेतील तो मेसेज असा होता-

एक रूपये मात्र रोज का भुगतान वो भी भारतीय सेना के लिए। मोदी सरकार ने कल कैबिनेट की मीटिंग में भारतीय सेना की आधुनिकता और सेना के जवानो जो कि युद्ध क्षेत्र में घायल होते है या शहीद होते है उनके लिए एक बैंक अकाउंट खोल ही दिया।जिसमे हर भारतीय अपनी स्वेक्षा से कितना भी दान दे सकता है। जो कि 1 रुपए से शुरू होकर असीमित है।
इस पैसे का प्रयोग सेना तथा अर्धसैनिक बलो के लिए हथियार खरीदना भी होगा । मन की बात तथा फेसबुक, ट्वीटर,व्हात्सप्प पर लोगो के सुझाव पर आज के जलते हालात पर मोदी सरकार ने अंततः फैसला लेते हुए नई दिल्ली, सिंडिकेट बैंक में आर्मी वेलफेयर फण्ड बैटल कैदुअल्टी फण्ड अकाउंट खोला है।
यह film star akshay kumar का मास्टर स्ट्रोक है। जहाँ से भारत को सुपर पॉवर बनने से कोई नहीं रोक सकता। भारत की 1.30 करोड़ जनसंख्या में से अगर 70% भी केवल एक रुपया इस फण्ड में रोज़ डालते है तो वो 1 रुपये एक दिन में 100 करोड़ होगा। 30 दिन में 3000 करोड़ और 36000 करोड़ एक साल में। 36,000 करोड़ तो पाकिस्तान का सालाना रक्षा बजट भी नहीं है । हमलोग प्रतिदिन 100 या 1000 रुपया रोज़ फालतू के काम में खर्च कर देते है लेकिन यदि हमलोग एक रूपये सेना के लिए दिया तो सचमुच भारत एक सुपर पॉवर जरूर बनेगा।
आपका ये रुपया सीधे रक्षा मंत्रालय के सेना सहायता एवं वॉर कैसुअल्टी फण्ड में जमा होगा। जो सैन्य सामग्री और सेना के जवानो के काम आएगा
इसलिए मोदीजी के इस अभियान से जुड़कर सीधे तौर पर सेना की मदद करें। पाकिस्तान हाय हाय कर, सड़क जाम करने और बयानबाजी करने से कुछ नहीं होगा। मोदी और देश की जनता की सोच को अमलीजामा पहनाये और अपने देश की सेना को मजबूत बनाये। जिससे पकिस्तान और चीन जैसे देशो को उसकी बिना किसी देश की सहायता से उनकी औकात बता सके। बैंक डिटेल्स निचे दिए गए है।
Bank Details:
SYNDICATE BANK
A/C NAME: ARMY WELFARE FUND BATTLE CASUALTIES
A/C NO: 90552010165915
IFSC CODE: SYNB0009055
SOUTH EXTENSION BRANCH,NEW DELHI.
इस सन्देश को सभी जगह फैला दे ताकि सभी 1.30 करोड़ भारतीयो को अपने कर्तव्यों का पता चल जाये। सभी ग्रुप और पर्सनल no पर भी भेजें। जय हिन्द।

मेसेज खोटा असल्याची वावटळ उभी राहिल्यावर खुद्द भारतीय सैन्याने अधिकृतरीत्या हा मेसेज खरा असल्याचे प्रतिपादन ट्विटरवरून केले.

army-twitter-marathipizza
twitter.com

आर्मीतर्फे स्पष्ट करताना सांगण्यात आले की,

आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्यूअलिटीज नावाने एक बँक खाते सिंडीकेट बँकेमध्ये खोलण्यात आलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक त्याच्या ऐपतीप्रमाणे या बँक खात्यामध्ये भारतीय सैन्यासाठी काही रक्कम दान करू शकतो किंवा रक्कम धनादेशाद्वारे पाठवू शकतो. ज्यामधून देशासाठी शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्यात येईल.

खुद्द आर्मीने स्पष्टीकरण दिल्यानंतर ज्या सिंडीकेट बँक खात्याचा या मेसेज मध्ये उल्लेख आहे त्या सिंडीकेट बँकेने देखील स्वत:हून अधिकृत पत्रक जाहीर करत लोकांच्या मनातील मेसेज खोटा असल्याचा गैरसमज दूर केला आहे.

syndicate-bank-marathipizza

या संदर्भात सिंडिकेट बॅंकेतर्फे जारी करण्यात आलेले पत्रक तुम्ही येथे वाचू शकता.

तर अश्याप्रकारे आर्मी ला डोनेट करण्याचा मेसेज खरा आहे. मागे ऊरी ला जो हल्ला झाला, त्या नंतर सिंडिकेट बँकेत हे अकाऊंट स्वतः आर्मीने सुरू केलं आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन या कौतुकास्पद उपक्रमामध्ये आपले आर्थिक सहाय्य देऊ शकता.

या मेसेजमधील मध्ये फक्त एकच गोष्ट भारतीय आर्मीने नाकारली आहे ती म्हणजे या मेसेजचा मोदीजी किंवा अक्षय कुमारशी संबंध नाही.

थोडक्यात – इच्छा असेल तर पैसे डोनेट करायला हरकत नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserve

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?