' इतिहासाच्या पानांतून वगळली गेलेली, झाशीच्या राणीचे प्राण वाचवणारी अज्ञात विरांगना!

इतिहासाच्या पानांतून वगळली गेलेली, झाशीच्या राणीचे प्राण वाचवणारी अज्ञात विरांगना!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी…” लहान पणापासून हि कविता ऐकत आपण मोठे झालो. झाशीची राणी अत्यंत शूरवीर वाघीण होती, जीने तान्ह्या बाळाला पाठीवर घेऊन १८५७ च्या बंडात सहभाग घेतला होता व शेवटपर्यंत “मेरी झाँसी नही दूँगी” म्हणत इंग्रजांना कितीतरी वेळा मात दिली होती.

पण एकटी स्त्री संपूर्ण राज्यकारभार कसा चालवत असेल? तिच्या सैन्यात, कचेरीत मदत करून कोणी कोणी तिला हातभार लावला ह्याबद्दल आपल्याला फारसं ठाऊक नाही.

 

jhaansi ki rani inmarathi

 

राज्य चालवणं काही सोपं नसतं. कोणत्याही राजाच्या पाठीमागे एक भरभक्कम यंत्रणा असते. गुप्तहेर विभाग, वित्त विभाग, अन्न धान्य विभाग, इत्यादी. पण राज्याच्या मुख्य राजाची सुरक्षा अत्यंत महत्वाची असते.

हे ही वाचा या एकाच इंग्रजाने राणी लक्ष्मीबाईला “प्रत्यक्ष” बघितले होते

राजावर कोणतं संकट आलं तर राज्याची जबाबदारी कोणी घ्यावी, परकीय आक्रमणांनी जोर धरणे, राज्य विस्कळीत होणे असे अनेक प्रसंग घडू शकतात. म्हणूनच राजाच्या सुरक्षेसाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जात असतो. मुख्य लढाईतसुद्धा बहुतेक वेळा राजा कधीच उतरत नाही, अगदी एकही पार्याय नसला तर उतरतो.

कधी कधी कुटनीती म्हणून, राजा ऐवजी त्याचं प्रतिरूप, किंवा अपल्याभाषेत म्हटलं तर “डमी” यांना सुद्धा धाडण्यात येतं.

राणी लक्ष्मीबाईंच्या सुरक्षेसाठी सुद्धा हे सगळे पर्याय अवलंबले जात होते. त्यांचं एक प्रतिरूप सुद्धा होतं. जे कधीही जगासमोर आलं नाही, इतिहासाच्या पानातच कुठे तरी हरवून गेलं.

आज आपण त्याच शूर स्त्री बद्दल जाणून घेणार आहोत, जीने अनेकवेळा राणीच्या जागेवर उपस्थिती लावून लक्ष्मीबाई सुरक्षित राहतील याची काळजी घेतली आहे. त्या विरांगनेचं नाव होतं “झलकारी बाई”. कवि मैथिलीशरण गुप्त झलकारी विषयी म्हणतात की –

 

jhalkari bai inmarathi

 

“जा कर रण में ललकारी थी, वह तो झाँसी की झलकारी थी।
गोरों से लड़ना सिखा गई, है इतिहास में झलक रही,
वह भारत की ही नारी थी।”

राजाचं प्रतिरूप असणे हा शत्रूला भ्रमात पाडण्याचा एक मार्ग होता. कुटनीतीचा भाग म्हणून, पूर्वीचे राजे महाराजे, इतकंच काय हिटलरने सुद्धा या पद्धतीचा अवलंब केला होता.

झलकारीबाई झाशीच्या राणीच्या प्रतिरुपाची महत्वाची भूमिका पार पाडत असत. दिसायला बोलायला हुबेहुब लक्ष्मीबाईंसारख्या, लढाईत त्यांच्याच प्रमाणे पारंगत, रणात चंडीचा अवतार असलेल्या झलकारी बाईंचा जन्म उत्तरप्रदेशात झाशी जवळील, भोजला नामक छोट्याश्या खेड्यात २२ नोव्हेंम्बर १८३० रोजी, एका कोळी परिवारात झाला.

लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांनी लहानश्या झलकारीला मुली सारखं नाजूक पद्धतीने न वाढवता, एका शूरविरासारखं वाढवलं. तलवार बाजी, घोडेस्वारी, धनुष्यविद्या ह्याचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी झलकारीला दिलं.

याचं फळ असं की, एकदा रानात गाई, बकऱ्या चरायला नेलेल्या असताना त्यांच्यावर एका वाघाने हल्ला केला. झलकारीने एकटीनेच आपल्या कुऱ्हाडीने वार करून मोठ्या वाघाचा फडशा पडला.

एकदा गावातील एका श्रीमंत व्यक्तीला वाटेत दरोडेखोर लुटत होते, त्यावेळी झलकारीने आपल्या शौर्यानेच त्यांना पळवून लावलं होतं. इतकी शूर होती झलकारी.

 

jhalkari bai 2 inmarathi

 

पुढे, लक्ष्मीबाईंच्या सैन्यातील एक अत्यंत शूर सैनिक, “पूरन” शी तिची लग्नगाठ बांधली गेली व झलकारी भोजला सोडून, पुढे आपल्या होणाऱ्या कर्मभूमीत, म्हणजेच झाशीला आली.

झाशीची एक प्रथा होती, गौरी पूजनाच्या वेळी गावातील सगळ्या स्त्रिया महालात येत आणि राणीला मानवंदना देत. ह्याच वेळेस राणी त्यांना देशभक्तीचं बाळकडू देऊन, आपल्या मातृभूमीच्या ऋणाबद्दल सांगत असे.

लग्नानंतर, झलकारी सुद्धा आपल्या सगळ्या मैत्रिणींबरोबर राणीला भेटायला गेली. तिथे, तिला पाहून राणीने तिच्यातील योध्याला ओळखलं. ते म्हणतात ना, एक जोहरीच खऱ्या हिऱ्याची पारख करू शकतो, तसंच, राणीने आता हिऱ्याची पारख केली होती.

हे ही वाचा पोर्तुगीजांचे सैन्य…लढाईत फितूर पती; संकटांवर मात करणाऱ्या या राणीच्या शौर्याला सलाम हवाच

तात्काळ राणी लक्ष्मीबाईंनी झलकारीचा आपल्या महिलांच्या “दुर्गा सेनेत” समावेश करून घेतला आणि झलकारीला आपल्या शौर्याचा मातृभूमीसाठी योग्य पद्धतीने वापर करून घेण्याची एक सुवर्ण संधीच प्राप्त झाली.

 

rani laxmibai inmarathi

 

झलकारीला प्रशिक्षण दिलं गेलं, तिला येत असलेल्या सगळ्या युद्ध कलांमध्ये ती आणखीन पारंगत झाली. झलकारी प्रत्येक मोहिमेत राणीच्या खांद्याला खांदा लावून लढत असे.

तिचं शौर्य, बुद्धी कौशल्य, तत्परता व प्रसंगावधान पाहून तिची दुर्गासेनेची सेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

२३ मार्च १८५८ साली, जनरल ह्यूरोज ने आपल्या विशाल सेने समवेत झाशीवर चढाई केली. त्यावेळी राणी झाशीत अडकून पडली. राज्याच्या रक्षणासाठी राणीचे प्राण वाचवणं आणि इतक्या अवाढव्य सैन्याशी लढायला आपलं सैन्य बळ वाढवणं आवश्यक होतं.

संपूर्ण सेना जीव ओतून लढत होती, पण राणीचे प्राण वाचवणं आवश्यक होतं. त्यावेळी झलकारी स्वतः राणीचा वेष धारण करून इंग्रजांशी झुंझ द्यायला सरसावली.

“मीच झाशीची राणी आहे, राणी स्वतः तुमच्याशी युद्ध करायला पुढे आली आहे” इंग्रजांना ह्या भ्रमात पाडून तिने राणीला थोडा वेळ प्राप्त करून दिला.

बुंदेलखंडी आख्यायिकेनुसार राणीचा वेष धारण करून, झलकारी स्वतः ब्रिटिशांच्या गोटात शिरली आणि त्वेषाने ओरडून म्हणाली “मला तुमच्या जनरल ह्युरोजला भेटायचं आहे, त्याला बाहेर बोलवा”.

 

jhalkari against british inmarathi

 

आता फक्त सैन्यच आणि झाशीच नाही, तर झाशीची राणी सुद्धा आपल्या तावडीत सापडली आहे, इंग्रजी सैन्याला व त्यांच्या जनरलचा गैरसमज झाला व तो गाफील राहिला. इकडे खरी राणी सुरक्षितपणे बाहेर निघून गेली व मदती गोळा करू लागली.

झलकारीलाच राणी समजत असलेल्या जनरल ह्युरोजने तिला प्रश्न विचारला “कि आता तुझ्यासोबत काय करायला हवं?” तर झलकारी म्हणाली “मला फाशी द्या पण मी इंग्रजांशी सौदा करणार नाही.”

जनरल ह्युरोज राणीचं म्हणजेच झलकारीचं शौर्य आणि साहस पाहून म्हणाला “भारतातील एक टक्के महिला जरी तुझ्या सारख्या शूर, स्वाभिमानी, देशप्रेमी असल्या तर इंग्रजांना लवकरच भारत सोडून पलायन करावे लागेल.”

काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, पुढे युद्धाच्या वेळी झलकारीचं सत्य समोर आलेलं असूनही तिला युद्धानंतर सोडून देण्यात आलं आणि १८९० साली तिचा मृत्यू झाला. पण काही इतिहासकार म्हणतात की युद्धातच ४ एप्रिल १८५८ सालीच झालकारीला वीरगती प्राप्त झाली.

 

jhalkari bai featured inmarathi

 

इतक्या शूर-विर, स्वामिभक्त, निष्ठावान झलकारीचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही हे पाहून आपल्याला खंत वाटायला हवी.

ज्यांच्याविषयी आपल्या तरुण पिढीला शिक्षण द्यायची गरज आहे, असे शूर- विरच इतिहासाच्या पानांतून वगळले गेले आहेत, ह्यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं?

===

हे ही वाचा या राणीने पोर्तुगीज सैन्याला धूळ चारली होती, कोण होती ही वीरांगना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?