' म्युकरमायकोसिस आणि कांद्यावरील काळी बुरशी, यांचा थेट संबंध आहे का? जाणून घ्या

म्युकरमायकोसिस आणि कांद्यावरील काळी बुरशी, यांचा थेट संबंध आहे का? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बघता बघता कोरोनाची दुसरी लाट कमी होत चालली आहे, गेल्या महिन्यात होणाऱ्या रुग्णवाढीपेक्षा या महिन्यात  रुग्णसंख्या नक्कीच कमी होत चालली आहे, तरी कालच मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह येऊन जनतेला खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे, आणि निर्बंध थोडे शिथिल करू असे आश्वासन दिले आहे.

काही दिवसातच आता पावसाळा सुरू होईल,  महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आधीच वरुणराजने आपली कृपा दाखवली आहे, आजकाल पाऊसदेखील कोणत्याही ऋतूमध्ये पडत असल्याने त्याचेसुद्धा विशेष असे काही वाटत नाही.

 

corona weakness inmarathi

 

पावसाळा आला की त्याबरोबरीने येणारे आजार आहेतच, आधीच लोक कोरोनामुळे बेजार झाले आहेत त्यातच आता पावसाळा आल्याने आपण सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते, आधीच काळी, पांढरी बुरशी थैमान घालत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – 

===

 

 

onion inmarathi

 

कोणतंही संकट आलं आणि गेलं तरी त्याचे पडसाद अनेक काळापर्यंत राहतात. कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी देशासमोर सध्या गहन संकट आहे ते म्हणजे ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिस.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक संदेश फिरत होता तो असा की ‘घरगुती बुरशीपासून सावधान, कांद्यावरील आणि फ्रिजमधील आतल्या बाजूस असणाऱ्या रबरावरील काळी बुरशी, जेवणामार्फत तुमच्या शरीरात जाऊ शकते’.

मेसेजची सत्यता किती?

अनेक मोठ्या आरोग्य संस्थांनी या मेसेजमधील संदेश संपूर्णपणे खोटा आहे, असे त्यांनी सांगितले. फ्रिजमधील काळी बुरशी आणि म्युकरमायकोसिस हे पूर्णपणे वेगळे आहेत.

 

myukar inmarathi

 

युनाइटेड स्टेट्स ऑफ ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटच्या मते,’ कांदयावर असणारा काळा रंग हा जमिनीवरील असणाऱ्या बुरशीच्या संपर्कात आल्याने तसा रंग येतो’. या प्रकारच्या बुरशीचा क्वचितच त्रास होतो. त्यामुळे असा कांदा वापरायच्या आधी स्वछ धुवून घ्यावा.

 

हे ही वाचा – 

===

 

म्युकरमायकोसिस नेमका कशाने होतो?

एम्स संस्थेचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांचे असे म्हणणे आहे की, ‘म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी नव्हे, शरीरातील रक्त प्रवाहाच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग काळा पडत जातो’, ते पुढे असे ही म्हणाले, हा आजार प्रामुख्याने ज्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर स्टेरॉइड्सचे सेवन करतात. तसेच ज्या व्यक्तींना डायबेटीस असतो त्या व्यक्तींना हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.

 

steroids-inmarathi

हे ही वाचा – ही १२ लक्षणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते, नक्की वाचा आणि मात करा!

आज दिवसेंदिवस या रोगाची रुग्ण संख्या फक्त राज्यात नव्हे तर देशात सुद्धा वाढत आहे. ‘या रोगावरचे उपचार अत्यंत महाग असल्याने सध्यातरी आपल्याकडे यावर मोफत उपचार दिले जातील’, असे महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आज सोशल मीडिया इतके सक्रिय झाल्याने कोणतीही छोट्यातली छोटी गोष्ट अनेक लोकांपर्यंत पोहचते, मग ती चुकीची असो किंवा बरोबर असो, यावर नंतर चर्चा केली जाते.

आधीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकजण उध्वस्त झाले आहेत. त्यात सध्या चर्चा चालू आहे ती तिसऱ्या लाटेची जिचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो लहान मुलांना, त्यामुळे पालक आधीच सतर्क झाले आहेत.

सोशल मीडियावरील येणारे जोक्स जसे सर्रास फॉरवर्ड केले जातात तसेच आरोग्याच्या बाबतीतले मेसेजेस फॉरवर्ड केले जातात त्यामुळे लोकांनी व्हाट्सअँप वर आले म्हणजे ते खरे आहे असे न मानता सर्व बाजुंनी त्या मेसेजेचा विचार करून, तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?