' अॅल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये खाण्याच्या वस्तू पॅक करायच्या आधी, हे वाचा

अॅल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये खाण्याच्या वस्तू पॅक करायच्या आधी, हे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज आपण काही सामान आणायचे असेल तरी घरातून कापडी पिशवी नेत नाहीच वर दुकानदाराकडून प्लॅस्टिकची पिशवी मागतो, अगदी भाजी दूध यासारख्या वस्तू देखील प्लॅस्टिक पिशवीतून आणतो. आधीच प्लॅस्टिक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

काही दुकानदार मात्र काटेकोरपणे प्लॅस्टिक पिशवी न वापरता ग्राहकांना थेट कापडी पिशवीचा पर्याय देतात आणि त्याचे वेगळे पैसे सुद्धा घेतात.

 

plastic-bags-inmarathi

 

कोणताही खाद्यपदार्थ कशातून आणावा? याला आपल्याकडे शास्त्र आहे, जसे आपल्याकडे ताक पितळ्याच्या भांड्यात ठेवत नाही, मासे, चिकन सारखे पदार्थ खाल्ल्यावर दुग्धजन्य पदार्थ खाऊ नये, असे सांगतात ते शास्त्रीयरित्या योग्य आहे.

आज लॉकडाऊनमुळे उठसूट आपण हॉटेल मध्ये जाऊन खाऊ शकत नाही. त्यामुळे आपण पार्सल आणतो. हॉटेल वाले सुद्धा पार्सल देताना सर्रास प्लॅस्टिक वापरतात आणि काही पदार्थ अॅल्युमिनियमच्या फॉइल पेपर मध्ये गुंडाळून देतात.

 

foil paper inmarathi

 

आपण ऑफिस, शाळेत डबा नेताना पोळी, फुलके, पराठे नामक पदार्थ फॉईल पेपरमध्येच नेत असायचो. मुळात फॉईल पेपरमध्ये जेवण गरम राहते आणि बराच काळ स्वछ टिकते, केवळ याच उद्देशाने ते आपण वापरतो. मात्र आरोग्याच्या दृष्टीने ते कितपत योग्य आहे, चला जाणून घेऊयात!

कोणताही खाद्यपदार्थ एखाद्या वस्तूमध्ये ठेवल्यास साहजिकच त्या वस्तुमधील केमिकल घटकांचा त्या पदार्थांशी संपर्क येतो. अशाने त्या पदार्थमध्ये सुद्धा ते घटक जाऊ शकतात.

पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत अडथळा :

आज नोकरदार वर्गात सर्वात जास्त पुरुष येतात, ऑफिसला डबा नेताना साहजिकच फॉईल पेपरचा वापर होतो. फॉईल पेपरमुळे त्यांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम म्हणजे male fertility सारखे आजार होऊ शकतात.

 

MALE-INFERTILITY-inmarathi

हे ही वाचा – आहारात हे सोपे बदल करा आणि मिळवा तल्लख, तरतरीत बुद्धीमत्ता, वाचा!

हृदय आणि कॅन्सरचा धोका :

गरम पदार्थ फॉईल पेपर मध्ये ठेवल्यांनंतर फॉईल पेपरमधील केमिकल घटक वितळून ते खाद्यपदार्थांमध्ये मिसळतात. जे आपल्या खाण्यासाठी योग्य नाही, असे पदार्थ खाल्ल्यास हृदयसंबंधीचे आजार आणि कर्करोगाचाही धोका निर्माण होऊ शकतो.

 

corona and heart 5 inmarathi

 

हाडे ठिसूळ होण्याची शक्यता :

ज्या लोकांना आधीच हाडाच्या समस्या आहेत त्या लोकांनी तर फॉईल पेपर मधले खाद्य पदार्थ टाळले पाहिजेत. कारण फॉईल पेपर मधील घटक हाडे ठिसूळ करण्याचे काम करतात.

 

bone health inmrathi

 

अल्झयामर आणि डिमेन्शियाचा धोका :

काही जणांना जास्त गरम पदार्थ बांधून घेण्याची सवय असते. ही सवय पूर्णपणे चुकीची आहे आणि शरीरासाठी हानिकारक आहे. अति गरम पदार्थ फॉईल मध्ये ठेवल्यास अल्झयामर आणि डिमेन्शियासारखे गंभीर आजार उदभवू शकतात.

 

alzhemier inmarathi

 

इम्म्युनिटीवर परिणाम :

सध्याचे दिवस हे इम्म्युनिटी जितकी चांगली ठेवता येई तितकी चांगली ठेवायचे आहेत. त्यामुळे फॉईल पेपरचा परिणाम थेट आपल्या इम्म्युनिटीवर सुद्धा होतो.

 

indian immunity inmarathi

 

अस्थमा आजार :

कोरोनामुळे आधीच लोकांना श्वसनाचे आजार उद्धवत आहेत. त्यात वाढते वायू प्रदूषण यामुळे श्वसनाचे आजार वाढायला लागले आहेत. यातच जर आपण फॉईल पेपरमधील खाद्यपदार्थाचे सेवन केल्यास अस्थमा सारखे आजारदेखील होऊ शकतात.

 

asthma featured inmarathi

हे ही वाचा – खरं वाटणार नाही पण, कोणतेही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

आज घरात हॉटेलमध्ये वापरले जाणारे फॉईल पेपर अॅल्युमिनियमचे नव्हते. टिन फॉईलचा उपयोग केला जात होता मात्र या टिनफॉईल मध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येत असे. त्याबद्दल बऱ्याच लोकांनी देखील तक्रारी केल्या, त्यामुळे टिनफॉईल जाऊन  अॅल्युमिनियमचे फॉईल पेपर विकसित केले गेले.

फॉईल पेपर हा तर रोजच्या आयुष्यातला भाग बनून गेला आहे सध्या जरी त्याचा वापर नसेल तरी सर्व सुरळीत चालू झाल्यावर वापर वाढलेच त्यामुळे आधीच आपण काहीतरी उपाययोजना करूयात. जितका फॉईल पेपरचा वापर कमी करता येईल तितका केला पाहिजे.

फॉईल पेपरला पर्याय म्हणून वर्तमान पत्राच्या पेपरचा वापर करू शकतो. अगदीच गरज असल्यास उत्तम दर्जाचा फॉईल पेपर वापरणे.

प्लॅस्टीकचा वापर जसा आज अनेक ठिकाणी कमी होताना दिसून येत आहे तसा या पेपरला देखील भविष्यात एक पर्याय निर्माण झाला पाहिजे .

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?