' या रेल्वे स्टेशनला नावच नाही...! यामागची कहाणी वाचाच...!

या रेल्वे स्टेशनला नावच नाही…! यामागची कहाणी वाचाच…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘एक सीएसटी द्या, चार फुल्ल कोकणकन्येचे रत्नगिरीपर्यंत  द्या’, अशी वाक्य साधारणतः रेल्वे तिकीट काउंटरवर ऐकू येतात, आज रेल्वेने सुद्धा ऑनलाईन तिकीटाची सोय केल्याने प्रवाशांना तिकिटाच्या रांगेत थांबावे लागत नाही.

आज अनेकजण शक्यतो ट्रेनने प्रवास करतात, रस्त्यावर वाढणारी वाहतूक, ट्रॅफिक जॅम यामुळे लोक नेहमी ट्रेनच्या प्रवासाला प्राधान्य देतात. गणपतीत कोकणात जायला चाकरमानी मे पासूनच बुकिंग करतात अन्यथा नंतर तिकिटे मिळत नाहीत.

कोकणातला रेल्वे प्रवास, तो ही पावसाळ्यातला म्हणजे वेगळीच पर्वणी. पनवेल, रोहा, माणगाव, खेड सारखी स्टेशन गेल्यावर लाल माती दिसायला लागते. बोगद्यातून जाणारी रेल्वे बघितल्यावर, कोकण रेल्वे बांधताना किती कष्ट घ्यावे लागले असतील याची जाणीव नकळत होऊन जाते.

 

kokan inmarathi

हे ही वाचा – रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते, का ते जाणून घ्या..

प्रवास करताना कोणते ठिकाण आले याचा अंदाज तिकडच्या स्टेशनवरील पिवळ्या फलकावर लिहिलेले नाव वाचल्यावर होतो. मात्र भारतातील असं एक स्टेशन आहे ज्याला आजतागायत नाव दिले गेले नाहीये. चला तर मग जाणून घेऊयात या अज्ञात स्थानकाबद्दल…

भारतात रेल्वेचे जाळे विस्तृत आहे अगदी केरळमधला माणूससुद्धा आसामपर्यंत ट्रेनने पोहचू शकतो. ही किमया आहे भारतीय रेल्वेची…!!

रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभर बांधणाऱ्या इंजिनियर्सची. अशा या जाळ्यामध्ये एक स्टेशन बांधले गेले मात्र त्याला नाव देण्यावरून अनेक वाद झाले.

 

rainannagr inmarathi

 

पश्चिम बंगाल मधील बर्धमान जिल्ह्यातील रैना या गावात हे स्टेशन आहे. २००८ पासून हे स्टेशन वापरात तर आले पण नामकरण मात्र अजून झालेले नाही.

 नामकरण का झाले नाही?

गाव तिथे भानगडी असे आपल्याकडे म्हंटले जाते त्याच प्रमाणे बंगाल मध्ये सुद्धा हे लागू पडते. रैना नगर आणि रैना गाव या दोन गावांच्यातील संघर्षामुळे आजपर्यंत स्टेशनची पाटी रिकामी आहे.

असे म्हटले जाते की हा परिसर आधी बांकुरा रेल्वेमार्गवर येत होता जो नॅरो गेज प्रकारात होता मात्र जेव्हा नॅरो गेजचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्यात आले तेव्हा स्टेशनचा परिसर रैना या गावात गेला.

 

raina nangar inmarathi

 

स्टेशनचे स्थान बदलल्यामुळे स्टेशनला नाव देण्यासाठी दोन्ही गावातील  गावकऱ्यांनी विरोध केला, विरोध इतका तीव्र होता की तो वाद कोर्टात गेला आहे.

स्टेशनला नाव नसेल म्हणून काय झालं स्टेशनवरून रेल्वेतर जातेच आणि प्रवाशांना या स्टेशनचे रैनांनगर या नावाने तिकीट सुद्धा दिली जाते. नाव नसलेल्या या स्टेशन वर सुद्धा ९ ट्रेन थांबतात.

 

raina nagar 1 inmarathi

हे ही वाचा – कित्येक वर्षांपासून मोफत सेवा देणारा जगातील एकमेव रेल्वेमार्ग भारतात आहे!

ब्रिटिश काळात सुरु झालेली ही रेल्वेसेवा आज अनेक वर्ष कार्यरत आहे. ब्रिटिश काळातील वाफेचे इंजिन जाऊन आता डिझेल इंजिन आले, अनेक सोयीसुविधा आल्या. मुंबई आणि त्यातील स्थानकांच्या नावामागे सुद्धा वेगवगेळ्या कहाण्या प्रसिद्ध आहेत.

आज आपल्याला साधं शहरातल्या शहरात कुठे जायचे असल्यास रिक्षेवाल्याना अथवा टॅक्सिवाल्याना नीट पत्ता सांगावा लागतो, नाहीतर ते कुठे आपल्याला सोडतील याचा काही पत्ता नाही. गावकऱ्यांची केस कधी संपेल आणि कधी स्टेशनला नाव मिळेल, हे बघायला गावकऱ्यांची कोणती पिढी हयात असेल सांगता येत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?