' 'प्लॅस्टिक द्या आणि फुकटात जेवण करा'..या पालिकेचा हा अभिनव उपक्रम

‘प्लॅस्टिक द्या आणि फुकटात जेवण करा’..या पालिकेचा हा अभिनव उपक्रम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘जगात फक्त प्लॅस्टिक टिकत’, हा मुळशी पॅटर्न मधील संवाद चांगलाच हिट ठरला. आज जगभरात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत, कोरोनसारखे संकट जगावर आले आहे, काही देश हळू हळू  त्यातून सावरत आहेत. मात्र  काही देश लसीसाठी आणि आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी चाचपडत आहेत.

प्लॅस्टिक समस्या आज जगापुढे एक आव्हान बनून उभी ठाकली आहे, प्लॅस्टिक अशी गोष्ट आहे ज्याचे विघटन होत नाही आणि प्लॅस्टिक जरी जाळले तरी त्यातून होणारे वायू प्रदूषण मानवाच्या आरोग्यास हानिकारक आहे.

 

plastic water bottles InMarathi

हे ही वाचा – प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर ही चुक पुन्हा करण्यापुर्वी हे नक्की वाचा…

आज आपण दुकानात गेलो की दुकानदार कोणतीही वस्तू लगेच प्लॅस्टिकच्या वेष्टनात बांधून देतात. दुकानदारांचा ही नाईलाज असल्याने परिणामी आपल्या वापरात प्लास्टिक येतेच. मानवी आयुष्याचा प्लॅस्टिक भाग बनून गेले आहे.

प्लॅस्टिकमुळे होणारा कचरा प्रामुख्याने शहरी भागात जास्त आढळून येतो, मग अशा ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड तयार होतात, कधी कधी याच ग्राऊंडला आग लागते किंवा मुद्दाम आग लावली जाते. अशा ठिकाणी अनेक लहान मुलांना प्लास्टिक गोळा करण्यासाठी पाठवले जाते जे अत्यंत हानिकारक असते.

 

Plastic-Pollution InMarathi

 

काळानुसार हळू हळू प्लॅस्टिकच्या वापराबद्दल अनेक निर्बंध येत आहेत. अनेक ठिकाणी जितके शक्य असेल तितका प्लॅस्टिकचा वापर कमी करा, असे आवर्जून सांगितले. सरकार देखील यात कटाक्षाने लक्ष देत आहे.

इंदूर शहराला जसा भारतातील पहिल्या स्वच्छ शहराचा मान मिळाला आहे तसा आणखीन एक शहराने स्वछतेच्या बाबतीत एक स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊयात

काय आहे नक्की उपक्रम?

छत्तीसगढ सारख्या राज्याला आदिवासी राज्य म्हणून ओळखले जाते मात्र हे राज्य आता प्रगतीच्या दिशेने पाउले टाकत आहे, नक्षली भाग सोडला तर इतर ठिकाणी बरेच नवनवे प्रकल्प होत आहेत.

याच छत्तीसगडमधील आंबिकापूर नगर पालिकेने प्लॅस्टिक विरोधात चांगलीच कंबर कसली आहे. लोकांवर निर्बंध न टाकता या उपक्रमात लोकांना समाविष्ट  करून प्लॅस्टिकचा नायनाट करता येईल.

 

garbage inmarathi

 

आंबिकापूर पालिकेने एका कॅफे सोबत करार केला आहे, तो करार असा आहे की, जे लोक एक किलो प्लॅस्टिक आणून देतील त्या लोकांना मोफत जेवण दिले जाईल.

एक किलो प्लास्टिक बदल्यात भरपेट जेवण तर अर्धा किलो प्लास्टिकच्या बदल्यात नाश्ता मिळणार.

उपक्रम कशासाठी आणि कोणासाठी:

पर्यावरणाला सर्वात जास्त धोका असणारी गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक, अशा प्लॅस्टिकचा नायनाट करणे, तसेच जे लोक गरीब आहेत आणि  लॉकडाऊन मुळे अनेक मजुरांचे रोजगार गेले आहेत ,जे लोक रोज प्लास्टिक गोळा करतात अशा लोकांसाठी हा उपक्रम सुरु केला आहे.

पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होतात त्यावर तोडगा म्हणून देखील हा उपक्रम सुरु केला आहे.

 

garbage 2 inmarathi

हे ही वाचा – सिमेंट काँक्रिट नव्हे तर चक्क प्लास्टिकचे रस्ते बांधले आहेत ते पण भारतातील या शहरात

जेणेकरून गरीब लोकांना प्लास्टिक गोळा करणाऱ्यांना एक वेळेचे तरी पोटभर जेवण मिळू शकेल आणि प्लास्टिक सुद्धा मोठया प्रमाणवर गोळा केले जाईल, हा त्या मागचा उद्देश आहे.

सरकारचा हातभार :

आज देशातील प्रत्येक राज्यातील सरकार त्यांच्या परीने प्लॅटिक समस्येसाठी योजना राबवत आहेत. छत्तीसगढच्या राज्य सरकराने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन ५ कोटी रुपयांची मदत देखील करण्याचे जाहीर केले आहे.

उपक्रमातून समाजउपयोगी कामे:

आपल्याकडे रस्ते चांगले नाहीत म्हणून ओरड केली जाते, चांगल्या दर्जाचे रस्ते बनवणे हे सुद्धा आपल्याकड़े आव्हानात्मक आहेच. मात्र इथल्या पालिकेने यावर रामबाण उपाय शोधला आहे. पालिकेने गोळा केलेल्या ८ लाख किलो प्लॅस्टिकमधून एक रस्ता देखील बांधला आहे.

 

garbage road inmarathi

 

प्लॅस्टिकचा नुसता रस्ता नसून त्यात असल्फेटचे सुद्धा मिश्रण आहे जेणेकरून रस्ता टिकवू बनेल.

काही वर्षांपूर्वी मदुराई मधील एका शिक्षकाने शहरातील रस्ते चक्क प्लॅस्टिकचे बनवले होते. सिमेंट काँक्रेटच्या भरवशावर न राहता आणि त्याबरोबरीने प्लॅस्टिकचे देखील विघटन होईल, या उद्देशाने ते बांधले होते.

सरकार योजना करेल तेव्हा करेल आपण मात्र आपल्यापासून सुरवात केली पाहिजे. बाजारात जाताना आठवणीने कापडी पिशवी नेली पाहिजे.

जितके शक्य असेल तितके प्लॅस्टिक टाळले पाहिजे, तरच आपण या प्लॅस्टिकरुपी राक्षसाला संपवू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?