' नियमितपणे कान साफ करताय? मग थोडं सांभाळून!? यामागचे धोके माहित आहेत का? – InMarathi

नियमितपणे कान साफ करताय? मग थोडं सांभाळून!? यामागचे धोके माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत स्वच्छतेचं महत्त्व आणखीच वाढलेलं दिसतंय. अगदी बारीकसारीक गोष्टींमध्ये आपण स्वच्छता राखत आहोत. अर्थात, ही स्वच्छता आपल्यासाठी नवीन आहे का, तर मुळीच नाही.

शरीराची स्वच्छता राखणं गरजेचं आहे, हे आपल्याला अगदी लहानपणापासून सांगितलं आणि शिकवलं जात असतं. अगदी लहानसहान गोष्टींमधून हे संस्कार केले जातात.

अंघोळ केल्याशिवाय देवपूजा न करणं, नाश्ता न करणं, घराबाहेर न पडणं अशा गोष्टी घराघरात सांगितल्या जातात. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा, रात्री झोपण्याआधी दात घासा अशा गोष्टी अनेक घरांमधील पालक आपल्या मुलांना सांगत असतात.

 

washing-hands-inmarathi

 

या स्वच्छतेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे कान स्वच्छ ठेवणं. कानातील मळ साफ करण्याची सवय अनेकांना असते. अंघोळीदरम्यान कान साफ करणे, अंघोळीनंतर बड्सचा वापर करून कानातील मळ काढून टाकणं या गोष्टी अगदी सर्रासपणे केल्या जातात.

एका लहानशा प्लॅस्टिक नळकांडीच्या दोन्ही टोकाला कापूस असलेले इअर बड्स नसलेलं घर शोधून सापडणं कठीण… पण या बड्सचा किंवा कानकोरणीसारख्या कुठल्याही गोष्टींचा वापर आपण योग्यपद्धतीने करतो का?

 

ear buds inmarathi

 

एवढंच नाही, तर काही शहरांमध्ये, जिथे लोक सहज गप्पाटप्पा करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी भेटतात अशा सार्वजनिक ठिकाणी कान साफ करून देणारे लोक त्यांची पेटी घेऊन फिरत असलेले सुद्धा तुमच्यापैकी काही जणांनी पाहिले असतील.

ऐकण्याची महत्त्वपूर्ण क्रिया पार पाडणारा कान, त्याची निगा राखली जाणं योग्यच आहे, मात्र ती योग्य पद्धतीने राखली जात का, हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.

चला तर मग, आज जाणून घेऊयात, कान साफ करताना काय काळजी घ्यावी आणि ती न घेतल्यास कुठले धोके उत्पन्न होऊ शकतात…

===

हे ही वाचा – लॅपटॉपवर डोळे रोखण्याचे परिणाम टाळा! आजपासूनच हे घरगुती उपाय कटाक्षाने पाळा!

===

कानातील मळ साफ करण्याची गरज असते का?

कानात तेल घालून किंवा अंघोळ झाल्यावर कान काहीसा ओलसर असतो त्यावेळी कानातील मळ स्वच्छ केला जातो. मात्र, खरंतर असं करणं अत्यंत चुकीचं आहे. होय अगदी बरोबर वाचलंत तुम्ही…

कानाच्या आतील भागातील मळ कधीही स्वच्छ करू नये. केवळ कानाचा दर्शनीय भाग आणि त्यावर साठलेला मळ साफ करणं, इतकीच खबरदारी आपल्याला घ्यावी लागते.

 

ear cleaning right way inmarathi

 

कानाची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, की कानाची स्वच्छता आपोआपच होत असते. कानात इअरवॅक्स तयार होत असतो. याचं काम कानात जाणारी धूळ, जंतू आणि इतर गोष्टींपासून कानाच्या आतील भागाचं रक्षण करणं हे असतं. हा तेलकट पदार्थ जर कानात निर्माण झाला नाही, तर कान खूपच कोरडा राहील. यामुळे कानाला अधिक धोका संभवतो.

कानातील मळ बाहेर कसा पडतो?

आपण कुठलीही गोष्ट खातं ती व्यवस्थित चावत असतो. त्यावेळी होणारी जबड्याची हालचाल, ही कानातील हा तेलकट पदार्थ म्हणजेच इअरवॅक्स कोरडा होऊन बाहेर पडण्यास कारणीभूत ठरते. तो योग्यवेळी कोरड होऊन कानाच्या आतील भागातून बाहेर ढकलला जातो. अशावेळी नव्याने इअरवॅक्स तयार करण्याचे कामही सुरु असते.

हा बाहेर आलेला मळ काढून कान साफ केला, की आपलं कार्य पूर्ण होतं आणि कानाची योग्य निगा राखली जाते. याव्यतिरिक्त इतर काहीही करणं, धोकादायक ठरू शकतं.

 

ear spray inmarathi

 

===

हे ही वाचा – दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात

===

बड्स आणि तेल यांच्या वापरातून संभवतो मोठा धोका

कॅप्सु असणारे बड्स हे केवळ कानाचा दर्शनीय भाग स्वच्छ करण्यासाठी वापरायचे असतात. या बड्सच्या बॉक्सवरील सूचना वाचल्या, तर तुम्हाला लक्षात येईल, की त्याचा वापर कानात फार आतल्या भागात ढकलून करायचा नसतो. आपण मात्र सर्रास अशा गोष्टी करत असतो.

इतकंच नाही, तर कानातील मळ मऊ व्हावा यासाठी कानात तेल घालण्याची सवय सुद्धा अनेकांना असते. ही सवय सुद्धा त्यांत धोकादायक ठरते.

बड्स आणि तेलाचा वापर केल्याने, उलट हा मळ कानात आणखी आत जाण्याचा धोका असतो. ज्यामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊन, ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

इअरवॅक्स नक्की काय काम करतं?

कानात तयार होणारा इअरवॅक्स, हा मेणासारखा तेलकट आणि चिकट पदार्थ असल्याने, त्याला वॅक्स म्हणण्यात येतं. याचं काम कानाच्या आतील बाजूची सुरक्षा हे असतं. हा पदार्थ चिकट असल्याने, त्याला नको असलेल्या गोष्टी चिकटतात आणि कानाच्या आतील भागापासून दूर राहतात.

इअरवॅक्स असण्याचे फायदे

१. कानाची त्वचा कोरडी पडत नाही.

२. बाहेरून कानात जाणारी माती आणि जंतू तिथेच चिकटून राहतात.

३. कानातील मृत त्वचेचे कण वॅक्सला चिकटतात.

४. बॅक्टेरियापासून कानाचे संरक्षण होते.

कान आतून साफ करत राहिल्याने होऊ शकणारे संभाव्य धोके

ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम

कान साफ करण्याच्या प्रयत्नात, कानातील मळ अधिक ढकलला गेल्यास कानाच्या पडद्याला चिकटू शकतो. अत्यंत नाजूक असणाऱ्या कानाच्या पडद्याला यामुळे दुखापत होऊन, ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

 

hearing inmarathi

 

हा त्रास अधिक वाढत गेल्यास ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होण्याची सुद्धा शक्यता असते.

इअरवॅक्सच्या कामात अडथळे

कानात तयार झालेला वॅक्स आपण बाहेर काढला, तर कान गरेजपेक्षा अधिक कोरडा होईल. परिणामी बाहेरून येणारी धूळ आणि इतर घटकांचा थेट कानावर आघात होईल.

===

हे ही वाचा – कोरोनाकाळात प्रसुतीचा धोका नको म्हणून ‘हा’ नवा पर्याय सध्या जोर धरतोय

===

थोडक्यात काय, तर आपण कान साफ करण्याच्या नादात त्याच्या नैसर्गिक क्षमतेवरच आक्रमण करत असतो.

काय मग मंडळी यापुढे कान साफ करत असताना योग्य ती काळजी घेणारा ना? आणि हो, लहान मुलाच्या कानात तेल घालणं किंवा त्यांचे कां साफ करण्यासाठी बड्सचा वापर करणं अगदी कटाक्षाने टाळाच.

कानाची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली ही माहिती तुमच्या ओळखीच्या इतर मंडळींच्या सुद्धा कानावर घाला. म्हणजे, त्यांचाही फायदा होईल. अन्यथा या कानाचा त्या कानाला पत्ता नाही, आणि सवय काही सुटली नाही असं व्हायचं…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?