' मायक्रोवेव्ह नव्यासारखा चकाचक ठेवण्यासाठी, हे घरगुती उपाय करून पहा...

मायक्रोवेव्ह नव्यासारखा चकाचक ठेवण्यासाठी, हे घरगुती उपाय करून पहा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्याचं आपलं आयुष्य हे विविध यंत्रांनी घेरलेलं आहे, ऑटोमॅटिक सेमीऑटोमॅटिक अशा वेगवेगळ्या मशीन्सनी आपलं दैनंदिन जीवन सुकर झालं आहे.

पाटा वरवंटा जाऊन मिक्सर, ग्राइंडर, फूड प्रोसेसर आला. चूल जाऊन छान ४ बर्नर असणारी शेगडी आली. आधी सेमी ऑटोमॅटिक मशीन्समध्ये कपडे धुतले जायचे आता फुली ऑटोमॅटिक मशीन्स बाजारात आली आणि घरची सगळी कामं अगदी चुटकीसरशी होऊ लागली!

या सगळ्यात किचनमध्ये सध्याच्या काळात सर्वात महत्वाचा भाग बनला तो म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. ज्यांच्या घरात मायक्रोवेव्ह आहेत त्यांनी लॉकडाउन काळात पुरेपूर वापर करून घेतला. केक-पेस्ट्री पासून पिझ्झा, नाचोज असे विविध प्रकार लोकांनी घरीच केले.

 

microwave inmarathi

 

१५ ते २० वर्षांपूर्वी घरात मिक्सर फ्रीज असणे ही काळाची गरज होती आता त्यांची जागा मायक्रोवेवने घेतली आहे. सध्या काही झटपट पदार्थ करायचे असल्यास किंवा केलेले पदार्थ गरम करण्यासाठी सर्रास मायक्रोवेव्हचा वापर घरोघरी होतो.

अन्नपदार्थ, चहा कॉफी, बाहेरून आणलेले अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह हे कीती उपयोगी आहेत हे आपल्याला वेगळं सांगायला नको, शिवाय एखादी गोष्ट गरम करून खायला पाहिजे हे या कोरोना महामारीनेच आपल्याला शिकवलं.

हे ही वाचा महागड्या क्लीनर्स शिवाय घरातल्या घरात उत्कृष्ट स्वच्छता ठेवण्याच्या ८ टिप्स जाणून घ्या

पण सध्या अत्यावश्यक झालेल्या या मायक्रोवेवची काळजीसुद्धा तेवढीच घ्यावी लागते. दिसायला छोटं यंत्र जरी असलं तरी तो स्वच्छ ठेवणंदेखील तितकंच गरजेचं असतं.

 

oven inmarathi

 

या लेखात आपण मायक्रोवेव्ह स्वच्छ कसा ठेवायचा? त्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो? हे सगळं जाणून घेणार आहोत!

१. वेट टिश्यूज :

 

wet tissues inmarathi

 

आपल्या घरातले काही वेट टिश्यूज मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे आणि काही मिनिटं ओव्हन सुरू ठेवावा, आतमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेमुळे बरीचशी घाण ही त्या वेट टिश्यूजवर टिपलेली असेल.

मग नंतर जेव्हा तो थंड होईल तेव्हा मायक्रोवेव्हचा आतला भाग त्या टिश्यूने स्वच्छ पुसून घ्यावा!

२) बेकिंग सोडा :

 

baking soda inmarathi

 

बेकिंग सोडा पाण्यात मिसळून ते मिश्रम मायक्रोवेव्हच्या खराब झालेल्या भागावर लावा, थोडा वेळ ते मिश्रण तसेच राहूद्या, नंतर एका स्पंजने तो खराब झालेला भाग व्यवस्थित टिपून घ्या!

३) पाणी आणि व्हीनेगर :

 

vinegar inmarathi

 

मायक्रोवेव्ह सेफ काचेची भांडी असतात त्यात थोडे व्हीनेगर आणि पाणी यांचे मिश्रण घ्यावे आणि ते मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्यावे आणि थोडावेळ तो सुरू करावा, मायक्रोवेव्हचा आतला भाग स्वच्छ होण्यास याची बरीच मदत होते!

हे झाल्यानंतर ते भांडे व्यवस्थितपणे धुवून घ्यावे!

४) लिंबाचा रस :

 

lemon cleaning inmarathi

 

लिंबाचे २ भाग करून मायक्रोवेवमधल्या प्लेटच्या मधोमध ठेवावे, १ चमचा पाणीसुद्धा त्यावर घालावे आणि साधारण मिनिटभर तरी मायक्रोवेव्ह सुरू ठेवावा. थोड्यावेळाने ओव्हनचा आतला भाग नीट पुसून घ्यावा.

लिंबू हे मायक्रोवेव्ह ओव्हन साफ करण्याचा सर्वात उत्तम घरगुती उपाय आहे!

५) इतर क्लीनर्स :

 

microwave cleaner inmarathi

 

या बरोबरच बाजारात बरेच महागडे क्लीनर्स उपलब्ध आहेत. या घरगुती उपायांनी तुम्हाला समाधान मिळत नसेल तर तुम्ही आवश्यक ते क्लीनर्स वापरू शकता. पण ते क्लीनर्स वापरल्यावर मायक्रोवेव्ह मध्ये एक विशिष्ट कुबट वास काही काळ राहतो.

तुम्ही जर बाहेरचे क्लीनर्स वापरुन तुमचा ओव्हन स्वच्छ करत असाल तर ते झाल्यावर ओव्हनचा दरवाजा काही काळ तसाच उघडा ठेवा जेणेकरून तो वास लवकरात लवकर बाहेर जाईल आणि तुम्ही मायक्रोवेव लवकर वापरू शकाल!

अशा रीतीने तुम्ही तुमच्या घरातला ओव्हन स्वच्छ ठेऊ शकता, तुम्हालाही काही आणखीन वेगळ्या टिप्स माहीत असतील तर त्या आमच्याशी नक्कीच शेयर करा!

===

हे ही वाचा बाहेरून आल्यावर आपण अंघोळ तर करतो, पण या ९ वस्तू स्वच्छ करणं आहे जास्त गरजेचं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?