' २ बड्या अभिनेत्यांना डावलून दीपक तिजोरीला मिळाला या कल्ट क्लासिक सिनेमात रोल! – InMarathi

२ बड्या अभिनेत्यांना डावलून दीपक तिजोरीला मिळाला या कल्ट क्लासिक सिनेमात रोल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याकडे स्पोर्ट्स ड्रामा म्हटलं सगळ्यांना आठवतो आशुतोष गोवारीकरचा रेकॉर्ड ब्रेकिंग लगान, त्यानंतर आलेला शाहरुखचा चक दे इंडिया, नंतर सलमानचा सुलतान, प्रियंकाच्या मेरी कोम पासून आमिरच्या दंगलपर्यंत!

हे सगळे सिनेमे आणि त्यांचं कथानक एका विशिष्ट खेळाच्या भोवती रचलेलं होतं. प्रत्येक सिनेमाने भारतीय प्रेक्षकांवर छाप पाडली, पण तुम्हाला माहीत आहे का की ९० च्या दशकात आणखीन एक स्पोर्ट्स ड्रामा फिल्म रिलीज झाली होती जिला आज लोकं कल्ट क्लासिक मानतात.

या सिनेमाने त्या वेळच्या प्रेक्षकांना एक वेगळाच प्रयोग करून दाखवला जो तेव्हा तितका यशस्वी नाही झाला पण जसजसा काळ पुढे सरकत गेला, तशी या सिनेमाची क्रेझ वाढतच गेली.

 

jo jeeta wohi sikander inmarathi

 

हा सिनेमा म्हणजे मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जिता वही सिकंदर’. आमीर खान, पूजा बेदी, आयेशा झुलका, दीपक तिजोरी, कुलभूषण खरबंदा अशा कलाकारांनी समृद्ध अशा या सिनेमाला आता क्लासिक सिनेमाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

हे ही वाचा सलमानचा मनस्ताप, करिष्मा-रविनाची खुन्नस; पडद्यामागील “खरा” अंदाज अपना अपना!

हा सिनेमा वेगळा का?

१९९२ साली या सिनेमाने फिल्म मेकिंगचे बरेच नियम मोडीत काढले. थरारक सायकल रेसपासून सुरुवात होणाऱ्या या सिनेमात हीरो नाही तर चक्क निगेटिव्ह पात्र रेस जिंकतं, यामुळेच हा सिनेमा वेगळा ठरतो.

हॉलीवूडच्या ब्रेकिंग अवे या सिनेमावरून प्रेरित जरी असला तरी या सिनेमातली लव्ह स्टोरी आणि तिचं सादरीकरण बघता हा सिनेमा का वेगळा आहे याची जाणीव होते!

 

breaking away inmarathi

 

‘ जो जिता..’ ही फिल्म मन्सूर खान यांची पहिली फिल्म ठरली असती पण त्याआधी आमीरला लॉंच करायचं म्हणून नासिर हुसेन यांनी आमीर जुहीच्या ‘कयामत से कयामत तक’ची जबाबदारी मन्सूर खान यांच्यावर टाकली आणि या फिल्ममुळे आमीर आणि जुही रातोरात स्टार झाले.

फराह खान बनली कोरिओग्राफर

या सिनेमासाठी फराह खान पहिले सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. पण एकंदरच सगळी आर्थिक गणितं विस्कळीत होऊ लागल्याने फराह खानवर कोरिओग्राफीची जवाबदारी सोपवण्यात आली.

 

farah khan inmarathi

 

आजही कित्येकांच्या फेवरेट ‘पेहला नशा’ या गाण्याची कोरिओग्राफी फराहनेच केली आणि पुढे तिचा एक कोरिओग्राफर म्हणून प्रवास सुरू झाला ज्याला कधीच ब्रेक लागला नाही. या सिनेमाने फराहमध्ये दडलेली कोरिओग्राफर लोकांसमोर आणली!

 सुप्रसिद्ध अभिनेत्री नगमाने हा सिनेमा नाकारला

चित्रपटातलं देविका या कॉलेजवयीन मुलीची भूमिका पूजा बेदीने साकारली. तिच्याआधी हा रोल सुप्रसिद्ध अभिनेत्री नगमा हिला देण्यात आला होता. पण देविका हे पात्र एक ‘Gold- digger’ म्हणजेच पैशाच्या मागे धावणारं आहे हे कळल्याने नगमाच्या आईने हा रोल करण्यास तिला मनाई केली.

 

nagma inmarathi

 

नंतर हा रोल पूजा बेदीला मिळाला आणि आयेशा झुलकाच्या भूमिकेइतकंच या भूमिकेवरसुद्धा लोकांनी भरभरून प्रेम केलं!

अमोल गुप्तेनेदेखील केलंय या सिनेमात काम

तारे जमीन पर सारखा संवेदनशील सिनेमा देणारे अमोल गुप्ते आणि आमीर खान यांचे फार जून संबंध आहेत. कॉलेजच्या वार्षिक खेळाच्या समारंभात सायकल रेसच्या वेळेस लाईव्ह कॉमेंट्री देणारे दुसरे तिसरे कुणी नसून अमोल गुप्तेच आहेत!

 

amol gupte inmarathi

मिलिंद सोमणने सिनेमा सोडला, अक्षय कुमारला रिजेक्ट केलं शेवटी वर्णी लागली दीपक तिजोरीची :

या सिनेमातलं निगेटिव्ह पात्र म्हणजे विकी मल्होत्रा, या भूमिकेसाठी दीपक तिजोरी ही पहिली निवड नसून हॅंडसम हंक मिलिंद सोमणला ही भूमिका देण्यात आली होती.

त्याआधी बॉलीवूडच्या खिलाडी अक्षय कुमारनेसुद्धा याच भूमिकेसाठी ऑडिशन दिली, पण त्याला रिजेक्ट करण्यात आलं. मिलिंद सोमणने काही भाग शूट केला पण त्यानंतर त्याने ही फिल्म सोडली आणि मग त्याजागी दीपक तिजोरीची वर्णी लागली.

 

milind soman inmarathi

 

आजही कित्येक जण हा सिनेमा टीव्हीवर लागलेला दिसला की टीव्हीसमोरून हलत देखील नाहीत. जतिन ललित यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही कित्येकांच्या ओठांवर आहेत.

आमीरचा बंडखोरपणा आणि नंतर झालेली जबाबदारीची जाणीव हे प्रसंग ज्यापद्धतीने चित्रित केले आहेत ते बघताना आजही आपण स्तब्ध होतो. या चित्रपटातली कॉलेजेसमधलं वैर बघून आपल्याला आपले कॉलेजचे दिवस आठवतात.

हे ही वाचा वडिलांचा विरोध पत्करून चोरून चित्रपट पाहणारा मुलगा ते बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट….!

पेहला नशा या गाण्याची सुरुवात ऐकताच आपले पाय आपसूकच त्या तालावर थिरकायला लागतात.

 

aamir khan inmarathi

 

ती शेवटची सायकल रेस, ते आयत्या वेळेला गियर बदलून आमीरचं जिंकणं आणि कुलभूषण खरबंदा यांच्या तोंडून ‘जो जिता वही सिकंदर’ हे ऐकताना आजही आपण सगळेच भावुक होतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?