' झिंकची कमतरता असणं सुद्धा आहे धोकादायक... हे १० पदार्थ खा आणि बिनधास्त रहा

झिंकची कमतरता असणं सुद्धा आहे धोकादायक… हे १० पदार्थ खा आणि बिनधास्त रहा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोनाची एन्ट्री होण्याआधी आपल्यापैकी खूप कमी जणांना शरीरासाठी झिंक किती आवश्यक आहे हे माहित असेल. मात्र कोरोनाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि सर्वांना काहीशा कमी ओळख असलेल्या आणि तरीही आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची माहिती झाली.

यातलेच एक महत्वाचा घटक म्हणजे ‘झिंक’. उत्तम आरोग्यासाठी, शरीराची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी शरीराला विविध प्रकारची आवश्यक आणि महत्वाचे पोषक घटक मिळणे खूप गरजेचे असते. आयर्न आणि कॅल्शिअमसोबतच आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी इतरही अनेक पोषकतत्वे गरजेची असतात.

 

zinc inmarathi

 

झिंक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, उत्तम त्वचेसाठी, जखमा लवकर भरून येण्यासाठी झिंक खूप मदत करते. सध्याच्या काळात शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी लोक अनेक महागडी औषधं घेत आहेत, मात्र आपल्या रोजच्या आहारात थोडा बदल केला, तर नैसर्गक पद्धतीने तुमच्या शरीरात झिंकचा समतोल राखला जाईल.

चला तर जाणून घ्या कोणत्या पदार्थांमधून आपल्या शरीराची झिंकची गरज भरून निघण्यास मदत होईल.

==

हे ही वाचा : हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील

==

अंड्याचा पिवळा बलक

अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये मोठ्या प्रमाणावर कोलेस्ट्रॉल असल्याने सामान्यतः हा बलक खाण्यास मनाई केली जाते. मात्र आपल्या शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी हा बलक खूप उपयुक्त आहे. अंड्याच्या पिवळ्या भागात कॅल्शिअम, आयर्न, फॉस्फोरस, थायमिन, व्हिटॅमिन बी६, फोलेट, व्हिटॅमिन बी १२ आणि पॅथोनिक अॅसिड असते.

 

zinc 1 inmarathi

 

शेंगदाणे

शेंगदाणे झिंकचा उत्तम आणि महत्वाचा स्रोत आहे. शेंगदाण्यामध्ये झिंकचे प्रमाणात जास्त असते. यासोबतच शेंगदाण्यांमध्ये आयर्न, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अॅसिड आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असते. शेंगदाण्यांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी असते.

 

zinc 3 inmarathi

 

काजू

काजू हा झिंकचा नैसर्गिक स्रोत आहे. काजूमध्ये व्हिटॅमिन ए, के, तांबे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. हे हेल्दी केलोस्ट्रॉल वाढवते. यामुळे हृदयाच्या समस्या रोखण्यासही मदत होते.

 

 

जांभूळ

जांभळामध्ये झिंक मोठ्या प्रमाणावर असते. सोबतच ब्लूबेरी आणि रासबेरीमध्ये सुद्धा झिंक असते. त्यामुळे या फळांचे सेवन झिंक वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.

 

jambhul inmarathi

==

हे ही वाचा : आरोग्याला अत्यावश्यक ‘व्हिटॅमिन डी’ कोवळ्या उन्हाशिवायही मिळू शकतं, हे वाचा

==

दही

दह्यामुळे आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. यात जस्त देखील चांगल्या प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन डी असते. हे आपले हाडे मजबूत करण्यास मदत करतात. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही उत्तम राहते.

 

zinc 6 inmarathi

 

ओट्स

भरपूर लोकं सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खातात. ओट्समध्ये देखील झिंकचे प्रमाण जास्त असते. सोबतच ओट्स फाइबर, बीटा-ग्लूकन, विटामिन बी ६ आणि फोलेट्स यांचा सुद्धा उत्तम स्रोत आहे.

 

zinc 7 inmarathi

 

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. ब्रोकोली खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते. या कोरोनाच्या काळात ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

 

zinc 8 inmarathi

 

लसूण

लसूणमध्येही झिंक मोठ्या स्वरूपात असते. रोज लसणाची एक कळी खाल्ली तर शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी, आयोडीन, आयर्न, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांसारखी पोषक तत्वेही देखील मिळतील.

 

garlic inmarathi

 

रेड मीट

झिंकचा सर्वात मोठा स्रोत, म्हणून रेड मीटचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या रेड मिटमध्ये बी १२ देखील जास्त असते. १०० ग्रॅम मीटमध्ये ४.८ मिलिग्रॅम झिंक असते. मीट हे हृदयासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

 

zinc 10 inmarathi

 

पालक

पालकात पुष्कळ पोषक घटक असतात. त्यात सी आणि इतर अनेक अँटिऑक्सिडेंट्स आणि बीटा कॅरोटीन असतात. ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पालक आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.

 

zinc 11 inmarathi

===

हे ही वाचा : कोरोनामुक्त झाल्यावरही येणाऱ्या ‘अशक्तपणावर’ मात करण्याचे ७ सोप्पे घरगुती उपाय!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?