' इरफान आणि मनोजमधली एक अज्ञात "दौड"... जिच्या कथा आजही चर्चिल्या जातात

इरफान आणि मनोजमधली एक अज्ञात “दौड”… जिच्या कथा आजही चर्चिल्या जातात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे Amazon Prime वर येणाऱ्या द फॅमिलीमॅनच्या दुसऱ्या सीझनची. पहिल्या सीझनला मिळालेला जबरदस्त रिस्पॉन्स बघता सेक्रेड गेम्स आणि मिर्जापुर नंतर हिची टॉपच्या भारतीय वेबसिरिजमध्ये गणना होत आहे.

पहिल्या सीझनमधले काही आक्षेपार्ह प्रसंग वगळता या सिरिजने लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. पण जसं या सिरिजचा दूसरा सीझनची घोषणा झाली तेव्हापासून ही सिरिज रोज वेगवेगळ्या वादाला सामोरी जात आहे.

तांडव या वेबसिरिजवरुन झालेल्या गदारोळानंतर फॅमिलीमॅनच्या मेकर्सनी हा दुसरा सीझन आणखी लांबवला आणि अखेर सगळे अडथळे पार करून ही सिरिज आता जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

family man 2 inmarathi

 

यातल्या सगळ्याच पात्रांची खूप चर्चा झाली. पण सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ते यातलं श्रीकांत तिवारी हे पात्र साकारणाऱ्या मनोज वाजपेयीला. मनोज वाजपेयीची ही सिरिज म्हणजे त्याची सेकंड इनिंगच आहे.

हे ही वाचा “पुढच्याला ठेच मागचा शहाणा!” फॅमिली मॅन २ पुढे का ढकलली जातीये?

फॅमिलीमॅनमधल्या त्याच्या पात्राची खूप चर्चा झाली. या पात्राचा विक्षिप्त स्वभाव, त्याची काम करायची पद्धत त्याचे त्याच्या घरच्यांशी असलेले संबंध या सगळ्याशी लोकं इतके पटकन कनेक्ट झाले की त्यांना ते पात्र आपलंसं वाटायला लागलं.

अर्थात मनोज वाजपेयी आणि त्याचा हा लाजवाब पेरफॉर्मन्स आपल्यासाठी काही नवीन नाही. शूलमधल्या समर प्रताप सिंगपासून गँग्स ऑफ वासेपूरच्या सरदार खान पर्यंत मनोज यांना आपण वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहिलं आहे.

 

manoj bajpeyee inmarathi

 

आज इंडस्ट्रीमध्ये कोणताही आधार नसताना त्याने स्वतःचं एक वलय निर्माण केलं आहे ते भल्याभल्यांना जमलेलं नाही. सत्याच्या भिकु म्हात्रेने तर त्यावेळी कित्येक बॉलीवूड स्टार्सची बोलती बंद केली होती.

हाच सत्यामधला रोल मनोज वाजपेयीला कसा मिळाला? या सगळ्याशी दिवंगत अभिनेता इरफान खानचा काय संबंध? हे सगळं आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!

साधारण १९९५ चा तो काळ असावा. त्यावेळी सिनेइंडस्ट्रीमध्ये स्वतःचा दबदबा असणारे लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे संजय दत्त, उर्मिला, परेश रावल यांना घेऊन दौड सिनेमा करत होते.

बऱ्याचशा लोकांचं कास्टिंग झालं होतं पण परेश रावल यांच्या राइट हँड मॅनचं कास्टिंग अजून बाकी होतं, आणि या रोलसाठी ३ महारथी ऑडिशन द्यायला गेले ते म्हणजे इरफान खान, विनीत कुमार आणि मनोज वाजपेयी!

 

irrfan and manoj inmarathi

 

तेव्हा हे तिघेही इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं बस्तान बसवण्यात गर्क होते, इरफान तरी टेलिव्हिजनवर काम करत होता पण मनोज वाजपेयी यांनी शेखर कपूर यांच्या बॅंडिट क्वीनमध्ये छोटी पण महत्वाची अशी मानसिंगची भूमिका केली होती.

बॅंडिट क्वीनमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना कामं मिळायला सुरुवात झाली होती. सौरभ शुक्ल सिरियल्स करत होते, निर्मल पांडे रातोरात स्टार झाला होता, सीमा बिसवास संजय लीला भन्साळीसोबत काम करत होती, अभिजीत श्रीवास्तवलासुद्धा रोल मिळाला होता.

केवळ मनोज वाजपेयी असा एकमेव अभिनेता होता ज्याला महत्वाची भूमिका करूनही काम मिळत नव्हतं, याचसाठी तो प्रोड्यूसर्स डायरेक्टर्सचे उंबरठे झिजवत राम गोपाल वर्मा यांच्याकडे आला होता.

 

bandit queen role inmarathi

 

इरफान आणि विनीतला बघून त्याच्याही मनात भलतेच प्रश्न निर्माण झाले असतील तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि रामुला भेटायला गेला. सर्वप्रथम पहिल्या भेटीत राम गोपाल वर्मा यांनी मनोजला त्याच्या आधीच्या कामाविषयी विचारलं.

त्यावर मनोजने त्यांना सांगितलं की बॅंडिट क्वीन सिनेमात त्याने मानसिंगचं काम केलं आहे. हे ऐकून रामु उडालाच. रामुने २ वेळा बॅंडिट क्वीन पाहिला होता तरी त्यातलं मानसिंगचं काम मनोज वाजपेयीनी केलं आहे यावर त्याला विश्वासच बसत नव्हता.

मनोजकडून याची खात्री केल्यानंतर रामुने त्याला सांगितलं की तो त्याला गेल्या ४ ते ५ वर्षांपासून शोधतो आहे पण कुणीच त्याला मनोजशी संपर्क करून देत नव्हतं. मनोजचा मानसिंगचा रोल बघून या अभिनेत्यासोबत काम करायचं आहे हे रामुने तेव्हाच ठरवलं होतं.

 

RGV inmarathi

 

आणि जेव्हा खुद्द मनोज त्याच्यासमोर एका छोट्या भूमिकेसाठी काम मागायला आला तेव्हा रामुने त्याला सांगितलं की ती हा रोल करू नकोस, मी तुझ्यासाठी एक वेगळी फिल्म करणार आहे त्यामुळे त्याने हा रोल सोडावा असं रामुने मनोजला सांगितलं!

हे ही वाचा सिनेमाची परिभाषा बदलणारे राम गोपाल वर्मा हे सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये का मागे पडले?

अर्थात इंडस्ट्रीमध्ये अशी प्रॉमिसेस करून ती पाळणारी फार कमी लोकं आहेत हे मनोजला चांगलंच माहीत होतं आणि एकंदरच स्ट्रगल करण्यापेक्षा पोटापाण्याचा विचार करून मनोजने रामुला सांगितलं की मी हा रोल पहिले करेन, आणि तुमची नंतर फिल्मपण करेन. त्यावेळेस दौड सिनेमातल्या त्या छोट्या रोलसाठी ३५००० रुपये मिळणार होते!

मनोजची एकंदर परिस्थिति आणि त्याचा अविश्वास बघता रामुलादेखील राहवलं गेलं नाही. त्याने त्याच्या एका साऊथच्या सिनेमाचं काम थांबवून मनोजला त्याच्या नव्या फिल्मवर काम करण्याचं आश्वासन दिलं आणि चांगले लेखक शोधायल सांगितलं.

अखेर मनोजला राम गोपाल वर्मा यांच्या शब्दावर विश्वास ठेवावाच लागला, त्यानंतर अनुराग कश्यप, सौरभ शूक्ला यांची एंट्री झाली आणि हिंदी सिनेसृष्टीचा माईलस्टोन ठरलेल्या “सत्या”चा जन्म झाला!

 

satya inmarathi

 

गॅंगवॉर आणि अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर बेतलेला सत्या हा एक कल्ट क्लासिक सिनेमा ठरला. या सिनेमाने गॅंगवॉरवर बनणाऱ्या सिनेमाची परिभाषाच बदलून टाकली. राम गोपाल वर्मा हे नाव इंडस्ट्रीत अदबीने घेतलं जाऊ लागलं आणि मनोज बाजपेयीच्या करियरला सॉलिड किक स्टार्ट मिळाली!

आजही मनोज वाजपेयी हे नाव समोर आलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर “मुंबई का किंग कौन भिकु म्हात्रे” हा डायलॉग म्हणणारा भिकु उभा राहतो.

 

bhiku mhatre inmarathi

 

त्या दिवशी मनोजच्या ऐवजी इरफान आधी रामुला भेटला असता तर आपल्याला कदाचित भिकु म्हात्रे गवसला नसता आणि बॉलीवूडच्या या सरदार खानला स्वतःचं स्थान निर्माण करायला कदाचित जास्त काळ लागला असता.

इरफानसोबतची ही ‘दौड’ मनोज वाजपेयीसाठी एक सुवर्णसंधी ठरली आणि इरफानला मागे टाकत मनोजने ही शर्यत जिंकलीदेखील. अर्थात इरफान काय किंवा मनोज काय, हे अत्यंत ताकदीचे नट आहेत, यांचा अभिनय बघायला मिळणं हीच एक पर्वणी असते हे मात्र नक्की!

===

हे ही वाचा बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहूनही स्वबळावर उजळलेला तारा आपल्यालाही प्रेरणा देतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?