' तुमचा आहार तुमच्या ब्लड ग्रुपनुसार योग्य आहे ना!? बघा संशोधन काय सांगतं…!! – InMarathi

तुमचा आहार तुमच्या ब्लड ग्रुपनुसार योग्य आहे ना!? बघा संशोधन काय सांगतं…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते. किंबहुना आपल्या आहारावरच आपल्या शरीराची योग्य निगा अवलंबून आहे.

 

diet inmarathi

 

योग्य आहार किंवा आजच्या भाषेत सांगायचे झाले तर योग्य डाएट घेण्यासाठी, त्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी आपण डॉक्टर्स किंवा आहारतज्ञांची मदत घेत असतो. ते आपल्या शरीरातील कमतरतेनुसार, शरीराच्या ठेवणीनुसार अभ्यास करून आपल्याला डाएट देतात.

 

blood grp 2 inmarathi

===

हे ही वाचा : दीक्षित डाएट नव्हे तर चक्क वर्षभर उपाशी राहून वजन कमी करणारा अघोरी माणूस!

===

याच डाएटच्या मदतीने आपण आपले लक्ष गाठण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत असतो. मात्र आता एका संशोधनानुसार आपल्या रक्तगटानुसार देखील आपल्याला आपला डाएट प्लॅन आखता येणार आहे. प्रत्येकाच्या ब्लड ग्रुपवर आधारित हा डाएट प्लॅन आपण घेतल्यास शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळतात.

 

blood grp inmarathi

 

त्यामुळे जर आपण आपल्या ब्लड ग्रुपवर आधारित डाएट घेण्यास सुरुवात केली, तर शरीराला अधिकाधिक फायदा होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चला तर जाणून घ्या तुमच्या ब्लडग्रुपनुसार तुम्हाला कोणता आहार जास्त फायदेशीर ठरू शकतो.

ब्लड ग्रुप – O – आणि O +

या ब्लडग्रुपच्या लोकांना प्रोटीनची जास्त गरज असते. त्यामुळे त्यांना चिकन, मासे, अंडी, बेसन, चणे आदी गोष्टी महत्वाच्या असतात. यासोबतच या लोकांना योग्य व्यायाम आणि शरीराची हालचाल सुद्धा खूपच आवश्यक असते.

या लोकांनी जर जास्त डेअरी प्रोडक्ट खाल्ली, तर त्यांना हाइपोथायरोडिज्मची समस्या उदभवू शकते. या लोकांच्या पोटात अॅसिड खूप असल्याने त्यांना नॉनव्हेज जेवण अगदी सहज पचवता येते. मात्र या लोकांनी मशरूम, स्ट्राबेरी, खरबूज खाणे टाळले पाहिजे.

===

हे ही वाचा : बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!

===

blood grp 3 inmarathi

 

ब्लड ग्रुप  A – आणि A +

या ब्लडग्रुपच्या लोकांनी शाकाहारी जेवण अधिक घेतले पाहिजे. या लोकांनी गहू आणि गव्हाशी संबंधित अधिकाधिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

डाळी, सोया, टोफूचे सेवनदेखील फायदेशीर असते. हे लोक डेअरी प्रोडक्ट नीट पचवू शकत नसल्याने त्यांनी हे पदार्थ व्यर्ज करावे. सोबतच या लोकांनी शेंगदाणा तेल, तीळ तेल, मिरची, मशरूम, पपई, वांगी या वस्तू टाळल्या पाहिजे.

 

 

mushroom inmarathi

ब्लड ग्रुप – B – आणि B +

या लोकांनी समतोल आणि हेल्दी डाएट घेतले पाहिजे. यात ओट्स, ब्राउन राइसचा वापर जास्त केला पाहिजे. या ब्लडग्रुपच्या लोकांना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हींमधून भरपूर प्रोटीन मिळते. या लोकांनी ऑलिव्हच्या तेलात बनवलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.

 

blood grp 6 inmarathi

ब्लड ग्रुप AB

या लोकांनी सी फूड, दही, बकरीचे दूध, अंडी, अक्रोड, ओट्स, कोबी, फ्लॉवर, डाळी आदी गोष्टींचे भरपूर्ण सेवन केले पाहिजे. या लोकांनी जास्त कोलेस्ट्रॉल डाएट, अल्कोहोल सोयाबीन आदी पदार्थ घेणे टाळले पाहिजे.

 

blood grp 7 inmarathi

===

हे ही वाचा : तुमचा किंवा घरातल्या कोणाचाही रक्तगट O-निगेटिव्ह असेल तर मग हे वाचाचं!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?