' असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली! – InMarathi

असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारण आणि मनोरंजन म्हणजे एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. एका बाजूशिवाय दुसरी अपूर्ण. आजवर कित्येक पोलिटिकल सिनेमे आपण बघितले आहेत. जब्बार पटेल यांच्या सिंहासन पासून विवेक अग्निहोत्रीच्या ताशकंत फाइल्स पर्यंत अशा वेगवेगळ्या फिल्म्स आपण बघितल्या आणि पसंत केल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण याच काही राजकीय मतभेदामुळे किंवा इतर काही कारणांमुळे कित्येक चित्रपटांना बॅनचा सामना करावा लागला आहे. जेव्हा एखाद्या सिनेमात राजकीय, धार्मिक गोष्टींवर भाष्य होतं तेव्हा ती कलाकृति वादाच्या भोवऱ्यात अडकतेच हे विधीलिखित आहे.

शेखर कपूरचा बॅंडिट क्वीन, अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे, शाहरुखचा माय नेम इज खान किंवा भन्साळीचा पद्मावत अशा बऱ्याच फिल्म्सना या सगळ्याचा सामना करावा लागला होता. पण हे काही नवीन नाही!

 

banned movies inmarathi

हे ही वाचा संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका, मनावर वाईट संस्कार होतील…

याआधीही चक्क आणीबाणीच्या काळातच खुद्द इंदिरा गांधी सरकारने एका बड्या सिनेमावर बंदी आणली होती, ही बंदी येऊनही नंतर तो सिनेमा वादाच्या भोवऱ्यातून बाहेर आला, लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि आज भरतातील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं.

तो सिनेमा म्हणजे संजीव कुमार सूचित्रा सेन यांच्या अभिनयाने समृद्ध असा गुलजार यांचा आंधी. या सिनेमाचं नाव समोर येताच पहिले आठवतात ती यातली गाणी!

किशोर कुमार, लता मंगेशकर, आणि पंचमदा यांचं सदाबहार संगीताने नटलेला आंधी हा पोलिटिकल ड्रामा जरी असला तरी त्याला संगीताचा एक वेगळाच टच पंचम यांनी दिला होता!

 

aandhi inmarathi

 

इस मोड से जाते है, तुम आ गये हो, तेरे बिना जिंदगीसे कोई ही गाणी आजही लोकांना तोंडपाठ आहेत. आजच्या पिढीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ही गाणी हमखास आढळतील!

इतका बहारदार सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला तरी कसा?

२६ जून १९७५ हा दिवस भारतीय राजकारणातला काळा दिवस मानला जातो. याच दिवशी आकाशवाणीवरुण तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली होती.

पण फक्त हीच एक कटू आठवण लोकांच्या स्मरणात नव्हती कारण काही महिन्यांपूर्वी १३ फेब्रुवारी १९७५ रोजी गुलजार यांचा आंधी प्रदर्शित झाला होता!

पण चक्क रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनी या चित्रपटावर इंदिरा गांधी यांनी बंदी आणली होती. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतला असल्याच्या अफवा बाहेर पसरल्या होत्या आणि हे ऐकताच कॉँग्रेस सरकारने हा चित्रपट डब्बाबंद करायचे सगळे प्रयत्न केले!

या अफवा एवढ्या दूरवर पसरल्या की आंधी प्रदर्शित होणार त्याच्या दरम्यान दक्षिण भारतात मोठमोठी पोस्टर्स लागली त्यावर लिहिलं होतं “आपल्या प्रधानमंत्रीला मोठ्या पडद्यावर बघा”!

 

schitra sen inmarathi

 

कॉँग्रेसच्या सदस्यांना याची चिंता होती की एका क्षुल्लक सिनेमामुळे इंदिराजी यांची प्रतिमा मलिन व्हायला नको. दरम्यान या सगळ्या गोष्टी इंदिराजी यांच्या कानावर गेल्या होत्या!

त्यावेळेस त्यांनी स्वतः तो सिनेमा नाही पाहिला पण आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन ती फिल्म बघून या आणि लोकांना दाखवण्यालायक ती आहे की नाही याबद्दल मला सांगा.

हे ही वाचा इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”

जेव्हा ते २ अधिकारी आंधी बघून आले तेव्हा तर त्यांना त्यात काहीच गैर वाटलं नाही उलट त्यांनी सिनेमाचं फार कौतुकच केलं!

खरंतर हे सगळं तेव्हाच स्पष्ट झालेलं जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलजार यांनी स्वतः एका ठिकाणी नमूद केलं होतं की या सिनेमातली मुख्य नायिका आणि इंदिरा गांधी यांच्यात काहीच साम्य नाही, हे पूर्णपणे काल्पनिक पात्र आहे!

 

old gulzar inmarathi

 

बघायला गेलं तर या सिनेमातलं मुख्य नायिकेचं पात्र, त्याचा पेहराव, केसांची ठेवण हे सगळंच इंदिरा गांधींशी मिळतं-जुळतं होतं तरीही याला एक काल्पनिक पात्र म्हणवून सिनेमाच्या मेकर्सनी बगल दिली.

स्पष्टीकरण देऊनही सिनेमावर बंदी का आणली?

आंधी हा बहुतेक असा एकमेव चित्रपट असेल जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी त्याच्यावर बंदी आणली गेली, तोवर देशातल्या बहुतेक लोकांनी हा सिनेमा पाहिला होता.

पण या चित्रपटावर बंदी यायचं निमित्त ठरलं ते गुजरातच्या विधानसभा निवडणूका. या सिनेमात सूचित्रा सेन यांच्या पात्राला काही सीन्समध्ये सिगरेट ओढताना किंवा दारू पिताना दाखवले आहे आणि याच सीन्सचा वापर करून  गुजरातच्या विरोधीपक्षांनी इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न पुन्हा सुरू केला.

वास्तव आणि कल्पना यातली पुसटशी रेषा आणखीनच पुसट होत गेली आणि यामुळे गैरसमज वाढू नयेत म्हणून इंदिरा गांधी यांनी या सिनेमावर बंदी आणायचा निर्णय घेतला!

 

aandhi scene inmarathi

 

जेव्हा हा निर्णय घेतला गेला तेव्हा गुलजार मॉस्को इथल्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेले होते जिथे आंधी दाखवला जाणार होता, पण चित्रपटावर आलेल्या बंदीमुळे फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला गेला नाही!

सिनेमाच्या निर्मात्यांनी बंदी उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण हातात काहीच नाही आले!

अखेर गुलजार यांनी सिनेमातले ते सिगरेट आणि दारू पिण्याचे प्रसंगच काढून टाकण्यात आले आणि त्याजागी सूचित्रा सेन इंदिरा गांधीच्या फोटोसमोर उभी असून त्यांनाच स्वतःचे प्रेरणास्थान मानते अशा आशयाचा एक प्रसंग घेण्यात आला.

 

indira gandhi 2 inmarathi

 

कालांतराने आणीबाणी रद्द झाली, जनतादलचं सरकार आलं आणि या सरकारने आंधी वरची बंदी उठवली, आणि एवढंच नाही तर संपूर्ण सिनेमाचं टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रसारण केलं!

असं म्हंटलं जातं की साहित्य क्षेत्रातले नावाजलेले लेखक कमलेश्वर यांच्या ‘काली आंधी’ या पुस्तकावरच गुलजार यांचा आंधी बेतलेला होता, पण खुद्द गुलजार यांनीच या गोष्टी चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.

आजही आंधी तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल, पण रिलीज होऊनसुद्धा काही काळ बॅन सहन करणाऱ्या या सिनेमाला नंतर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं, गुलजार हे नाव आणखीन अदबीने घेतलं जाऊ लागलं!

हे ही वाचा ‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास!

aandhi inmarathi 2

 

सूचित्रा सेन सारख्या अभिनेत्रीला तिची ओळख निर्माण करून देण्यात या सिनेमाचा सिंहाचा वाटा होता. संजीव कुमार यांचा अभिनय आणि आरडी बर्मन यांचं संगीत आजही एक वेगळंच समाधान देतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?