' कुरकुरेची जाहिरात करताना जुहीला हरकत नाही – 5G मध्येच ‘आरोग्याचा धोका’ का जाणवतोय? – InMarathi

कुरकुरेची जाहिरात करताना जुहीला हरकत नाही – 5G मध्येच ‘आरोग्याचा धोका’ का जाणवतोय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुकेश अंबानीने जवळपास वर्षभर सगळ्यांना जियो फोर जी फुकट वापरायला देऊन हायसपीड इंटरनेटची सवय लावली, नंतर हळूहळू त्याने त्यासाठी पैसे आलारायला सुरुवात केली आणि आता रिलायन्स जियो ही टेलिकॉम इंडस्ट्रीमधली सर्वात मोठी कंपनी होऊन बसली आहे.

 

jio 4g inmarathi

 

जियोने जसे फोर जी प्लॅन्स स्वस्त केले, तशी मार्केटमध्ये इतर ब्रॅंड्समध्ये चढाओढ सुरू झाली. जियोला टक्कर देण्यासाठी त्यांच्याच युक्त्या आजमावायला सुरुवात केली. इतर टेलिकॉम ब्रॅंडनीसुद्धा स्वस्तात फोर जी नेटवर्क द्यायला सुरुवात केली.

आता म्हणता म्हणता ‘५जी’ येऊन ठेपलं आहे. काही महिन्यांपूर्वी मार्केटमधल्या मोबाइल कंपन्यांनी ५ जी सपोर्ट करणारे फोन्स लॉंच करायला सुरुवात केली तेव्हाच कुणकुण लागली होती, की लवकरच ५जी टेक्नॉलजी रोल आउट होईल, आणि तसंच झालं!

देशभरात सगळ्याच टेलिकॉम इंडस्ट्रीने ५जी टेस्टिंग सुरू केलं आणि ते आता शेवटच्या टप्प्यात असतानाच या कोरोना महामारीत अशी माहिती समोर आली की या ५जी टेस्टिंगमधल्या रेडीएशनमुळे लोकांना वेगवेगळे आजार होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हिने काल दिल्ली उच्च न्यायलयात या ५जी नेटवर्क विरोधात एक केस फाइल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार हे येणारं प्रगत तंत्रज्ञान मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

 

5g inmarathi

 

फक्त मनुष्यच नाही तर ही ५जी रेडीएशन्स इतर प्राणी सजीव आणि निसर्ग यांच्या आरोग्यालासुद्धा हानिकारक ठरू शकतात. सध्या आपल्या देशात कोरोनाबरोबरच, ‘इतर आजारही त्यांचं डोकं वर काढतायत ते या ५जी टेस्टिंगमुळेच’ असा सुद्धा जुही चावलाने दावा केला आहे.

जुही एक अभिनेत्री आहेच शिवाय ती पर्यावरणरक्षक म्हणूनसुद्धा फार तत्परतेने काम करते, पण ५जी नेटवर्कबाबत तिने जी केस फाइल केली आहे त्यावरून सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जातंय!

“जुही चावला कुरकुरे आणि मॅगीची जाहिरात करते तेव्हा तिला लहान मुलांच्या आरोग्याची जाणीव होत नाही का?” अशी खोचक टिप्पणीसुद्धा तिच्यावर नेटकरी करत आहेत. 

 

juhi kurkure inmarathi

 

जुही ही ५जी च्या पूर्णपणे विरोधात आहे असं नाही. जर टेलिकॉम इंडस्ट्रीज लोकांच्या, प्राण्यांच्या आरोग्याचा आणि निसर्गाचा विचार करून काम करणार असतील, तर या तंत्रज्ञानाचं स्वागतच आहे असंही तिने नमूद केलं आहे.

जुहीच्या या केसवर पुन्हा २ जून रोजी विचार केला जाऊन तिची पिटिशन नीट अभ्यासली जावी असे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत!

एकंदरच कित्येक कंपन्यांच्या करोडो रुपयांच्या गुंतवणुकीवर आता प्रश्नचिह्न उभं राहणार आहे. खरंतर या ५जी तंत्रज्ञानाचा आपल्या सुरक्षा दलांनासुद्धा मोठा फायदा होणार आहे अशी शक्यता तज्ञ मंडळींकडून वर्तवली जात आहे.

आता नेमकं हे ५जी कधी सुरू होणार हे सांगणं कठीण आहे पण जुही चावला हिने उठवेल्या आवाजामुळे नक्कीच या कार्यप्रणालीत काहीतरी सुधारणा होऊन लवकरात लवकर प्रगत तंत्रज्ञान आपल्या हातात पडावे हीच आशा आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?