' आधी सुशांत आता कार्तिक, असे कीती गुणी कलाकार बॉलिवूड गिळंकृत करणार?

आधी सुशांत आता कार्तिक, असे कीती गुणी कलाकार बॉलिवूड गिळंकृत करणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सुशांतसिंग राजपूतच्या रहस्यमयी मृत्यूला १४ जूनला एक वर्ष होईल. ही नेमकी आत्महत्या होती की काही कटकारस्थान होतं यावर अजूनही आपली यंत्रणा पडदा पाडू शकली नाहीये.

पहिले पोलिस, मग सीबीआय मग नारकोटिक्स यांनी चौकशी केली, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ आणि आणखीन काही लोकांच्या चौकशा झाल्या, काहींना अटक झाली काही लोकांची निर्दोष सुटका झाली.

पहिले काही महीने सगळ्याच न्यूज चॅनल्सनी खासकरून रिपब्लिक टीव्हीने हा मुद्दा उचलून धरला. सरकारमध्ये असलेल्या बऱ्याच बड्या लोकांची नावं यात घेतली गेली, पण शेवट काय झालं?

 

sushant singh inmarathi

 

हळूहळू प्रकरण दाबलं गेलं, नंतर इतरच भलत्या प्रकरणांमुळे सुशांतच्या केसला बगल दिली गेली, राजकीय दबाव आणला गेला आणि आता तर हा मुद्दा कोणत्याच न्यूज चॅनलला आठवत नाहीये.

हे ही वाचा आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!

बॉलीवूड नेपोटीजम, कंपूशाही, ड्रग्सचं कनेक्शन अशा कित्येक गोष्टी यातून बाहेर आल्या पण यातून निष्पन्न काहीच झालं नाही!

पण आता हे सगळं पुन्हा एका आऊटसाईडरच्या बाबतीत घडणार का? आणखीन एक लोकप्रिय अभिनेता सुशांतच्याच वाटेवर जाणार का? सुशांतसारखंच यालासुद्धा बॉलीवूड गिळंकृत करणार का? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जातयात.

तो आऊटसाईडर म्हणजे कार्तिक आर्यन. प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की स्विटी, अशा लव्ह रंजन टाइपच्या फिल्म्समधून बॉलीवूडमध्ये स्वतःचं नाव बनवणारा कार्तिक आर्यनचं फॅन फॉलोइंग कोणत्याही स्टारकीडला लाजवणारं आहे.

आज कित्येक स्टारकीड हे फक्त त्यांच्या Gym Looks मुळेच सर्वात जास्त लोकप्रिय आहेत, अभिनयाचा गंधही त्यांना नाही, पण केवळ स्टार लोकांची मुलं म्हणून त्यांना प्राधान्य दिलं जातं.

पण घरातून खोटं सांगून मुंबईत हीरो बनायला आलेल्या कार्तिकने मात्र कधीच अभिनयाशी तडजोड केली नाही, सुरुवातीला त्याला एकाच प्रकारचे सिनेमे मिळाले पण त्यातही त्याने स्वतःची छाप सोडली आणि आज मोठमोठ्या लोकांसोबत त्याचं नाव जोडलं जातंय!

 

kartik aryan inmarathi

 

मिडल क्लास फॅमिली, कोणतंही फिल्मी कनेक्शन नसताना त्याने जे मिळवलं आहे ते पाहता “ये लंबी रेस का घोडा है” असं म्हणायला काहीच हरकत नाही! पण सध्या न्यूज चॅनल्स आणि इतर समाज माध्यमांमधून त्याच्याविषयी काहीतरी भलतंच ऐकायला मिळतंय.

सर्वप्रथम ही बातमी आली की करण जोहरच्या दोस्ताना २ मधून कार्तिकला काढलं आहे, त्याचं विचित्र वागणं हेच यासाठी कारणीभूत असल्याचं धर्मा प्रॉडक्शनने स्पष्टीकरण दिलं.

यापाठोपाठ त्याला शाहरुख खानच्या रेड चिलीज बॅनरखाली बनणाऱ्या एका सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. अर्थात या सिनेमाविषयी बाहेर काहीच चर्चा नव्हती तरी शाहरुखने कार्तिकला सिनेमातून काढलं अशा वावड्या उठू लागल्या.

 

kartik aryan and shahrukh inmarathi

 

हे सगळं सुरू असतानाच आनंद राय यांनीसुद्धा त्यांच्या आगामी सिनेमात कार्तिक ऐवजी आयुष्यमान खुरानाला घेतलं असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी एका मुलाखतीत दिलं आहे.

या सगळ्या बातम्या वाचल्या की डोळ्यासमोर सुशांतच उभा राहतो, त्यालाही अशाचप्रकारे एका पाठोपाठ एक अशा सिनेमातून काढलं गेलं आणि पूर्णपणे बाजूला ठेवलं गेलं, आणि हे सगळं तेव्हा समजलं जेव्हा त्याने आत्महत्या केली.

अजूनही कार्तिक आर्यन कडून याबाबतीत काहीही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. त्याने स्वतः या फिल्म्स सोडल्या आहेत की त्याला यातून पद्धतशीरपणे बाहेर काढलं आहे हे तो स्वतःच सांगू शकेल.

पण जोवर कार्तिक काहीच बोलत नाहीये तरी त्याच्या बाबतीत एवढं का चर्चा केली जात आहे? सुशांतप्रमाणेच कार्तिकचासुद्धा एक narrative सेट करून त्याच्यावर unprofessional behavior चा टॅग लावून त्याला हळू हळू इंडस्ट्रीतून बॉयकॉट करायचा इरादा आहे का?

 

kartik aryan karan johar inmarathi

 

असे कित्येक प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारले जात आहेत. कार्तिक स्क्रिप्टमध्ये बरीच लुडबूड करायचा अशी कारणं या काही प्रॉडक्शन बॅनरने दिली आहेत, पण यामागची खरी कारणं अजूनही समोर यायची आहेत!

हे ही वाचा स्क्रिनवर दिसणाऱ्या बॉलिवूडमागील लपवलेला, भयानक, काळाकुट्ट इतिहास!

खरंतर याबाबतीत स्वतः कार्तिक आर्यनने बाहेर येऊन स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, कारण त्याच्याविरुद्धसुद्धा असंच काहीतरी षडयंत्र रचायचा प्रयत्न होत असेल तर त्याने यावर भाष्यकरायला हवं किंवा त्याने स्वतः हे सिनेमे सोडले आहेत का ते तरी स्पष्टीकरण द्यायला हवं!

अर्थात कार्तिक यावर बोलला तरच या सगळ्या गोष्टींची उत्तरं आणि त्यामागचं तथ्य नेमकं काय ते आपल्याला कळू शकेल, बाकी सुशांतसारखी वेळ त्याच्यावर न येवो हीच प्रार्थना आपण करू शकतो!

 

kartik and sushant inmarathi

 

यामध्ये कार्तिकची काहीच चूक नसेल आणि यामागे बॉलीवूडचाच कुरूप चेहरा असेल तर खरंच वेळीच हे सत्य लोकांपुढे यायला हवं, आणखीन असे कीती गुणी कलाकार ही इंडस्ट्री गिळंकृत करणार आहे देव जाणे?

===

हे ही वाचा हिंदी सिनेमातील सत्याचा विपर्यास! आपल्या मनात रुजवले गेलेले घटनाक्रम वास्तवात किती वेगळे होते

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?