' 'नेस्ले'चा धक्कादायक रिपोर्ट! आता मुलांना मॅगी खायला देताना १० वेळा विचार कराल!

‘नेस्ले’चा धक्कादायक रिपोर्ट! आता मुलांना मॅगी खायला देताना १० वेळा विचार कराल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतातील आबालवृद्धांना आवडणारा एक चमचमीत पदार्थ म्हणजे मॅगी. अगदी ४-५ वर्षांच्या लहान मुलांपासून ते सत्तरी पार केलेले आजी-आजोबासुद्धा अगदी मिटक्या मारत मॅगीचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.

‘हा बेटा बस दो मिनिट’ असं म्हणत आपल्या लाडक्यांना मॅगी आणून देणारी आई आपण जाहिरातीत पाहिली, थोडं पुढे गेल्यावर सोशल मीडियाचा काळ आला आणि मॅगी दोन मिनिटांत बनत नाही याबद्दल अनेक विनोद ऐकले. एवढंच काय, तर रोहित शर्मा फॉर्मात नव्हता, त्यावेळी त्याला ‘मॅगीमॅन’ असं नाव सुद्धा मिळालेलं ऐकलं.

इंजिनियर्स, त्यातही विशेषतः हॉस्टेलवर राहणारे इंजिनियर्स सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र मॅगीच खातात, भारतातील बॅचलर मंडळींचं ‘राष्ट्रीय खाद्य म्हणजे मॅगी’, असा सूरही विनोदाने ऐकायला मिळतो.

 

maggie inmarathi

 

अशा या सगळ्यांच्या लाडक्या मॅगीवर २०१५ साली चक्क बंदी घालण्यात आली. मागच्या वर्षी टिकटॉकवर बंदी आल्यावरही झाला नसेल इतका आक्रोश या मॅगीवरील बंदीच्या वेळी पाहायला मिळाला.

मॅगीवर बंदी येण्याचं कारण होतं, ते म्हणजे त्यात शिसं योग्य प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं समोर आलं होतं. अर्थात यातूनही बाहेर पडून मॅगीने पुनरागमन केलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या आवडीचे नूडल्स खाण्याची संधी लहान मुलांना मिळाली.

===

हे ही वाचा – तरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – ‘मॅगीचं’ हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का?

===

केवळ मॅगीच नाही, तर याच म्हणजे नेस्ले कंपनीचं उत्पादन असलेली नेसकॅफे अनेकजण आवडीने पितात. ‘टेक अ ब्रेक’ म्हणत किटकॅटचा तुकडा तोडून, चॉकलेटचा आस्वाद घेतात. पण हे सगळं जर तुम्ही अगदी आवडीने खात असाल, तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं नक्कीच आवश्यक आहे.

 

kitkat have a break inmarathi

 

मॅगी आणि नेसकॅफे बनवणाऱ्या नेस्ले या कंपनीमधील एका अंतर्गत रिपोर्टमधून उघड झालेली माहिती, तुम्हाला तुमचे हे आवडीचे पदार्थ खाण्यापासून रोखू शकते हे मात्र नक्की!

===

हे ही वाचा – अनेकांचा जीव की प्राण असणाऱ्या ‘मॅगी’च्या नावाची मजेशीर गोष्ट तुम्ही ऐकलीय का?

===

नेस्लेचा भारतातील व्यवसाय

अगदी फार पूर्वी मायलो नावाचं एक बोर्नव्हिटा सारखंच पेय मिळायचं, तिथपासून ते पार आत्ताच्या सुपरहिट आणि एव्हरग्रीन मॅगीपर्यंत अनेक वस्तू नेस्ले भारतात विकत आहे. भारतीय लोक ते आवडीने खातपितंही आहेत. आज भारतात तब्बल ८ ठिकाणी नेस्लेच्या उत्पादनांची निर्मिती करण्यात येते.

 

nestle milo inmarathi

 

आहार कुठल्याही प्रकारचा असला, तरीही त्यातून पोषकतत्त्वं मिळणं आणि शरीराचं योग्यप्रकारे पोषण होणं आवश्यक आहे. नेस्ले यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, असं मत या कंपनीने अनेकदा मांडलेलं आहे. मात्र, आज हे खरंच होताना दिसतंय, असं त्यांच्या अंतर्गत रिपोर्टमधून तरी दिसून येत नाही.

रिपोर्टमध्ये नेमकं काय?

नेस्ले बनवत असलेले तब्बल ६० टक्क्याहून अधिक खाद्यपदार्थ, हे आरोग्यासाठी नेमून देण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसल्याचं कंपनीने मान्य केलं आहे. एवढंच नाही, तर यातील काही पदार्थांमध्ये कीतीही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तरीही ते या निकषांची पूर्तता करू शकणार नाहीत, असं देखील नेस्लेने या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Financial Times या वृत्तपत्राने नेस्लेच्या या रिपोर्टमधील डॉक्युमेंटचा आधारे ही माहिती दिली आहे.

पाळीव प्राण्यांसाठी नेस्ले बनवत असलेले खाद्यपदार्थ आणि काही वैद्यकीय पोषणासाठी आवश्यक पदार्थ यांचा मात्र या अहवालात कुठेही समावेश नाही. केवळ सहज खाण्यात येणारे पदार्थ आणि नेस्लेची पेयं यांच्याविषयीचा हा अहवाल असल्याने, इतर गोष्टींविषयी काळजी करण्याचं कारण नाही, हेदेखील तितकंच खरं आहे.

नेस्ले आता काय करणार?

‘योग्य आहार म्हणजे चविष्ट आणि पौष्टिक या दोन्ही बाबींचा समतोल राखणे होय.’ असं नेस्लेचं म्हणणं आहे. यासाठी ते कायमच प्रयत्नशील असतात आणि यापुढेही राहणार आहेत, असं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येतं. त्यामुळेच अधिकाधिक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवणं, हेच त्यांचं लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

nestle inmarathi

===

हे ही वाचा – सावध व्हा! रोजच्या खाण्यातले “हे” पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी करतात!

===

असं असतानाही त्यांच्याच अहवालातील माहितीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. म्हणूनच या पदार्थांचा दर्जा या सुधारून, ते आरोग्यासाठी अपायकारक न ठरता, पौष्टिक कसे ठरतील यासाठी कंपनीने कंबर कसल्याचं दिसून येतंय. 

त्यामुळेच, आरोग्यासाठी घातक ठरत असलेले पदार्थ पौष्टिक कसे ठरतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नेस्लेकडून सांगण्यात येत आहे. आता यात ते यशस्वी ठरतात का, हे येत्या काळात नक्कीच कळेल.

तोपर्यंत नेस्लेच्या पदार्थांवर किती ताव मारायचा हे ठरवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती सुज्ञ आणि समर्थ आहे, यातही शंका नाहीच…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?